शहरं
Join us  
Trending Stories
1
"नव्या चेहऱ्यांना संधी द्या"; जयंत पाटलांची प्रदेशाध्यपद सोडण्याची इच्छा, शरद पवारांच्या भूमिकेकडे लक्ष
2
अजित पवारांसोबत जाण्याबाबत सुप्रिया सुळेंचे मोठे विधान; पक्षाच्या वर्धापनदिनी म्हणाल्या...
3
'मी विधवा होऊन...', सोनम रघुवंशीनं दिलं होतं आश्वासन; ओरडून म्हणाली, 'मार दो इसे...!' 'खतरनाक' होतं संपूर्ण प्लॅनिंग
4
भरमैदानात महिला अंपायरवर भडकला, आर अश्विनला चुकवावी लागली किंमत, ठोठवला मोठा दंड
5
चांदीने मोडले सर्व रेकॉर्ड! 'रिच डॅड पुअर डॅड' पुस्तकाच्या लेखकाचं भाकीत खरं ठरतंय! अजूनही आहे संधी?
6
Sonam Raghuvanshi : "राजा जवळ येतो, जे मला अजिबात आवडत नाही"; सोनमच्या चॅटमधून खळबळजनक खुलासा
7
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईनवर वाहतूक विस्कळीत; प्रवाशांचे प्रचंड हाल, रेल्वेने दिलं स्पष्टीकरण
8
Video: हातात बेड्या, जमिनीवर फेकले अन्...अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्यासोबत अमानुष वागणूक
9
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
10
Uber Bike: उबेर बाईक चालकाचे महिला प्रवाशाशी गैरवर्तन; गोरेगाव येथील संतापजनक प्रकार!
11
Lenskart आणणार ८५०० कोटी रूपयांचा IPO; कधी करू शकता गुंतवणूक, काय आहेत डिटेल्स?
12
५०० कर्मचाऱ्यांना फर्स्ट क्लास विमान तिकिट, खर्चासाठी ८.५ लाख अन्.. नक्की कोण आहे ही 'दिलदार' महिला?
13
७ वर्षांनी मोठ्या कोंकणा सेनसोबत डेटिंगच्या चर्चांवर अभिनेत्याने सोडलं मौन, म्हणाला- "विकी-कतरिना..."
14
सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! केंद्र सरकारच्या विविध विभागांमध्ये १४,५८२ पदांवर मेगाभरती...
15
पीडितांनी स्वतःच मिळवला 'न्याय'; बलात्कार करणाऱ्याला महिलांनी दिला वेदनादायक मृत्यू
16
लेकाच्या जन्मानंतर डॉक्टर म्हणाले, 'आता वजन कमी कर'; रेणुका शहाणेला धक्काच बसला
17
खुशखबर! EPFO नं बदलले नियम, PF क्लेम आता लगेच होणार; व्याजही जास्त मिळणार, पाहा डिटेल्स
18
आठ वर्षांनंतर अयोध्येतील जमिनीची किंमत २००% वाढली; जमिनीचे व्यवहार वाढल्याने सर्कल रेटमध्ये मोठी वाढ
19
गाडी वापरणं आता महागणार! थर्ड पार्टी इन्शुरन्समध्ये मोठी वाढ करण्याची तयारी, किती वाढेल खर्च?
20
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा

  एकाच्या बदलीवर दुसऱ्याचा आक्षेप! जिल्हा परिषदेत समुपदेशनाने सर्वसाधारण  बदल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2023 20:09 IST

Nagpur News  जिल्हा परिषदेत  सर्वसाधारण बदल्याची प्रक्रिया सुरू आहे. समुपदेशाने या बदल्या होत असल्या तरी काही प्रकरणात कर्मचारीच बदलीवर आक्षेप घेत असल्याचे प्रकार घडत आहे.

 नागपूर :  जिल्हा परिषदेत  सर्वसाधारण बदल्याची प्रक्रिया सुरू आहे. समुपदेशाने या बदल्या होत असल्या तरी काही प्रकरणात कर्मचारीच बदलीवर आक्षेप घेत असल्याचे प्रकार घडत आहे. तर काही प्रकरणात कर्मचारी संघटनेच्या वतीनेही आक्षेप नोंदविण्यात आले. अशा प्रकरणात  आलेल्या आक्षेपांची शहानिशा करून नियमात बसत असेल तरच बदली करण्याची भूमिका  जिल्हा परिषदेच्या मुख्यकार्यकारी अधिकारी सौम्या शर्मा  यांनी घेतली आहे. 

 गेल्या मंगळवारी बदल्यांची प्रक्रीया सुरू झाली. तीन दिवसात १२३ कर्मचाऱ्यांच्या बदल्या समुपदेशाने करण्यात आल्या.  पहिल्या दिवशी मंगळचारी  आरोग्य विभाग अंतर्गत आरोग्य सेवक महिला, औषध निर्माण अधिकारी, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, आरोग्य सेवक पुरुष, आरोग्य सहाय्यक पुरुष, आरोग्य पर्यवेक्षक  आरोग्य सहाय्यक महिला तर शिक्षण विभागांतर्गत केंद्रप्रमुख, कनिष्ठ व्याख्याता,  विस्तार अधिकारी शिक्षण अशा ५६ कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या.

गुरुवारी सात विभागातील समुपदेशनाने बदल्या  करण्यात आल्या.  त्यामध्ये वित्त विभागावातील सहाय्यक लेखा अधिकारी, कनिष्ठ लेखा अधिकारी, वरिष्ठ सहाय्यक लेखा अधिकारी, आणि कनिष्ठ सहाय्यक लेखा अधिकारी यांचा समावेश होता. तर लघु पाटबंधारे विभाग यामध्ये शाखा अभियंता आणि स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक आदींचा समावेश होता.  तर ग्रामीण पाणीपुरवठा विभागांतर्गत कनिष्ठ अभियंता या सोबतच बांधकाम विभागांतर्गत कनिष्ठ अभियंता स्थापत्य, अभियांत्रिकी सहाय्यक यांची बदली करण्यात आली यानंतर पशुसंवर्धन विभागांतर्गत सहाय्यक पशुधन विकास अधिकारी,  पशुधन पर्यवेक्षक, पट्टीबंधक यांच्या तर महिला आणि बालकल्याण विभागाअंतर्गत पर्यवेक्षिका पदाच्या बदल्या  करण्यात आल्या . कृषी विभागांतर्गत विस्तार अधिकारी कृषी यांची बदली समुपदेशनाने करण्यात आली  एकूण२७ अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या. 

गुरुवारी सामान्य प्रशासन विभागातील ५६ कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या. यात सहायक प्रशासन अधिकारी, कनिष्ठ प्रशासन अधिकारी, विस्तार अधिकारी सांख्यिकी, वरिष्ठ सहायक लिपिक, कनिष्ठ सहायक लिपिक या पदांच्या समुपदेशनाने बदल्या करण्यात आल्या. समुपदेश प्रक्रिया जिल्हा परिषद अध्यक्षा मुक्ता कोकडे, उपाध्यक्ष  कुंदा राऊत,  मुख्य कार्यकारी अधिकारी  सौम्या  शर्मा, सभापती राजकुमार कसबे  तसेच सामान्य प्रशासन  विभागाचे विभाग प्रमुख विपुल जाधव  आदींच्या उपस्थितीत ही प्रक्रिया सुरू आहे.

टॅग्स :zpजिल्हा परिषद