शहरं
Join us  
Trending Stories
1
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
2
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
3
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
4
काश्मीरच्या बडगाममध्ये CRPF च्या वाहनाचा अपघात; अनेक जवान जखमी
5
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन
6
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
7
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
8
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
9
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
10
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
11
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
12
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
13
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
14
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
15
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण
16
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
17
बाजार सपाट पातळीवर बंद; रिलायन्सचा शेअर पुन्हा आला धावून, 'या' सेक्टरवर दबाव
18
ATM मधून वारंवार पैसे काढायची सवय असेल तर ती बदला, नाहीतर १ मे पासून होईल नुकसान
19
अण्वस्त्रांची धमकी देणाऱ्या पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांचे तोंड भारताने केले बंद; एक्स अकाउंटवर घातली बंदी
20
Viral Video: बिबट्या थेट पोलीस ठाण्यातच आला! पोलिसाने पाहिलं, पण नंतर काय घडलं?

CoronaVirus in Nagpur : आणखी ३८ पॉझिटिव्ह : रुग्णांची संख्या २६८

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2020 23:54 IST

नागपुरात कोरोनाबाधितांची पहिली शंभरी गाठायला ४४ दिवसांचा कालावधी लागला, परंतु दुसऱ्या शंभरीसाठी केवळ तेराच दिवस लागले. धक्कादायक म्हणजे, बुधवारी ६८ तर आज ३८ रुग्णांची नोंद झाली. गेल्या २४ तासांत १०६ रुग्णांचे निदान झाल्याने कोरोनाबाधितांची संख्या २६८वर पोहचली आहे.

ठळक मुद्दे२४ तासात १०६ रुग्णनव्या ३८ रुग्णांची नोंद, दोन कोरोनामुक्त

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागपुरात कोरोनाबाधितांची पहिली शंभरी गाठायला ४४ दिवसांचा कालावधी लागला, परंतु दुसऱ्या शंभरीसाठी केवळ तेराच दिवस लागले. धक्कादायक म्हणजे, बुधवारी ६८ तर आज ३८ रुग्णांची नोंद झाली. गेल्या २४ तासांत १०६ रुग्णांचे निदान झाल्याने कोरोनाबाधितांची संख्या २६८वर पोहचली आहे. यात तीन मृत्यूंची नोंद आहे. आज आणखी दोन रुग्ण कोरोनामुक्त झाले. आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या ६५ झाली आहे. कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. बुधवारी दिवसा ४४ रुग्ण पॉझिटिव्ह आले, तर रात्री मेडिकलच्या प्रयोगशाळेत २४ रुग्ण पॉझिटिव्ह आल्याची नोंद झाली. एकाच दिवशी ६८ रुग्ण पॉझिटिव्ह आल्याने नागपुरात रुग्णांची संख्या २३०वर पोहचली होती. आज गुरुवारी मेडिकलच्या प्रयोगशाळेतून २२, नीरीच्या प्रयोगशाळेतून सहा, मेयोच्या प्रयोगशाळेतून सात व माफसुच्या प्रयोगशाळेतून तीन असे एकूण ३८ रुग्ण पॉझिटिव्ह आले. गेल्या दोन दिवसांत १०६ रुग्णांची नोंद झाली. विशेष म्हणजे, नागपुरात पहिल्या कोरोनाबाधित रुग्णाची नोंद ११ मार्च रोजी झाली. त्यानंतर शंभराव्या रुग्णाची नोंद २४ एप्रिल रोजी झाली. पहिले शंभर रुग्ण गाठायला ४४ दिवस लागले. मात्र २५ एप्रिल ते सहा मे या १३ दिवसांत दुसऱ्या शंभर रुग्णांची नोंद झाली. यावरून रुग्णांची संख्या वेगाने वाढत असून पुढील काही दिवस नागपूरकरांसाठी महत्त्वाचे ठरणार आहेत. आज पॉझिटिव्ह आलेले बहुसंख्य रुग्ण हे मोमिनपुरा व सतरंजीपुऱ्यातील आहेत. हे सर्व रुग्ण संस्थात्मक अलगीकरणातील आहेत.सारीचे तीन रुग्ण पॉझिटिव्ह‘सारी’ म्हणजे तीव्र श्वसनाचे विकार असलेला रुग्ण. याला वैद्यकीय भाषेत ‘ सिव्हिअरली अ‍ॅक्यूट रेस्पिरेटरी इलनेस’ म्हणतात. या आजाराचे तीन रुग्ण गेल्या काही दिवसांपासून मेडिकलच्या कोविड हॉस्पिटलमध्ये उपचार घेत होते. आज या तिन्ही रुग्णांचे नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सारीच्या रुग्णांची रोगप्रतिकारशक्ती इतरांच्या तुलनेने कमी असल्याने ‘हायरिस्क’ रुग्ण म्हणून त्याकडे पाहिले जाते.सर्वाधिक रुग्ण मोमिनपुऱ्यातीलमिळालेल्या माहितीनुसार, आज नोंद झालेल्या ३८ रुग्णांमध्ये मेडिकलमधील १९, मेयोतील सात तर माफसुमधील तीन असे एकूण ६० रुग्ण आहेत. केवळ नीरी येथील सहा रुग्ण हे सतरंजीपुऱ्यातील आहेत. पार्वतीनगर येथील कोरोनाबाधित मृताच्या नातेवाईकांच्या नमुन्यांचा अहवाल रात्री उशिरा येण्याची शक्यता आहे.दोन रुग्ण कोरोनामुक्तमोमिनपुरा येथील रहिवासी असलेल्या ५२ वर्षीय पुरुषाचा नमुना १४ दिवसांनंतर निगेटिव्ह आल्याने त्यांना मेयो रुग्णालयातून सुटी देण्यात आली. २४ एप्रिल रोजी त्यांचा नमुना पॉझिटिव्ह आला होता. तेव्हापासून त्यांच्यावर मेयोमध्ये उपचार सुरू होते. मेडिकलमधीलही एका रुग्णाचा नमुना पॉझिटिव्ह आल्याने रुग्णालयातून सुटी देण्यात आली. आतापर्यंत ६५ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.कोरोनाची आजची स्थितीदैनिक संशयित २१५दैनिक तपासणी नमुने १८०दैनिक निगेटिव्ह नमुने ११३नागपुरातील पॉझिटिव्ह नमुने २६८नागपुरातील मृत्यू ०३डिस्चार्ज केलेले पॉझिटिव्ह रुग्ण ६५डिस्चार्ज केलेले संशयित रुग्ण १,५८६क्वारंटाईन कक्षात एकूण संशयित २,०८९पीडित-२६८-दुरुस्त-६५-मृत्यू-३

टॅग्स :CoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्याnagpurनागपूर