शहरं
Join us  
Trending Stories
1
"चीनपेक्षाही धोकादायक म्हणजे RSS…"; ओवेसींनी साधला निशाणा, PM मोदींना विचारला एक प्रश्न
2
ठाकरे बंधूंच्या पॅनेलला टक्कर देण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी २ शिलेदारांवर सोपवली जबाबदारी
3
भारताच्या स्वातंत्र्याने खलिस्तान्यांना होतोय त्रास; ऑस्ट्रेलियाच्या रस्त्यांवर गोंधळ घातला
4
पाकिस्तानमध्ये हाहाकार! ढगफुटी, पूर आणि भूस्खलनात ४१ लोकांचा मृत्यू, असंख्य बेपत्ता; पाचशे पर्यटक अडकले
5
प्रियकराची ओढ, पत्नीचं संसाराकडे दुर्लक्ष; त्यानंतर पतीने जे केले..., सासरचे जावयावरच उलटले
6
सुदर्शन चक्र, दहा वर्षात तयार होणार भारताचं स्वदेशी सुरक्षा कवच, सर्व शस्त्रास्त्रे ठरणार निष्प्रभ, अशी आहे योजना
7
“जालना, मुंबई, दिल्लीत कुठेही आंदोलन कर, पण...”; जरांगेंच्या निर्धारावर भुजबळ स्पष्टच बोलले
8
'दहा मृतदेह आम्ही स्वतःच बाहेर काढले, अजूनही लोक मातीखालीच...'; चशोटीत आक्रोश, मन्न सुन्न करणारे अनुभव
9
"त्यांनी माझे गाल ओढले, दंडाला चिमटे काढले...", हळदीकुंकूच्या कार्यक्रमाला गेलेल्या प्रिया बेर्डेंना चाहत्यांकडून आलेला धक्कादायक अनुभव
10
क्रिकेटरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी दिसणार सलमान खानच्या 'बिग बॉस १९'मध्ये?, जाणून घ्या याबद्दल
11
"भारत-पाक संघर्ष अणुयुद्धात बदलला असता, मी होतो म्हणून..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा 'तो' दावा कायम
12
शशी थरूर 'क्लीन बोल्ड'! एका तरूणाच्या इंग्रजी ट्विटने काढली 'विकेट', रिप्लाय देत म्हणाले...
13
जन्माष्टमी २०२५: ‘या’ राशींवर श्रीकृष्ण कृपा, पैसे कमी पडत नाहीत; सुबत्ता-वैभव-भरभराट लाभते!
14
राजा रघुवंशीच्या घरी अचानक पोहोचला पोलिसांच्या वेशातील व्यक्ती; कुटुंबाला आला संशय, तपास करताच धक्कादायक सत्य उघड
15
७ वर्षांनी डोनाल्ड ट्रम्प आणि पुतिन भेट होणार; ३२ हजार सैन्य तैनात, ३०० किमी परिसरात 'नो फ्लाय झोन'
16
"कोणतीही अघोरी शक्ती आली तरी मराठी माणसांची..."; 'या' महापालिकांमध्ये मनसे-शिवसेना एकत्र लढणार?
17
PM मोदींनी सर्व रेकॉर्ड मोडले, लाल किल्ल्यावर १०३ मिनिटे भाषण केले; पाहा, १० मोठे मुद्दे
18
"युवराज्ञींना येणं भाग पडलं...", प्राजक्ता-शंभुराजच्या साखरपुड्याला आली भोसले राजघराण्यातील महत्त्वाची व्यक्ती, अभिनेत्रीची खास पोस्ट
19
सूरज चव्हाणला पक्षात बढती, अजित पवार म्हणतात, "मला माहिती नाही..."; सुनील तटकरेंचा वेगळाच दावा
20
“स्वातंत्र्य चळवळ अन् RSSचा संबंध काय? PM मोदी पुन्हा लाल किल्ल्यावरून खोटे बोलले”: सपकाळ

पंतप्रधान मोदींची रोजगार निर्मितीची घोषणा एक ‘जुमला’, आरएसएसप्रणीत भारतीय मजदूर संघाने दिला घरचा आहेर

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2017 21:35 IST

पंतप्रधानांपासून ते विविध मंत्र्यांचे सल्लागारच अयोग्य व अपात्र आहेत. विदेशातून शिकून आलेल्या या सल्लागारांना देशातील मूळ समस्यांची माहितीच नाही.

नागपूर - पंतप्रधानांपासून ते विविध मंत्र्यांचे सल्लागारच अयोग्य व अपात्र आहेत. विदेशातून शिकून आलेल्या या सल्लागारांना देशातील मूळ समस्यांची माहितीच नाही. मात्र त्यांच्यामुळे केंद्र शासनाचे आर्थिक धोरण अपयशी ठरत असून ते बदलण्याची नितांत आवश्यकता आहे, अशी भूमिका राष्ट्रीय स्वयंसेवक संघप्रणित भारतीय मजदूर संघातर्फे मांडण्यात आली आहे. देशात गरीबी, बेरोजगारी यांचे प्रमाण वाढतच असून रोजगारनिर्मितीची घोषणा एक ‘जुमला’च ठरली असल्याचा आरोप करत ‘भामसं’ने केंद्र सरकारला घरचाच अहेर दिला आहे.

भारतीय मजदूर संघामध्ये केंद्राच्या कामगार धोरणांविरोधात नाराजीचा सूर आहे. केंद्र शासनाच्या धोरणाविरोधात ‘भामसं’तर्फे १७ नोव्हेंबर रोजी दिल्लीत संसदेसमोर निदर्शने करण्यात येणार आहे या मोर्च्याची तयारी व नियोजन यांची रुपरेषा ठरविण्यासाठी नागपुरात ६ व ७ आॅक्टोबर रोजी अखिल भारतीय पदाधिकारी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यानिमित्ताने आयोजित पत्रपरिषदेला ‘भामसं’चे राष्ट्रीय महामंत्री विजेश उपाध्याय यांनी संबोधित केले. आपल्या देशाची अर्थव्यवस्था कृषीवर आधारित आहे. त्यामुळे तिला प्रोत्साहन देण्याची गरज आहे. मात्र जमिनीवरील स्थिती माहितीच नसलेल्या सल्लागारांची सगळीकडे भरती झाली आहे.

त्यामुळे नीती आयोगदेखील चुकीच्या दिशेने जात आहे. दुसºया देशाची अर्थव्यवस्था ‘कॉपी’ करणे थांबविले पाहिजे, असे म्हणत उपाध्याय यांनी वित्तमंत्री अरुण जेटली यांच्यावर निशाणा साधला. देशाची आर्थिक संपदा वाढत असली तरी त्याचा लाभ निवडक लोकांनाच मिळत आहे. सरकार कामगारक्षेत्रातील ९२ टक्के लोकांच्या हिताकडे दुर्लक्ष करत असल्याचे देखील ते म्हणाले. पत्रपरिषदेला राष्ट्रीय सचिव नीता चौबे, सुधीर बुरडे, विदर्भ प्रदेश अध्यक्ष रमेश पाटील, महामंत्री अशोक भुताड, गजानन गटलेवार, सुरेश चौधरी, रमेश बल्लेवार उपस्थित होते.

बहुराष्ट्रीय कंपन्यांना देश विकण्याचा डावदेशात सुधारणांच्या नावाखाली वर्तमान प्रणालीमध्ये अनेक बदल करण्यात येत आहेत. मात्र या सुधारणा अपयशी ठरत आहेत. अनेक ठिकाणी खासगीकरणाचा घाट घालण्यात येत आहे. खासगी व बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या हातात कारभार देऊन देश विकण्याचाच हा डाव तर नाही ना, असा प्रश्न यावेळी विजेश उपाध्याय यांनी उपस्थित केला.

सरकारच करत आहे नियमांचे उल्लंघनदेशात गेल्या ७० वर्षांपासून रोजगाराचे धोरण तयार करण्यात आलेले नाही. ९३ टक्के लोक असंघटित क्षेत्रातील आहेत. उर्वरित ७ टक्क्यांधील ६७ टक्के रोजगार हे कंत्राटी पद्धतीचे आहेत. देशात कंत्राट नियमन कायदा असताना सरकारकडून त्याचे उल्लंघन होत आहे. सरकारच्या उदासिनतेमुळे कोट्यवधी कामगार हक्काचे वेतन व भत्ते यांना वंचित आहेत, असा आरोप उपाध्याय यांनी केला.

या कारणांसाठी दिल्लीत आंदोलनसार्वजनिक क्षेत्रातील निर्गुंतवणूकीला ‘भामसं’तर्फे अगोदरच विरोध करण्यात आला आहे. सोबतच समान कामगार कायद्याची अंमलबजावणी करत समान वेतन, कामगारांना सामाजिक सुरक्षा इत्यादी मागण्यादेखील आहेत. केंद्र शासनाने कामगारांच्या हिताची भुमिका घ्यावी, यासाठी १७ नोव्हेंबर रोजी निदर्शने करण्यात येतील. याला सुमारे दीड ते पावणेदोन लाख कार्यकर्ते उपस्थित राहतील. 

टॅग्स :RSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघ