शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

हिंदी राज्य नाट्यस्पर्धेचा निकाल जाहीर करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2020 21:28 IST

महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने घेण्यात आलेल्या राज्य हिंदी नाट्यस्पर्धेचा निकाल जाहीर करा, अशा मागणीसाठी राज्यभरातून रंगकर्मी एकवटत आहेत.

ठळक मुद्देकोरोना पीडित नाट्यस्पर्धा : राज्यभरातून रंगकर्मींची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने घेण्यात आलेल्या राज्य हिंदी नाट्यस्पर्धेचा निकाल जाहीर करा, अशा मागणीसाठी राज्यभरातून रंगकर्मी एकवटत आहेत.सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे दरवर्षीप्रमाणे यंदाही ५९वी राज्य हिंदी नाट्यस्पर्धा पार पडली. नेहमीपेक्षा या स्पर्धेचे स्वरूप वेगळे होते. एकाच केंद्रावर न घेता ही स्पर्धा विभागीय स्वरूपात घेण्यात आली. त्यानुसार एकूण ८६ नाटके विभागवार पद्धतीने अंतिम फेरीत उतरणार होते. जानेवारीपासून नाट्यस्पर्धेस सुरुवात झाली. पुणे, नागपूर, ठाणे आणि मुंबई अशा तऱ्हेने ही स्पर्धा होणार होती. मात्र, पुणे, नागपूर व ठाणे येथे स्पर्धा आटोपली आणि मुंबईला स्पर्धा पोहोचताच कोरोनाचा प्रकोप प्रचंड वाढला आणि स्पर्धा स्थगित करण्यात आली. त्याअनुषंगाने पुणे केंद्रावर २३ पैकी २०, नागपूर केंद्रावर २० पैकी १७, ठाणे केंद्रावर १३ पैकी १२ आणि मुंबई केंद्रावर ७ नाटकांचे सादरीकरण झाले. मुंबई केंद्रावर स्पर्धेतील २५ नाटके सादर होणे राहिले आहे. अशात २० मार्चपासून राज्यात टाळेबंदी सुरू झाली आणि त्यापूर्वीपासूनच सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन रद्द करण्याच्या घोषणा झाल्या. अशा तऱ्हेने स्पर्धेत सादर होणाऱ्या ८६ पैकी ५६ नाटकांचे सादरीकरण झाले. उर्वरित नाटके होण्याची चिन्हे नाहीत. ही सर्व नाटके मुंबई केंद्रावरची असल्याने आणि मुंबईची स्थिती बघता ही स्पर्धा पूर्ण होणे अत्यंत अवघड आहे. अशा स्थितीत स्पर्धेत जेवढी नाटके झाली, त्यांचा निकाल जाहीर होणे अपेक्षित आहे. अन्यथा सादर झालेल्या नाटकांवर अन्याय होईल. याच भावनेतून राज्यातील ५६ नाट्यसंघांनी ‘कोरोनापीडित नाट्यस्पर्धा’ या शीर्षकाखाली एकत्र येण्याचा प्रयत्न चालवला आहे.

टॅग्स :Natakनाटकhindiहिंदी