शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात अचानक वाढले जनावरांच्या खाद्याचे दर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2020 22:02 IST

लॉकडाऊनमुळे दोन महिन्यांपासून बंद असलेली दुकाने आता सुरू व्हायला लागली आहेत. या परिस्थितीचा फायदा घेत दुकानदार अधिक दराने माल विक्री करीत असल्याचे चित्र आहे. जनावरांचे खाद्य पदार्थांचे दर अचानक वाढल्याचे दिसून येत आहे. दुकानातील रेडिमेड खाद्य दरात तर ५०० ते ७०० रुपयांची वाढ झाली असून जनावरे पाळणाऱ्यांच्या खिशाला कात्री लागली आहे.

ठळक मुद्देरेडिमेड खाद्यात ५०० ते ७०० रुपयांची वाढ : जनावर मालकांच्या खिशाला कात्री

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : लॉकडाऊनमुळे दोन महिन्यांपासून बंद असलेली दुकाने आता सुरू व्हायला लागली आहेत. या परिस्थितीचा फायदा घेत दुकानदार अधिक दराने माल विक्री करीत असल्याचे चित्र आहे. जनावरांचे खाद्य पदार्थांचे दर अचानक वाढल्याचे दिसून येत आहे. दुकानातील रेडिमेड खाद्य दरात तर ५०० ते ७०० रुपयांची वाढ झाली असून जनावरे पाळणाऱ्यांच्या खिशाला कात्री लागली आहे.कोरोनामुळे लॉकडाऊन लागले तेव्हा किराणा, औषधी व भाज्या वगळता सर्व दुकाने बंद करण्यात आली होती. आता त्यात शिथिलता आणत इतरही दुकाने उघडण्यास परवानगी देण्यात आली. बंद असल्याने दुकानातील माल जशाचा तसा असेल पण दुकानदार स्टॉक नसल्याचे कारण देत चढ्या दारात विकत आहेत. जनावरांचे खाद्य विकणाऱ्यांनीही या परिस्थितीचा फायदा घेणे सुरू केले आहे. श्वानांचे शेल्टर होम चालविणाऱ्या स्मिता मिरे यांनी दिलेल्या माहितीनुसार श्वानांच्या रेडिमेड खाद्याची बॅग १५०० ते १६०० रुपयांना मिळायची. ती बॅग आता २२०० ते २५०० रुपयांना विकली जात आहे. म्हणजे जवळपास ७०० रुपयांचा फरक पडला. लॉकडाऊनच्या काळात ही किंमत ३००० पर्यंत गेल्याचे त्या सांगतात. त्यांच्याकडे १५० च्या वर श्वान आहेत. त्यांना महिन्याला २०० किलो खाद्य म्हणजे १० बॅग लागतात. याचा अर्थ महिन्याला ७००० रुपये अधिकचे मोजावे लागत आहेत.दुधाचे दरही लिटरमागे दोन ते तीन रुपये वाढले असल्याचे दिसून येते. केवळ तांदूळ आहेत त्या दराने मिळत असल्याचे दिसते.शहरात ३० ते ४० टक्के घरांमध्ये श्वान पाळले जातात. याशिवाय गाई, म्हशी आदी जनावरे पाळणाºयांची संख्या खूप आहे. या महागाईचा फटका या जनावर मालकांनाही पडत आहे.

टॅग्स :foodअन्नnagpurनागपूर