शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
2
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
5
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
6
धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
7
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
8
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
9
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
10
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
11
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
12
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
13
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
14
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
15
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
16
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
17
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
18
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
19
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
20
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
Daily Top 2Weekly Top 5

नागपूरचे  अनिल किलोर, अविनाश घरोटे यांची न्यायमूर्तीपदी नियुक्तीची शिफारस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2019 00:08 IST

सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमने नागपूर येथील अ‍ॅड. अनिल किलोर व अ‍ॅड. अविनाश घरोटे यांच्यासह एकूण पाच वकिलांची मुंबई उच्च न्यायालयाच्या अतिरिक्त न्यायमूर्तीपदी नियुक्ती करण्याची शिफारस सोमवारी केंद्र सरकारला केली. अन्य तीन वकिलांमध्ये अ‍ॅड. एन. बी. सूर्यवंशी, अ‍ॅड. माधव जामदार व अ‍ॅड. मिलिंद जाधव यांचा समावेश आहे.

ठळक मुद्देसर्वोच्च न्यायालय कॉलेजियम : एकूण पाच वकिलांचा समावेश

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमने नागपूर येथील अ‍ॅड. अनिल किलोर व अ‍ॅड. अविनाश घरोटे यांच्यासह एकूण पाच वकिलांची मुंबई उच्च न्यायालयाच्या अतिरिक्त न्यायमूर्तीपदी नियुक्ती करण्याची शिफारस सोमवारी केंद्र सरकारला केली. अन्य तीन वकिलांमध्ये अ‍ॅड. एन. बी. सूर्यवंशी, अ‍ॅड. माधव जामदार व अ‍ॅड. मिलिंद जाधव यांचा समावेश आहे.४ मे २०१८ रोजी मुंबई उच्च न्यायालयाच्या तत्कालीन प्रभारी मुख्य न्यायमूर्तींनी अतिरिक्त न्यायमूर्तीपदी नियुक्तीसाठी एकूण १० वकिलांची नावे सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमला सुचविली होती. सरन्यायाधीश रंजन गोगोई, न्या. शरद बोबडे व न्या. एन. व्ही. रामना यांचा समावेश असलेल्या या कॉलेजियमने आवश्यक बाबी पडताळल्यानंतर वरील पाच नावे अंतिम केली. आता या नवीन अतिरिक्त न्यायमूर्तींच्या नियुक्तीची अधिसूचना जारी होईल.अ‍ॅड. अनिल किलोर हे हायकोर्ट बार असोसिएशन नागपूरचे अध्यक्ष असून, या पदावर कार्यरत असताना न्यायमूर्तीपदी नियुक्ती झालेले ते पहिले वकील होत. ते मूळचे अमरावती जिल्ह्यातील वलगाव येथील आहेत. त्यांनी नागपूर येथे अ‍ॅड. अरविंद बडे व अ‍ॅड. संजय जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली वकिली व्यवसायाला सुरुवात केली. ते गत २७ वर्षांपासून वकिली व्यवसायात आहेत. सामाजिक समस्या सोडविण्यासाठी लढणारे वकील म्हणून त्यांची सर्वत्र ख्याती आहे. त्यांनी विविध ज्वलंत विषयावर मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात ४० वर जनहित याचिका दाखल केल्या व त्यात सकारात्मक आदेश मिळविले.अ‍ॅड. अविनाश घरोटे नागपूरकर असून, त्यांचे वडील गुणवंतराव हे वकील होते. एलएलबी पदवी मिळविल्यानंतर त्यांनी १९८६ पासून वडिलांच्या मार्गदर्शनाखाली वकिली व्यवसायाला सुरुवात केली. त्यांना वकिली व्यवसायाचा ३३ वर्षांचा अनुभव आहे. दिवाणी प्रकरणांवर त्यांची विशेष पकड आहे. त्यांनी सर्वाधिक मुंबई उच्च न्यायालयाचे नागपूर खंडपीठ व नागपूर जिल्हा न्यायालयात वकिली व्यवसाय केला. ते नागपूर जिल्हा विधिज्ञ संघटनेचे माजी सचिव आहेत.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयadvocateवकिल