शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
3
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
4
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
5
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
6
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
7
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
8
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
9
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
10
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
11
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
12
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
13
पाकिस्तानसाठी हेरगिरी, पुरवली गोपनीय माहिती; निशांत अगरवालच्या शिक्षेवरील निर्णय न्यायालयाने ठेवला राखून
14
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
15
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
16
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
17
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
18
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
19
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
20
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे

अनिल किलोर व अविनाश घरोटे नागपूर उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशपदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2019 10:27 IST

नागपूर येथील अ‍ॅड. अनिल किलोर व अ‍ॅड. अविनाश घरोटे यांच्यासह चार वकिलांची मुंबई उच्च न्यायालयाच्या अतिरिक्त न्यायमूर्ती पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमने केलेल्या शिफारशीनुसार नागपूर येथील अ‍ॅड. अनिल किलोर व अ‍ॅड. अविनाश घरोटे यांच्यासह चार वकिलांची मुंबई उच्च न्यायालयाच्या अतिरिक्त न्यायमूर्ती पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी ही नियुक्ती प्रदान केली असून बुधवारी याबाबतची अधिसूचना जारी करण्यात आली.विशेष म्हणजे सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमने अ‍ॅड. अनिल किलोर व अ‍ॅड. अविनाश घरोटे यांच्यासह एकूण पाच वकिलांची मुंबई उच्च न्यायालयाच्या अतिरिक्त न्यायमूर्तीपदी नियुक्ती करण्याची शिफारस केंद्र सरकारला केली. या शिफारशीवर शिक्कामोर्तब करीत राष्टÑपती यांनी अ‍ॅड. किलोर व अ‍ॅड. घरोटे यांच्यासह अ‍ॅड. नितीन सूर्यवंशी व अ‍ॅड. मिलिंद जाधव यांच्या नियुक्तीला मंजुरी प्रदान केली आहे. ४ मे २०१८ रोजी मुंबई उच्च न्यायालयाच्या तत्कालीन प्रभारी मुख्य न्यायमूर्तींनी अतिरिक्त न्यायमूर्तीपदी नियुक्तीसाठी एकूण १० वकिलांची नावे सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमला सुचविली होती. सरन्यायाधीश रंजन गोगोई, न्या. शरद बोबडे व न्या. एन. व्ही. रामना यांचा समावेश असलेल्या या कॉलेजियमने आवश्यक बाबी पडताळल्यानंतर पाच नावे अंतिम केली होती. त्यातील चार वकिलांना नवीन अतिरिक्त न्यायमूर्ती म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.अ‍ॅड. अनिल किलोर हे हायकोर्ट बार असोसिएशन नागपूरचे अध्यक्ष असून या पदावर कार्यरत असताना न्यायमूर्तीपदी नियुक्ती झालेले ते पहिले वकील होत. ते मूळचे अमरावती जिल्ह्यातील वलगाव येथील आहेत. त्यांनी नागपूर येथे अ‍ॅड. अरविंद बडे व अ‍ॅड. संजय जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली वकिलीला सुरुवात केली. ते गत २७ वर्षांपासून वकिली व्यवसायात आहेत. सामाजिक समस्या सोडविण्यासाठी लढणारे वकील म्हणून त्यांची सर्वत्र ख्याती आहे. त्यांनी विविध ज्वलंत विषयावर मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात ४० च्यावर जनहित याचिका दाखल केल्या व त्यात सकारात्मक आदेश मिळविले.अ‍ॅड. अविनाश घरोटे नागपूरकर असून त्यांचे वडील गुणवंतराव हे वकील होते. एल.एल. बी. पदवी मिळविल्यानंतर त्यांनी १९८६ पासून वडिलांच्या मार्गदर्शनाखाली वकिली व्यवसायाला सुरुवात केली. त्यांना वकिली व्यवसायाचा ३३ वर्षांचा अनुभव आहे. दिवाणी प्रकरणांवर त्यांची विशेष पकड आहे. त्यांनी सर्वाधिक मुंबई उच्च न्यायालयाचे नागपूर खंडपीठ व नागपूर जिल्हा न्यायालयात वकिली व्यवसाय केला. ते नागपूर जिल्हा विधिज्ज्ञ संघटनेचे माजी सचिव आहेत.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालय