शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
3
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
4
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
5
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
6
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
7
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
8
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
9
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
10
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
11
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
12
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
13
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
14
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
15
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश
16
खंडाळ्यात जुन्या वैमनस्यातून दोन गटात हिंसक हाणामारी; एकाचा मृत्यू, दोन जण जखमी
17
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
18
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
19
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
20
Gold Mortgage Loan : सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या

नवख्यांच्या आरत्या अन कार्यकर्ते ‘घरच्या गाईचे गोऱहे’; अनिल गोटे यांची भाजपावर नाराजी :

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2017 11:10 IST

भाजपाचे धुळे येथील आमदार अनिल गोटे यांनी पक्षाच्या कार्यशैलीवर उघड नाराजी व्यक्त केली आहे. पक्षात नव्याने प्रवेश घेणाऱ्यांच्या आरत्या ओवाळायच्या व पक्षातील निष्ठावान कार्यकर्त्यांना मात्र, ‘घरच्या गाईचे गोऱहे’ आहेत, जातील कुठे, अशी वागणूक दिली जात आहे.

ठळक मुद्देगुजरातच्या निकालाने अंजन घातले

आॅनलाईन लोकमतनागपूर : भाजपाचे धुळे येथील आमदार अनिल गोटे यांनी पक्षाच्या कार्यशैलीवर उघड नाराजी व्यक्त केली आहे. पक्षात नव्याने प्रवेश घेणाऱ्यांच्या आरत्या ओवाळायच्या व पक्षातील निष्ठावान कार्यकर्त्यांना मात्र, ‘घरच्या गाईचे गोऱहे’ आहेत, जातील कुठे, अशी वागणूक दिली जात आहे. गुजरातचा निकाल हा अशा वर्तणुकीचाच फटका आहे, असे रोखठोक मत गोटे यांनी व्यक्त केले आहे.नाना पटोले यांनी भाजपात होत असलेल्या कुचंबणेवरून खासदारकीचा राजीनामा दिला आहे. यानंतर भाजपाचे काटोलचे आमदार आशिष देशमुख यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवून वेगळ्या विदर्भाच्या आश्वासनाची आठवण करून देत नाराजी व्यक्त केली. या दोन नेत्यांच्या पाठोपाठ आता अनिल गोटे यांनीही पक्षावर नाराजी व्यक्त केली आहे. गोटे यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना आवाहन करणारे एक पत्र लिहिले आहे. या पत्रात त्यांनी म्हटले आहे की, गुजरात विकासाच्या मॉडेलवर भाजपाने संपूर्ण बहुमताने केंद्रात सत्ता आणली. तरीसुद्धा सामान्य माणसाला गृहित धरता येत नाही, हेच गुजरातच्या निकालाने दाखवून दिले आहे. आपल्याला मिळालेली सत्ता तहहयात आहे, अशा गैरसमजात लाटेवर स्वार झालेल्यांच्या डोळ्यात या निकालाने अंजन घातले आहे, असे बेधडक मतही गोटे यांनी माडले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या विनंतीवरून विविध विकास कामांसाठी भरीव निधी उपलब्ध करून दिला, अशी कृतज्ञताही त्यांनी व्यक्त केली आहे.

टॅग्स :Nagpur Winter Session-2017नागपूर हिवाळी अधिवेशन-२०१७