शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रवादीच्या शहर अध्यक्षपदी अनिल अहिरकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2017 21:32 IST

राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहर अध्यक्षपदी अनिल अहिरकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मंगळवारी मुंबई येथे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार व प्रदेश अध्यक्ष आ. सुनील तटकरे यांच्या हस्ते अहिरकर यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले.

ठळक मुद्देमाजी मंत्री अनिल देशमुख यांच्याकडे ही जबाबदारी होती

आॅनलाईन लोकमतनागपूर : राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहर अध्यक्षपदी अनिल अहिरकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मंगळवारी मुंबई येथे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार व प्रदेश अध्यक्ष आ. सुनील तटकरे यांच्या हस्ते अहिरकर यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. आजवर माजी मंत्री अनिल देशमुख यांच्याकडे ही जबाबदारी होती.अहिरकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे मध्य नागपूर विभागीय अध्यक्ष म्हणून काम केले आहे. ते सध्या प्रदेश प्रतिनिधी म्हणून कार्यरत आहेत. विविध व्यापारी संघटना, प्रतिष्ठाने, क्रीडा व सामाजिक संस्था, संघटनांमध्ये ते सक्रिय आहेत. अहिरकर यांना नियुक्तीपत्र देतेवेळी माजी आ. दीनानाथ पडोळे व महापालिकेतील गटनेते दुनेश्वर पेठे उपस्थित होते. राष्ट्रवादी काँग्रेसमधील गटबाजी वाढत असल्याचे पाहून, पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी तोडगा काढत माजी मंत्री अनिल देशमुख यांच्याकडे शहर अध्यक्षपदाची तर माजी मंत्री बंग यांच्याकडे जिल्हाध्यक्षपदाची धुरा सोपविली होती. यानंतर या दोन्ही मंत्र्यांनी नियमित कामकाज पाहण्यासाठी कार्याध्यक्षांची नियुक्ती केली होती. महापालिकेच्या निवडणुकीतील पराभवानंतर अनिल देशमुख यांनी २४ मार्च २०१७ रोजी शरद पवार यांना पत्र पाठवून शहर अध्यक्षाच्या जबाबदारीतून मुक्त करण्याची तसेच अनिल अहिरकर यांची नियुक्ती करण्याची विनंती केली होती. शिवाय गेल्या महिन्यात अजित पवार व सुनील तटकरे यांनी विदर्भातील काही जिल्ह्यांच्या बैठका घेऊन कामकाजाचा आढावा घेतला होता. या वेळी नागपूरच्या बैठकीत शहरातील काम संथ असल्याची नाराजी काही पदाधिकाºयांनी व्यक्त केली होती. काम करणारयांना संधी देण्याची मागणी केली होती. या मागणीची पक्षाने दखल घेतली आहे. 

 

राष्ट्रवादीच्या शहर अध्यक्षपदीअनिल अहिरकरआॅनलाईन लोकमतनागपूर : राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहर अध्यक्षपदी अनिल अहिरकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मंगळवारी मुंबई येथे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार व प्रदेश अध्यक्ष आ. सुनील तटकरे यांच्या हस्ते अहिरकर यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. आजवर माजी मंत्री अनिल देशमुख यांच्याकडे ही जबाबदारी होती.अहिरकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे मध्य नागपूर विभागीय अध्यक्ष म्हणून काम केले आहे. ते सध्या प्रदेश प्रतिनिधी म्हणून कार्यरत आहेत. विविध व्यापारी संघटना, प्रतिष्ठाने, क्रीडा व सामाजिक संस्था, संघटनांमध्ये ते सक्रिय आहेत. अहिरकर यांना नियुक्तीपत्र देतेवेळी माजी आ. दीनानाथ पडोळे व महापालिकेतील गटनेते दुनेश्वर पेठे उपस्थित होते. राष्ट्रवादी काँग्रेसमधील गटबाजी वाढत असल्याचे पाहून, पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी तोडगा काढत माजी मंत्री अनिल देशमुख यांच्याकडे शहर अध्यक्षपदाची तर माजी मंत्री बंग यांच्याकडे जिल्हाध्यक्षपदाची धुरा सोपविली होती. यानंतर या दोन्ही मंत्र्यांनी नियमित कामकाज पाहण्यासाठी कार्याध्यक्षांची नियुक्ती केली होती. महापालिकेच्या निवडणुकीतील पराभवानंतर अनिल देशमुख यांनी २४ मार्च २०१७ रोजी शरद पवार यांना पत्र पाठवून शहर अध्यक्षाच्या जबाबदारीतून मुक्त करण्याची तसेच अनिल अहिरकर यांची नियुक्ती करण्याची विनंती केली होती. शिवाय गेल्या महिन्यात अजित पवार व सुनील तटकरे यांनी विदर्भातील काही जिल्ह्यांच्या बैठका घेऊन कामकाजाचा आढावा घेतला होता. या वेळी नागपूरच्या बैठकीत शहरातील काम संथ असल्याची नाराजी काही पदाधिकाºयांनी व्यक्त केली होती. काम करणाºयांना संधी देण्याची मागणी केली होती. या मागणीची पक्षाने दखल घेतली आहे.