शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

वस्तीत पाणी तुंबल्यामुळे संताप, माजी नगरसेवकाला मारहाण; आरोपीच्या कुटुंबीयांचा भलताच आरोप

By योगेश पांडे | Updated: June 18, 2024 22:18 IST

यासंदर्भात आरोपीच्या कुटुंबियांनी ‘लोकमत’ला फोन करून या प्रकरणात कुठलीही मारहाण झाली नसल्याचा दावा केला.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सोमवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे मनपाची पोलखोल झाली व अनेक ठिकाणी पाणी तुंबले. मात्र पाणी तुंबल्याचा केवळ नागरिकच नव्हे तर एका माजी नगरसेवकालादेखील वेगळाच फटका बसला. वस्तीत पाणी तुंबल्यावरून संतप्त झालेल्या नागरिकांपैकी काहींनी माजी नगरसेवक दीपक चौधरी यांना मारहाण केली. या प्रकारामुळे परिसरात तणाव निर्माण झाला होता. अखेर प्रकरण पोलिसांत गेले. नागरिकांकडून चौधरी यांच्याच माणसांनी धमकी दिल्याचा आरोप करण्यात आला आहे.

दीपक चौधरी हे अयोध्यानगरात राहतात. त्यांच्या घराच्या मागील भागात सिमेंट रस्त्याचे काम सुरू आहे. सोमवारी आलेल्या पावसामुळे पाणी तुंबले व अनेक नागरिकांच्या घरात पाणी शिरले. यामुळे नागरिक संतापले व उद्घाटनाच्या वेळी तुम्ही समोर समोर करता, आता आमची समस्या सोडविण्यासाठी समोर या असे चौधरी यांना सुनावले. चौधरी यांनी कंत्राटदाराला फोन केला व रस्त्यावरील मलबा दूर करण्यास सांगितले. त्यावेळी जवळपास शंभर लोक उपस्थित होते. काही वेळाने चौधरी घराकडे जाण्यास निघाले असता मंगेश उर्फ संजय श्रावण शेरकर (५५,अयोध्यानगर) याने चौधरी यांना शिवीगाळ करत जेसीबी त्याच्या घराजवळ नेण्यास सांगितले. त्यानंतर दोन अनोळखी तरुणांनी येऊन चौधरी यांना मारहाण केली. तर शुभम श्रावण शेरकरने पेव्हर ब्लॉक उचलून चौधरी यांच्या कपाळावर प्रहार केला. त्यानंतर दोघेही शिवीगाळ करत व जीवे मारण्याची धमकी देत पळून गेले. चौधरी यांना नागरिकांनी खाजगी इस्पितळात नेले व त्यांच्यावर चार टाके लागले. यानंतर चौधरी यांच्या तक्रारीवरून हुडकेश्वर पोलीस ठाण्यात चारही आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

आरोपीच्या कुटुंबियांचा दावा, चौधरींकडूनच धमकीदरम्यान, यासंदर्भात आरोपीच्या कुटुंबियांनी ‘लोकमत’ला फोन करून या प्रकरणात कुठलीही मारहाण झाली नसल्याचा दावा केला. चौधरी नेतागिरी करण्यासाठी पोहोचल्यावर आम्ही आमच्या घराची स्थिती पाहण्याबाबत म्हटले. मात्र चौधरीच दगड घेऊन मारण्यासाठी धावले व त्यांनी तो फेकून मारला. शेरकर खाली वाकल्यामुळे बचावले. चौधरीला पकडण्याच्या प्रयत्नात दोघेही खाली पडले व त्यात चौधरीला जखम झाली. चौधरी दारूच्या नशेत होते व रात्री चौधरी यांचे समर्थक आमच्या घरात शिरले व जीवे मारण्याची धमकी दिली. तसेच घरातील महिलांनादेखील अश्लिल शिवीगाळ करत धक्काबुक्की केली. पोलीस ठाण्यात गेलो असता चौधरीने तेथेच तुमच्या घरातच कार्यक्रम करायचा आहे का या शब्दांत धमकी दिल्याचा आरोप शेरकरच्या कुटुंबियांनी केला आहे. राजकीय नेत्यांच्या दबावात आमच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून चौधरीविरोधात कारवाई का झाली नाही असा सवाल उपस्थित करण्यात आला आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी