नि:स्वार्थ सेवेचे व्रत : देवता लाईफ फाऊंडेशननागपूर : समाजाचे काही तरी देणे असते. ते ऋ ण फेडता यावे या नि:स्वार्थ भावनेतून ‘देवता लाईफ फाऊंडेशन’ ही संस्था गरजू व गरिबांसाठी ‘देवदूत ’ म्हणून पुढे आली आहे. कडाक्याच्या थंडीत रस्त्याच्या फुटपाथवर उघड्यावर झोपणाऱ्या गरिबांच्या अंगावर हळूच ब्लँकेट ओढवून त्यांना मदतीची उब देणाऱ्या या संस्थेने आता समाजातील गरीब व होतकरू विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची जबाबदारी स्वीकारू न त्यांना ‘आयएएस’ बनविण्याचा मानस संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी शनिवारी ‘लोकमत’ व्यासपीठाच्या मंचावर व्यक्त केला. या चर्चेत फाऊंडेशनचे अध्यक्ष किशोर बावणे, सचिव सुधीर बाहेती, अस्मिता बावणे, डॉ. धनश्री गंधारे, उषा साकोरे यांनी भाग घेतला होता. समाजाने आपल्याला काय दिले,असे म्हणण्यापेक्षा समाजाला आपण काय दिले, याचा विचार करू न, नि:स्वार्थ समाजसेवेसाठी ‘देवता लाईफ फाऊंडेशन’ ची मागील वर्षभरापूर्वी स्थापना करण्यात आली आहे. वर्षभरातच या संस्थेशी तब्बल एक हजार लोक जुळले असून, फाऊंडेशनचे सदस्य झाले आहेत. संस्थेला समाजातील प्रत्येक गरजू घटकापर्यंत पोहोचता यावे, यासाठी संस्थेतील पदाधिकाऱ्यांच्या स्वतंत्र विंग तयार करण्यात आल्या आहेत. त्यानुसार कुणी युथ वेलफेअरसाठी, तर कुणी तरुण पिढीच्या व्यसनमुक्तीसाठी काम करीत आहे. यात गरीब विद्यार्थ्यांचे शिक्षण व आरोग्यावर विशेष लक्ष केंद्रित केले जाणार असून, गरजूंना आवश्यक ती सर्व मदत फाऊंडेशनतर्फे पुरविली जाणार असल्याचे यावेळी संस्थेचे अध्यक्ष किशोर बावणे यांनी सांगितले. सोबतच त्यांनी समाजातील अशा गरजूंनी फाऊंडेशनशी संपर्क साधावा, असेही आवाहन केले आहे. (प्रतिनिधी)२६ जानेवारी रोजी गरम कपडे गोळा करणार सध्या संपूर्ण विदर्भासह उपराजधानीत कडाक्याच्या थंडीची लाट उसळली असून, पारा ५.१ अंशापर्यंत खाली घसरला आहे. मात्र या कडाक्याच्या थंडीतही अनेक गरीब फुटपाथवरील उघड्यावर झोपत आहेत. या लोकांना गरम कपडे मिळावेत, या हेतूने ‘देवता लाईफ फाऊंडेशन’ च्या माध्यमातून २६ जानेवारी रोजी लॉ कॉलेज चौक ते खामला चौकापर्यंत लोकांकडून गरम कपडे गोळा करू न, त्यानंतर ते गरजू व गरिब लोकांना वाटप करण्यात येणार असल्याचे यावेळी संस्थेचे सचिव सुधीर बाहेती यांनी सांगितले. तरी नागरिकांनी फाऊंडेशनच्या स्वयंसेवकांकडे गरम कपडे जमा करावेत, असे आवाहन केले आहे. असे आहे फाऊंडेशनअध्यक्ष : किशोर बावणे, सचिव : सुधीर बाहेती, कोषाध्यक्ष : चंद्रकला वसुले, नीलिमा बावणे, प्रेमलता बाहेती, अस्मिता बावणे, कस्तुरी बावणे, डॉ. निखिल बलन्की, डॉ. सतीश देवळे, डॉ. धनश्री गंधारे व डॉ. उषा साकोरे .
गरजू आणि गरिबांसाठी ‘देवदूत’!
By admin | Updated: January 24, 2016 03:01 IST