शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

अंगणवाडी सेविका होणार स्मार्ट; कामकाजाचे नियंत्रण स्मार्ट फोनद्वारे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2018 12:13 IST

एकात्मिक बाल विकास सेवा योजनेंतर्गत बालकांच्या सुदृढ आरोग्यासाठी सातत्याने कार्य करणाऱ्या अंगणवाडी सेविका आता स्मार्ट होणार आहे.

ठळक मुद्दे‘पोषण अभियान’वर आॅनलाईन वॉच

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : एकात्मिक बाल विकास सेवा योजनेंतर्गत बालकांच्या सुदृढ आरोग्यासाठी सातत्याने कार्य करणाऱ्या अंगणवाडी सेविका आता स्मार्ट होणार आहे. यासाठी केंद्र सरकारने ‘पोषण अभियान’ सुरू केले आहे. या अभियानांतर्गत अंगणवाडीतून बालकांसह स्तनदा गरोदर माता, किशोरवयीन मुली यांना दर्जेदार सुविधा उपलब्ध करण्यासोबतच, विविध योजनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी अंगणवाडी सेविकांना स्मार्ट (अ‍ॅन्ड्राईड) फोन सिमकार्ड व डाटाप्लॅनसह देण्यात येणार आहे.पोषण अभियानांतर्गत पुढील तीन वर्षात निश्चित उद्दिष्टे साध्य करावयाची आहेत. त्यात ० ते ६ वर्ष वयोगटातील बालकांतील खुजे/बुटकेपणाचे प्रमाण कमी करणे, बालकांमधील कुपोषणाचे प्रमाण कमी करणे, बालकांतील रक्तक्षय, जन्मत: कमी वजनाचे असणाऱ्या बालकांचे प्रमाण कमी करणे. तसेच किशोरवयीन मुली व महिलांमधील रक्तक्षयाचे प्रमाण कमी करणे. सोबतच बाळाच्या जन्मानंतरचे पहिले एक हजार दिवस यावर विशेष लक्ष केंद्रित करण्यात येणार आहे. या अभियानांतर्गत पुढील तीन वर्षात अंगणवाडी केंद्र इमारतीचे बळकटीकरण करणे, यामध्ये इमारत बांधकाम, बालकांना स्वच्छ पिण्याचे पाणी उपलब्ध करणे, शौचालय सुविधा, आदींसह प्रभावी आरोग्य सेवा देणे. महिलांची प्रसुतीपूर्व व प्रसुतीपश्चात आरोग्य तपासणी. बालकांची आरोग्य तपासणी, लसीकरण, आरोग्य-शिक्षण आदींचा समावेश आहे. त्याचप्रमाणे बालकांतील कुपोषणाचे प्रमाण येत्या तीन वर्षात दरवर्षी दोन टक्क्यांप्रमाणे सहा टक्के कमी करण्यात येणार आहे. यासोबतच अ‍ॅनेमियाचेही प्रमाण दरवर्षी तीन टक्क्यांप्रमाणे तीन वर्षांत नऊ टक्के कमी करण्याचे नियोजनबध्द प्रयत्न होणार आहेत. या सर्व कामकाजाची माहिती, संचालनाची जबाबादारी अंगणवाडी सेविकांवर आहे. सर्व कामांचा इत्थंभूत डाटा अ‍ॅण्डरॉईडच्या माध्यमातून अधिकाºयांना वरिष्ठ पातळीवर उपलब्ध होता यावा म्हणून स्मार्ट फोन त्यांना देण्यात येणार आहे.

या माध्यमातून होणार अंगणवाडीचे डिजिटलायझेशनजिल्ह्यात २४२३ तर शहरात ९८१ अंगणवाड्या कार्यरत आहे. या अभियानांतर्गत सर्व अंगणवाडी सेविकांना अ‍ॅन्ड्राईड फोन सीमकार्ड व फोरजी नेटवर्क डाटा प्लॅनसह देण्यात येणार असून, यामार्फत अंगणवाडी केंद्राचे डिजिटलायझेशन करण्यात येणार आहे. त्यासाठी प्रती ३ महिन्याकरिता ४०० रुपये प्रमाणे एका वर्षासाठी १६०० रुपये प्रतिअंगणवाडी सेविका व पर्यवेक्षिकांना देण्यात येईल. यासाठी वापरण्यात येणाऱ्या सॉफ्टवेअरचे प्रशिक्षण देण्यात येईल. सोबतच शंभर टक्के बालकांचे आधारकार्ड काढणे, केंद्रामध्ये दरमहा ‘व्हिलेज हेल्थ सॅनिटेशन अ‍ॅन्ड न्यूट्रेशन डे’ व ‘कम्युनिटी बेस इव्हेंट’ साजरी करण्यात येईल.

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्र