शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

अंगणवाडी साहित्य घोटाळा ; पोलिसात तक्रार दाखल

By गणेश हुड | Updated: May 31, 2024 22:27 IST

जि.प.अधिकाऱ्यांसह पुरवठादार अडचणीत.

नागपूर : अंगणवाडी साहित्य घोटाळाप्रकरणी जिल्हा परिषद प्रशासनाने ग्रामीण पोलिस अधीक्षक यांच्याकडे  तक्रार पत्र दिले आहे. यामुळे महिला बाल कल्याण विभागाचे उपमुख्यकार्यकारी, पंचायत समिती स्तरावरील सीडीपीओ यांच्यासह पुरवठादारांच्या अडचणी वाढल्या आहेत.  

अंगणवाडी श्रेणीवर्धन योजनेंतर्गत अंगणवाड्यांमध्ये साहित्याचा पुरवठा करण्यासाठी दोन टप्प्यात १ कोटी ६ लाखांचा निधी जिल्हा परिषदेला मिळाला. हा सर्व निधी पंचायत समिती स्तरावरील सीडीपीओ यांच्या खात्यात वळता करण्यात आला.  जिल्हा परिषदेच्या ४९ अंगणवाड्यांना  साहित्याचा पुरवठा  करण्यापूर्वीच कंत्राटदाराने  बील उचलून जिल्हा परिषदेची फसवणूक केल्याने या प्रकरणाची चौकशी करून  दोषी अधिकाऱ्यांसह कंत्राटदारांवर पोलिसात गुन्हा दाखल करण्याची मागणी   जि.प.उपाध्यक्ष कुंदा राऊत यांनी  मुख्यकार्यकारी अधिकारी सौम्या शर्मा यांना  दिलेल्या पत्रातून केली होती. दरम्यान  या प्रकरणाच्या चौकशीसाठी नियुक्त समितीच्या प्राथमिक अहवालात पुरवठादारांच्या नावाचा कुठेही उल्लेख करण्यात आला नव्हता. त्यामुळे राऊत यांनी सुधारित चौकशी अहवाल सादर करण्याची सूचना केली होती. त्यानुसार सुधारित अहवालात अधिकाऱ्यांसह पुरवठादारांच्या नावांचा समावेश करण्यात आला. 

तीन सदस्यीय  चौकशी समितीने आपल्या अहवालात सीडीपीओसह अधिकाऱ्यांवर ठपका ठेवला.  पुरवठादारालाही दोषी धरत ८४ लाख रुपये वसुलीस पात्र असल्याचा  अहवालात उल्लेख केला. या प्रकरणी आता जिल्हा परिषद प्रशासनाने ग्रामीण पोलिस अधीक्षकांकडे तक्रार केली आहे. हा संपूर्ण प्रकार ग्रामीण भागातील असल्याने पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांच्याकडे तक्रार केली आहे. जि.प.प्रशासनाकडून पत्र मिळाल्याला त्यांनी दुजोरा दिला आहे.

टॅग्स :nagpurनागपूर