शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
2
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
3
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
4
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
5
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
6
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
7
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
8
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
9
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
10
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
11
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
12
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
13
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
14
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
15
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
16
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
17
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
20
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
Daily Top 2Weekly Top 5

अ‍ॅनिमिया क्लिनीकमुळे जोखमी मातांचा वाचणार जीव!

By सुमेध वाघमार | Updated: July 13, 2024 18:22 IST

डागा रुग्णालय : गर्भवतींचे धोक्याचा आधारावर चार रंगात वर्गीकरण

सुमेध वाघमारे नागपूर : हिमोग्लोबिनची कमतरता आणि प्रसूतीदरम्यान जास्त रक्तस्त्रावामुळे माता मृत्यूचा धोका वाढतो. अशा उच्च जोखमीच्या गरोदर मातांसाठी डागा स्मृती शासकीय महिला रुग्णालयात ‘अ‍ॅनिमिया क्लिनिक’ सुरू करण्यात आले आहे. मातांचा जीव वाचविण्यासाठी घेण्यात आलेल्या या पुढाकाराचे कौतुक होत आहे.      

डागा रुग्णालयात प्रसूतीसाठी येणाºया महिलांमध्ये आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील महिलांची संख्या अधिक आहे. येथे दररोज जवळपास ३० ते ५० प्रसूती होतात. यापैकी सुमारे ५० टक्के महिला जोखीम गटातातील असतात. या महिलांची प्रसूती दरम्यान येणारी गुंतागुंत टाळण्यासाठी डागा रुग्णालयात अ‍ॅनिमिया मुक्त भारत अभियानांतर्गत स्वतंत्र क्लिनीक सुरू करण्यात आले. येथे दर तीन महिन्यांनी गरोदर मातांच्या हिमोग्लोबिन पातळीचे परीक्षण केले जाते. कमतरता आढळल्यास गरोदर मातांच्या रक्तातील हिमोग्लोबिनची पातळी वाढवण्यावर भर दिला जातो. 

वर्षभरात ९३७ महिलांना लाभमागील वर्षात जोखमीच्या ९३७ गर्भवती महिलांना ‘आर्यन सुक्रोज’ इंजेक्शनचे ३,७४८ डोस देण्यात आले. गेल्या जूनमध्ये १०६ गर्भवती महिलांना ४२५ डोस देण्यात आले. त्यामुळे त्यांची हिमोग्लोबिन पातळी वाढली असून सुरक्षित प्रसूती होण्याची शक्यता कित्येक पटीने वाढली आहे. 

गर्भवतींचे कलर कोडिंग वर्गीकरणउच्च जोखमींच्या गर्भवती महिलांचे धोक्याच्या आधारावर कलर कोडिंग वर्गीकरण केले जाते. पिवळा, हिरवा, निळा आणि लाल या चार रंगांमध्ये वर्गीकृत करण्यात येते. महिलांच्या नोंदणी कार्डावर हे रंग असतात. थायरॉईड रुग्णांसाठी पिवळे, सामान्यसाठी हिरवे, उच्च रक्तदाबासाठी निळे आणि उच्च जोखमीसाठी लाल चिन्हांकन केले जाते. या महिलांची हिमोग्लोबिन चाचणी दर तीन महिन्यांनी तपासली जाते. त्या आधारावर हिमोग्लोबिनची पातळी वाढवण्यासाठी आहारविषयक सल्ले आणि आयर्न सप्लिमेंट्स  दिले जातात. हिमोग्लोबिनची पातळी वाढत नसल्यास, लोह सुक्रोजचे चार डोस दिले जातात.

टॅग्स :nagpurनागपूर