सावनेर : देशाचे दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त जिल्हा काँग्रेससह विविध सामाजिक व शैक्षणिक संघटनांच्या वतीने आदरांजली अर्पण करण्यात आली. सावनेर येथे नगर परिषद कार्यालयात काँग्रेसच्या नगरसेवक आणि कार्यकर्त्यांनी राजीव गांधी यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करीत आदरांजली अर्पण केली. याप्रसंगी काँग्रेसचे गटनेते सुनील चाफेकर, नीलेश पटे, दीपक बसवार, लक्ष्मीकांत दिवटे, दीपक कटारे, सरपंच सोनू रावसाहेब, चंद्रशेखर कामदार, डॉ. योगेश पाटील, अश्विन कारोकर, आकाश कमाले आदी उपस्थित होते.
---------------------------
नांदा फाटा परिसरात वृक्षारोपण
नरखेड : तालुक्यातील येनिकोनी येथे नांदा फाटा परिसरात माजी पंतप्रधान दिवंगत राजीव गांधी यांच्या जयंती निमित्ताने महात्मा गांधी रोजगार हमी योजनेंतर्गत ग्रामपंचायतर्फे वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी पं.स. सभापती नीलिमा रेवतकर यांच्या उपस्थितीत पाच एकर क्षेत्रात १८०० झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले. बेरोजगारांना रोजगार व हिरवेगार परिसर निर्माण करण्यासाठी सीताफळ, जांभूळ, आंबा, निम, सिसम ही बाराही महिने गारवा देणारी तसेच जमिनीत पाणी धरून ठेवणारी झाडे लावण्यात आली आहेत. कार्यक्रमाला जि.प. माजी सदस्या देवका बोडखे, सरपंच उषा मनीष फुके, सदस्य प्रभाकर सलामे, सोमराज पंचभाई, अर्चना खापरे, रेखा तुमडाम, उज्ज्वला राऊत, सचिव मंजुषा दळवी, कल्पना पाटील, रोजगार सेवक सुरेंद्र वाघमारे, विवेक बालपांडे, गजानन नेहारे, हेमराज डाखोळे, अनिल खापरे आदी उपस्थित होते.
---------------------------