नागपूर : वरच्या माळ्यावर चढत असतानाच दीपिका ही मुलाला घेऊन खाली उतरताना दिसली. लुटारुंना पाहून तिने ओरडण्याचा प्रयत्न करताच लुटारुंनी तिच्या मुलाला हिसकले. त्याला ठार मारण्याची धमकी देत तिजोरीच्या चाव्या मागितल्या. थरथरत ती चाव्या शोधत असतानाच रोशनी पेटकर या आंघोळ करून बाथरूममधून बाहेर आल्या. अचानक लुटारूंना पाहून त्या ओरडल्या. त्याच क्षणी लुटारूंनी त्यांच्या तोंडाला चिकटपट्टी लावण्याच्या प्रयत्नात दोरीसारख्या वस्तूने त्यांचा गळा आवळून खून केला. आरडाओरड ऐकून कुणीतरी येत असल्याचे समजताच दोन्ही लुटारु मुलाला सोडून भिंत ओलांडून पळून गेले. लोकांनी बेशुद्धावस्थेतील रोशनी पेटकर यांना मेडिकल कॉलेज इस्पितळाकडे नेले. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. या घटनेबाबत समजताच घटनास्थळीे पोलीस उपायुक्त अभिनाशकुमार, सुनील कोल्हे, सहायक पोलीस आयुक्त नीलेश राऊत, अजनी पोलीस ठाण्याचे निरीक्षक लक्ष्मण डुमरे आणि प्रचंड ताफा दाखल झाला होता. श्वान आणि ठसे तज्ज्ञांनाही पाचारण करण्यात आले होते. लुटारुंचा शोध घेण्यासाठी शहरात नाकेबंदी करून पथके रवाना करण्यात आलेली आहेत. अद्याप कोणताही सुगावा पोलिसांना लागलेला नाही. अजनी आणि गुन्हेशाखा पथक लुटारुंचा शोध घेत आहेत. दरम्यान अजनी पोलिसांनी दीपिका स्वप्निल पेटकर हिच्या तक्रारीवरून लुटारुंविरुद्ध भादंविच्या ३०२, ३९८, ४५९ आणि मुंबई पोलीस कायद्याच्या १३५ कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.
अन् लुटारूंनी दोरीने गळा आवळला
By admin | Updated: July 14, 2014 02:52 IST