शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

अन् ते गदगद झाले...! चोरीला गेलेला ८४ लाखांचा ऐवज केला परत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2019 00:32 IST

काटकसर करून, पै-पैसा जोडून दागिने बनविले होते. एका झटक्यात ते चोरीला गेले. त्यामुळे खूप दु:ख झाले होते. अनेक दिवस झोपच आली नव्हती. दिवस गेले अन् चोरट्यांनी नेलेल्या दागिन्यांची आसही मावळली मात्र तुमचे दागिने सापडले ते तुम्हाला परत दिले जाणार आहे, असा पोलिसांकडून निरोप मिळाला. ते ऐकून कानावर विश्वासच बसत नव्हता. आज आपले दागिने आपल्या हातात पडले. हा आनंद शब्दातीत आहे, अशी प्रतिक्रिया संबंधितांनी नोंदवली.

ठळक मुद्देनागपूर शहर पोलिसांचा स्तुत्य उपक्रम

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : काटकसर करून, पै-पैसा जोडून दागिने बनविले होते. एका झटक्यात ते चोरीला गेले. त्यामुळे खूप दु:ख झाले होते. अनेक दिवस झोपच आली नव्हती. दिवस गेले अन् चोरट्यांनी नेलेल्या दागिन्यांची आसही मावळली मात्र तुमचे दागिने सापडले ते तुम्हाला परत दिले जाणार आहे, असा पोलिसांकडून निरोप मिळाला. ते ऐकून कानावर विश्वासच बसत नव्हता. आज आपले दागिने आपल्या हातात पडले. हा आनंद शब्दातीत आहे, अशी प्रतिक्रिया संबंधितांनी नोंदवली.शहरातील ३० पोलीस ठाण्यांतर्गत झालेल्या चोरी, घरफोडी, जबरी चोरी, लुटमार आदी घटनांमध्ये ज्या गुन्ह्यांचा छडा लागला आणि ज्या गुन्ह्यातील ऐवज पोलिसांनी जप्त केला. तो ऐवज ज्याचा त्यांना परत करण्याची कल्पना पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय आणि सहआयुक्त रवींद्र कदम यांनी महिनाभरापूर्वी परिमंडळ निहाय बैठकीत मांडली होती. त्यासंबंधाने न्यायालयीन प्रक्रिया पार पाडावी. प्रत्येक पोलीस ठाण्यात संबंधितांना तशा सूचना करून त्यांच्याकडून चीजवस्तू, दागिने परत मिळण्यासंबंधी फक्त अर्ज घ्यावा. नंतरची सर्व कायदेशीर प्रक्रिया पोलिसांनी पार पाडावी, असेही ठाणेदारांना कळविण्यात आले होते. त्यानुसार, महिनाभरात ही सर्व प्रक्रिया पार पाडण्यात आली. त्यानंतर संबंधितांना पत्र देऊन तुमचा मुद्देमाल ४ जानेवारीला तुम्हाला पोलीस आयुक्तालयात परत मिळणार आहे, अशी सूचनाही करण्यात आली होती.त्यानुसार, पोलीस आयुक्तालयातील हिरवळीवर आज एका कार्यक्रमाचे दुपारी ४ वाजता आयोजन करण्यात आले होते. चोरीला गेलेला आपला मुद्देमाल परत घेण्यासाठी २२१ महिला-पुरुष तेथे जमले. पोलीस आयुक्त डॉ. उपाध्याय, सहआयुक्त कदम, अतिरिक्त आयुक्त बी. जी. गायकर यांच्या हस्ते संबंधितांना त्यांचे दागिने आणि इतर मुद्देमाल परत करण्यात आला. यावेळी पोलीस आयुक्त, सहआयुक्तांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाला शहरातील बहुतांश उपायुक्त, सहायक आयुक्त आणि काही ठाणेदार उपस्थित होते. कार्यक्रमाची प्रस्तावना आणि आभार प्रदर्शन गुन्हे शाखेचे उपायुक्त संभाजी कदम यांनी केलेत्या चोराचे आभार : पोलीस आयुक्त डॉ. उपाध्यायचोरलेला माल ज्यांचा त्यांना परत करण्याची कल्पना कशी सुचली ते स्पष्ट करताना पोलीस आयुक्तांनी त्यांचा स्वत:चा एक अनुभव कथन केला. ते म्हणाले, मी पोलीस दलात आल्यानंतर पंढरपूर येथे रुजू व्हायला निघालो. बॅगमध्ये सर्व प्रमाणपत्रे आणि एक ब्लँकेट होते. प्रवासात चोरट्याने ती बॅग लंपास केली. मी अस्वस्थ झालो. सर्व महत्त्वाची कागदपत्रे, प्रमाणपत्रे कशी परत मिळणार, अशा विचारात असतानाच मला एक कुरिअर मिळाले. चोरट्याने माझी सर्वच्या सर्व कागदपत्रे परत पाठविली होती. पत्नीने मोठ्या प्रेमाने दिलेले ब्लँकेट मात्र चोरट्याने ठेवून घेतले होते, अशी मिश्कील आठवण सांगून त्यांनी उपस्थितांच्या टाळ्या घेतल्या.ती भावना खूप महत्त्वाची : उपायुक्त पोद्दारयावेळी पोलीस उपायुक्त हर्ष पोद्दार यांनीही आपली भावना व्यक्त केली. रुग्णालयात तपासणीसाठी आलेले उपायुक्त पोद्दार यांची हिरेजडित अंगठी रुग्णालयातील कर्मचाऱ्याने लंपास केली होती. ही त्यांची एंगेजमेंट रिंग होती. त्यामुळे ती चोरीला गेल्याने अपण खूप अस्वस्थ झालो होतो. मात्र ती परत मिळाल्यानंतर जो आनंद झाला, ते शब्दात सांगणे कठीण आहे, असेही उपायुक्त पोद्दार म्हणाले.पीडित : २२१ ; एकूण चीजवस्तू : २५५(रोख, विविध प्रकारचे दागिने, मोबाईल आणि वाहने) किंमत : ८४ लाख ५१ हजार २२६ रुपये

 

टॅग्स :police commissioner office Nagpurपोलीस आयुक्त कार्यालयtheftचोरी