शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०२७मध्ये गोव्यात ‘आप’ स्वबळावर सरकार स्थापन करेल”: अरविंद केजरीवाल; भाजपा-काँग्रेसवर टीका
2
आणखी एका मुलीने गमावला जीव, मृतांचा आकडा १० वर; काँग्रेसची ५० लाख भरपाई देण्याची मागणी
3
...तर रोहित-विराटवर वनडे वर्ल्ड कप स्पर्धेआधीच निवृत्ती घेण्याची वेळ येणार?
4
बिहारमध्ये लालू यादवांच्या निवासस्थांनी उमेदवारीवरून गोंधळ, घरात घुसले कार्यकर्ते, म्हणाले, आम्हाला...  
5
“राहुल गांधी यांचा पासपोर्ट जप्त करावा अन् कायदेशीर कारवाई करावी”; भाजपा नेत्यांची मागणी
6
रोहित शर्माने कप्तानी सोडली की त्याला हटवलं? निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
7
निसर्ग अशांतच! अतिवृष्टीनंतर आता ‘शक्ती’ चक्रीवादळाचा धोका; किनारपट्टी भागात सतर्कतेचा इशारा
8
वनडे क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार; रोहित शर्मा दुसरा, मग पहिला कोण?
9
फर्रुखाबादमधील कोचिंग सेंटरमध्ये भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, सहा जण जखमी
10
“सोनम वांगचूक यांना सोडून द्यावे, नवीन पिढीसाठी मोठे योगदान”: शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद
11
४८ तासांत मंजूर झाले कोट्यवधींचे कर्ज ! भंडारा, नागपूर जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या नावे कर्ज घोटाळा; ईडीकडून कारवाईचा धडाका
12
“अनिल परब अर्धवट वकील”; रामदास कदमांचा पलटवार, पत्नीने जाळून घेतले की? यावरही दिले उत्तर
13
Video - "मी तुला गोळी मारेन, कोणी वाचवणार नाही"; भाजपा नेत्याची गुंडगिरी, डान्सरवर उधळले पैसे
14
प्रवाशांची दिवाळी! मुंबई-गोवा ‘वंदे भारत’च्या फेऱ्या वाढणार; कोकणवासीयांना फायदा, नवे टाइमटेबल
15
Kojagiri Purnima 2025: कोजागरीला कोणत्या उपासनेने होते शीघ्र लक्ष्मीकृपा? वाचा 'हे' प्रभावी स्तोत्र
16
Pakistan: खेळणं समजून शाळेत नेला बॉम्ब, वर्गात जाताच मोठा स्फोट; अनेक विद्यार्थी जखमी
17
Kojagiri Purnima 2025: शास्त्रानुसार कोजागरीच्या रात्री जागरण आणि पूजा केल्याने होते लक्ष्मीकृपा; वाचा व्रतविधी!
18
Kojagiri Purnima 2025: कोजागरीला लक्ष्मी योगात 'या' राशींवर बरसणार सुख-संपत्तीचे चांदणे!
19
"त्यांचा आशीर्वादच मिळाल्याची भावना होती...", संध्या शांताराम यांच्या निधनानंतर प्रिया बेर्डेंनी दिला आठवणींना उजाळा
20
“आम्ही युती-आघाडीचे बळी ठरलो, आता स्थानिकांच्या भावना लक्षात घेणार”; उद्धव ठाकरे थेट बोलले

अन् स्टारबसने घेतला पेट

By admin | Updated: June 12, 2014 01:17 IST

स्टारबसमध्ये प्रवासी चढल्यानंतर बस सुरू करताच बसच्या इंजिनमधून अचानक धूर बाहेर येऊ लागला. त्यामुळे चालकाने समयसूचकता बाळगत बसमधील सर्व प्रवाशांना खाली उतरविले

सुदैवाने प्राणहानी टळली : बुटीबोरी येथील घटनाबेला : स्टारबसमध्ये प्रवासी चढल्यानंतर बस सुरू करताच बसच्या इंजिनमधून अचानक धूर बाहेर येऊ लागला. त्यामुळे चालकाने समयसूचकता बाळगत बसमधील सर्व प्रवाशांना खाली उतरविले आणि क्षणार्धात या स्टारबसने पेट घेतला. सुदैवाने यात कुणीही जखमी झाले नाही. ही घटना बुटीबोरी येथील एमआयडीसी चौकात बुधवारी सकाळी १०.३० वाजताच्या सुमारास घडली.बसचालक युवराज गुलाबराव बाजारे (४२, रा. सुभेदार ले-आऊट, नागपूर) हा एमएच-३१/सीए-६२२९ क्रमांकाच्या स्टारबसमध्ये काही प्रवासी घेऊन बुटीबोरी एमआयडीसी परिसरातील मुरारजी कंपनी चौकातून नागपूरकडे यायला निघाला. थांबा असल्याने ही बस सकाळी १०.३० वाजताच्या सुमारास स्थानिक एमआयडीसी चौकात थांबली. येथे प्रवासी बसमध्ये चढल्यानंतर युवराज बाजारे याने ही बस सुरू केली. गियर टाकताच या बसच्या इंजिनमधून धूर बाहेर येत असल्याचे बसचालकाच्या निदर्शनास आहे. त्यामुळे त्याने समयसूचकता बाळगत स्वत: बसखाली उतरला आणि बसमधील सर्व प्रवाशांना उतरविले. यावेळी प्रवाशांनीही प्रसंगावधान बाळगत उतरण्यासाठी गोंधळ केला नाही. या बसमध्ये अंदाजे २५ प्रवासी होते. प्रवासी बसमधून उतरताच त्यांना काही कळण्याच्या आत या बसने पेट घेतला. लागलीच सदर घटनेची माहिती बुटीबोरी पोलिसांना देण्यात आली. काही वेळातच एमआयडीसीच्या अग्निशमन दलाचे वाहन घटनास्थळी पोहोचले. अंदाजे अर्धा तासात आगीवर नियंत्रण मिळविण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश आले. ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागली असल्याची माहिती बुटीबोरी पोलिसांनी दिली. यात बसचे अंदाजे दोन लाख रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती दिली. (वार्ताहर)