शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
3
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
4
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
5
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
6
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
7
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
8
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
9
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
10
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
11
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
12
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
13
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
14
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
15
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
16
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
17
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
18
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
19
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
20
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
Daily Top 2Weekly Top 5

अन् ती नातेवाईकांत पोहचली!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2019 00:22 IST

नातेवाईक तिचा शोध घेत होते, तर पोलीस तिच्या नातेवाईकांचा! अखेर पोलिसांना तिच्या नातेवाईकांचा पत्ता कळला अन् २४ तासांपासून नातेवाईकांपासून दुरावल्याने प्रचंड अस्वस्थ असलेली ‘ती’ तिच्या नातेवाईकांमध्ये सुखरूप पोहचली.

ठळक मुद्दे२४ तासांची अस्वस्थता : पोलिसांमुळे बहीण-भावाची भेट

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नातेवाईक तिचा शोध घेत होते, तर पोलीस तिच्या नातेवाईकांचा! अखेर पोलिसांना तिच्या नातेवाईकांचा पत्ता कळला अन् २४ तासांपासून नातेवाईकांपासून दुरावल्याने प्रचंड अस्वस्थ असलेली ‘ती’ तिच्या नातेवाईकांमध्ये सुखरूप पोहचली.मुन्नी ऊर्फ फातिमा बी अब्दुल अजिज असे तिचे नाव. २७ वर्षीय मुन्नी यशोधरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कुंदनलाल गुप्ता नगरातील रहिवासी. रविवारी, ३० जूनला ती घरून निघाली अन् घरचा रस्ता विसरल्याने भटकत भटकत मानकापुरात आली. कावऱ्याबावºया अवस्थेतील मुन्नीकडे कर्तव्यावरील पोलिसांचे लक्ष गेले. त्यांनी तिला मानकापूर ठाण्यात आणले. तिची पोलीस आस्थेने चौकशी करू लागले. पुरती भांबावलेली ती, आपले नाव मुन्नी ऊर्फ फातिमा बी आहे, एवढेच सांगत होती. तिला घराचा पत्ता आठवत नव्हता. नातेवाईकांचीही नावे आठवत नव्हती. मानकापूर पोलिसांनी नियंत्रण कक्षाच्या माध्यमातून एक महिला सापडल्याची, मुन्नीच्या वर्णनासह माहिती दिली. शिवाय शहरातील कुण्या पोलीस ठाण्यात नमूद वर्णनाच्या महिलेची हरविल्याबाबत नोंद आहे काय, त्याचीही चौकशी केली. मात्र, कोणत्याही पोलीस ठाण्यात रविवारी रात्रीपर्यंत तशी नोंद झाली नव्हती. त्यामुळे मुन्नीचे नातेवाईक शोधून काढण्यासाठी मानकापूर पोलीस प्रयत्न करू लागले. दरम्यान, सोमवारी सकाळी पोलीस वैद्यकीय तपासणीसाठी मुन्नीला मेयोत घेऊन गेले.तिकडे मुन्नी रविवारपासून बेपत्ता झाल्याने तिचे अस्वस्थ नातेवाईक तिचा इकडे-तिकडे शोध घेऊ लागले. मुन्नीचा कुठेच पत्ता लागला नाही. त्यामुळे त्यांनी सोमवारी यशोधरानगर पोलीस ठाण्यात ती बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली. हा संदेश मानकापूर पोलिसांना सोमवारी सकाळी मिळाला आणि बेपत्ता महिलेशी मुन्नीचे वर्णन जुळत असल्याने मानकापूर पोलिसांनी मुन्नीचे कुंदनलाल गुप्तानगरातील घर गाठले. तेथे तिचा भाऊ मोहम्मद आसिफ अब्दुल अजिज (वय २८) याला हरविलेल्या मुन्नीचा मोबाईलमधून फोटो दाखविला. त्याने मुन्नी आपलीच बहीण असल्याचे पोलिसांना सांगितले. त्याला नातेवाईकांसह यशोधरानगर पोलीस ठाण्यात बोलवून घेण्यात आले. तेथे मुन्नीला तिच्या भावाच्या हवाली करण्यात आले. ठाणेदार वजीर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली नायक शिपाई वैशाली मोहोड, हवालदार सुनील मिलमिले आणि अनिल मिश्रा यांनी ही प्रशंसनीय कामगिरी बजावली.

टॅग्स :Missingबेपत्ता होणंWomenमहिलाPolice Stationपोलीस ठाणे