शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
3
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
4
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
5
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
6
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
7
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
8
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
9
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
10
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
11
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
12
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
13
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
14
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
15
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
16
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
17
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
18
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
19
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
20
पाकिस्तानी एअरलाइन्स PIAचा नवा मालक कोण होणार? 'या' कंपनीने लावली तब्बल १० लाख कोटींची बोली
Daily Top 2Weekly Top 5

...तर पाच वर्षात विदर्भाचे नंदनवन होईल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2017 01:32 IST

शेतकºयांच्या आत्महत्यांमुळे विदर्भाचे स्मशानघाट झाल्याची तीव्र प्रतिक्रिया एकदा न्यायालयाने व्यक्त केली होती.

ठळक मुद्देअविनाश काळे : ‘उद्याचा विदर्भ’ विषयावर चर्चासत्र

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शेतकºयांच्या आत्महत्यांमुळे विदर्भाचे स्मशानघाट झाल्याची तीव्र प्रतिक्रिया एकदा न्यायालयाने व्यक्त केली होती. सिंचनाच्या सुविधा नाहीत, शेतकºयांची अवस्था वाईट झाली आहे, युवकांना रोजगार नाही व येथील माणसाला संविधानात अपेक्षित प्रतिष्ठा नाही. महाराष्टÑात कुणाचेही सरकार आले तरी विदर्भाचा विकास होणे शक्य नसल्याचे आता स्पष्ट झाले आहे. त्यामुळे विदर्भ वेगळा करण्याशिवाय पर्याय नाही. स्मशानघाट झालेला हा प्रदेश विदर्भ वेगळा झाल्यास पाच वर्षांत नंदनवन होईल, असा विश्वास पत्रकार भवन येथे आयोजित चर्चासत्राच्या वेळी लोकनायक बापुजी अणे स्मारक समितीचे अ‍ॅड. अविनाश काळे यांनी व्यक्त केला.लोकनायक बापुजी अणे स्मारक समिती, टिळक पत्रकार भवन ट्रस्ट आणि श्रमिक पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने लोकनायक बापुजी अणे यांच्या जयंतीनिमित्त ‘उद्याचा विदर्भ’ या विषयावर चर्चासत्र आयोजित करण्यात आले. यावेळी स्मारक समितीचे संयोजक अ‍ॅड. अविनाश काळे, शेतितज्ज्ञ अमिताभ पावडे, हायकोर्ट बार असोसिएशन व जनमंचचे अध्यक्ष अ‍ॅड. अनिल किलोर, पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. शरद निंबाळकर, पत्रकार संघाचे विश्वास इंदूरकर आदी मान्यवर उपस्थित होते. चर्चासत्राची सुरुवात करताना अमिताभ पावडे यांनी सरकारवर टीका केली. नोटाबंदीमुळे देशाची उत्पादन व्यवस्था कोलमडली असून २४ लाख कोटींचे उद्योग डबघाईस आले आहेत. शहरात विकासाचा दहशतवाद पसरविला जात आहे, तर ग्रामीण क्षेत्र वंचित आहे. विदर्भाच्या विकासासाठी विदेशी गुंतवणुकीची गरज नाही, असे मत त्यांनी व्यक्त केले. डॉ. शरद निंबाळकर यांनी नागपूरचे उदाहरण देत विदर्भात जलसंकट निर्माण होणार असल्याची चिंता व्यक्त केली. तोतलाडोह व पेंचमधून नागपूरला १२०० दशलक्ष घनमीटर पाणी मिळत होते. मात्र मध्य प्रदेशने चौराई धरण बांधल्याने ६०० दशलक्ष घनमीटर पाणी कमी झाले आहे. दुसरीकडे विदर्भातील १८५ टीएमसी पाणी गोदावरीत वळते केले जात आहे. यामुळे विदर्भात जलसंकट निर्माण होईल. विश्वास इंदूरकर यांनीही यावेळी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे संचालन अ‍ॅड. संदेश सिंगलकर यांनी केले.मंत्रालय नागपूरलाच हवेहायकोर्ट बार असोसिएशचे अध्यक्ष अ‍ॅड. अनिल किलोर यांनी वेगळ्या विदर्भाच्या आवश्यकतेवर जोर दिला. विदर्भाला देण्यापेक्षा दुपटीने येथून नेले जाते, मात्र त्याचा हिशेब दिला जात नाही. मंत्रालय मुंबईत असल्याने येथील माणसाला कामासाठी तेथे जाणे शक्य नाही. नेते आणि अधिकाºयांना रेंजमध्ये ठेवण्यासाठी नागपूरला मंत्रालय ठेवल्याशिवास पर्याय नाही असे मत त्यांनी व्यक्त केले. कॉन्ट्रॅक्टर राजकारणी झाल्याने जनतेचे प्रश्न दुर्लक्षित झाल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.