शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

अन् आपला राजीनामा पाहून गडकरी झाले आश्चर्यचकित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2018 17:25 IST

जादूगराच्या विविध करामती पाहिल्यानंतर केंद्रीय रस्ते वाहतूक व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी त्यांना एक प्रमाणपत्र लिहून दिले. परंतु जादुगराने आपल्या हाताची कमाल दाखवित सफाईने या सर्टिफिकेटला गडकरी यांच्या राजीनाम्यात बदलविले.

ठळक मुद्देजादूगर एन. सी. सरकार यांची कमाल

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : जादूगराच्या विविध करामती पाहिल्यानंतर केंद्रीय रस्ते वाहतूक व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी त्यांना एक प्रमाणपत्र लिहून दिले. परंतु जादुगराने आपल्या हाताची कमाल दाखवित सफाईने या सर्टिफिकेटला गडकरी यांच्या राजीनाम्यात बदलविले. जेव्हा ते पत्र गडकरी यांच्या हातात आले तेव्हा ते ही आश्चर्यचकित झाले आणि जोर-जोराने हसू लागले.निमित्त होते दिलीप चिंचमलातपुरे यांच्या येथे आयोजित दिवाळी मिलन कार्यक्रमाचे. गडकरी यांचे जुने मित्रही या समारंभात सहभागी झाले होते. या कार्यक्रमादरम्यान सर्वांच्या मनोरंजनासाठी जादूगर एन.सी. सरकार यांना बोलावण्यात आले होते. जादूगर सरकार यांनी विविध कार्यक्रम सादर केले आणि नंतर गडकरी यांना एक प्रमाणपत्र लिहून दिले. ते टाईप केलेले होते. त्यात गडकरी यांनी त्यांच्या विभागात किती चांगले काम केले आहे, त्याचे कौतुक होते. नंतर ते काही जणांना वाचायला दिले. त्यांनीही ते मोठ्याने वाचून दाखविले. नंतर ते गडकरी यांच्या हातात देऊन वाचून दाखवण्याची विनंती केली. गडकरी यांनी ते प्रमाणपत्र वाचायला सुरुवात केली. तेव्हा त्यात लिहिले होते की, ‘मी संन्यास घेऊन हिमालयात जात आहे आणि आपल्या पदाचा राजीनामा देत आहे. उद्यापासून माझे पद श्री एन.सी. सरकार सांभाळतील.’’ हे वाचत असतांना गडकरी यांनाही हसू आवरता आले नाही. ते जोरजोराने हसू लागले, आणि त्यांच्यासोबत इतरही हसू लागले.

 

टॅग्स :Nitin Gadkariनितीन गडकरी