शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात  पाण्याची गळती शोधताना सापडला पुरातन नाला 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2019 22:17 IST

मागील १५ दिवसांपासून सुरू असलेली  पाण्याची गळती शोधताना इतवारी भागातील वल्लभाचार्य चौक (नंगा पुतळा) येथे रस्त्याच्या सात फूट खाली पुरातन नाला आढळून आला.

ठळक मुद्देपुनर्निर्माणासाठी महापौरांचे निर्देश : इतवारी येथील नंगा पुतळा येथे सात फूट खाली नाला

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मागील १५ दिवसांपासून सुरू असलेली  पाण्याची गळती शोधताना इतवारी भागातील वल्लभाचार्य चौक (नंगा पुतळा) येथे रस्त्याच्या सात फूट खाली पुरातन नाला आढळून आला. बुधवारी महापौर संदीप जोशी यांनी घटनास्थळाची पाहणी करून नाल्याचे पुनर्निर्माण करण्याचे आदेश दिले.इतवारी भागातील होलसेल क्लॉथ मार्केटजवळील नंगा पुतळा येथे रस्त्यावर पाणी वाहत होते. यासंदर्भात नागरिकांकडून तक्रार मिळाल्याने ओ.सी.डब्ल्यू. व जलप्रदाय विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी पाणी गळती शोधण्याचा प्रयत्न केला. वारंवार शोधूनही गळती न सापडल्यानंतर रविवारी पाणीपुरवठा बंद करण्यात आला. यानंतरही पाणी वाहत असल्याने सदर ठिकाणी खोदकाम करण्यात आले. खोदकाम करताना रस्त्याच्या सात फूट खाली नाला असल्याचे निदर्शनास आले.नाल्याची स्लॅब तोडून नाल्यातील कचरा आणि माती काढण्यात आली. यावेळी १० मीटर अंतरावर नाल्याच्या स्लॅबच्या खाली १५ इंचाची जुनी पाण्याची वाहिनी असून त्याखाली स्वयंचलित मशीनने टाकण्यात आलेल्या आॅप्टिकल फायबर केबलच्या पाईपमुळे सुमारे अडीच फुटाचा अडथळा निर्माण झाल्याचे दिसून आले. नाल्याची भिंत दगडाची असल्याने केबल टाकताना दगड कोसळले असावेत व दगड आणि पाईप यामुळे कचरा जमा होऊन हळूहळू नाला बुजला असावा, अशी शक्यता वर्तविली जात आहे.नाल्याची स्लॅब तोडून सफाई करण्यात आल्यानंतर पुढे नाल्याचा प्रवाह सुरळीत असल्याचे दिसून आले. मनपा आरोग्य विभागाचे कर्मचारी आणि पोकलेनच्या माध्यमातून नाल्यातील कचरा आणि माती काढून नाल्याचा प्रवाह सुरळीत करण्यात आला. सलग तीन दिवस प्रयत्न केल्यानंतर अखेर रस्त्यावरून पाणी वाहणे बंद झाले. ज्येष्ठ नगरसेवक दयाशंकर तिवारी यांच्या नेतृत्वात उपअभियंता रवींद्र बुंधाडे, कनिष्ठ अभियंता सुरेंद्र दुधे, तांत्रिक सहायक दुमाने, वरिष्ठ स्वास्थ निरीक्षक सुरेंद्र खरे, प्रभारी स्वास्थ निरीक्षक विपीन समुंद्रे यांच्या सहकार्याने संपूर्ण कार्यवाही पूर्ण करण्यात आली. अतिव्यस्त भागातील वाहतूक समस्या लक्षात घेता वाहतूक पोलिसांची मदत घेण्यात आली.कामाचे गांभीर्य लक्षात घेत नाल्याच्या ठिकाणी बांधकामाबाबत त्वरित नस्ती तयार करून तातडीने काम सुरू करण्याचे निर्देश संदीप जोशी यांनी गांधीबाग झोनचे सहायक आयुक्त अशोक पाटील यांना दिले.

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिका