शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
3
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
4
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
5
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
6
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
7
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
8
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
9
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
10
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
11
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
12
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
13
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
14
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
15
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
16
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
17
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
18
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
19
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
20
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
Daily Top 2Weekly Top 5

अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष जाे बायडेन कुटुंबीयांची एक शाखा नागपुरात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2020 11:04 IST

President of the United States Nagpur अमेरिकेचे नवे राष्ट्राध्यक्ष जाे बायडेन यांचे पूर्वज नागपुरात मुक्कामी आहेत. तब्बल १४७ वर्षापासून हे कुटुंब उपराजधानीत वास्तव्यास आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : अमेरिकेचे नवे राष्ट्राध्यक्ष जाे बायडेन यांचे पूर्वज नागपुरात मुक्कामी आहेत. तब्बल १४७ वर्षापासून हे कुटुंब उपराजधानीत वास्तव्यास आहेत. आजवर जराही चर्चेत नसलेले हे कुटुंब अमेरिकेत नवे राष्ट्रपती म्हणून जो बायडेन विजयी होताच चर्चेत आले आहे. खुद्द या कुटुंबातील काही सदस्यांनीच एका वृत्तसंस्थेशी बोलताना या नातेसंबंधाचा दावा केला आहे.

जो बायडेन अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष असताना २४ जुलै २०१३ ला मुंबईत आले होते. यावेळी एका समारंभात त्यांनी आपले काही पूर्वज मुंबई, नागपुरात राहत असल्याची आठवण सांगितली होती. वॉशिग्टनमधील एका कार्यक्रमातही २०१५ मध्ये त्यांनी ही आठवण सांगितली होती. १९७२ मध्ये सिनेटर बनल्यावर त्यांना भारतामधील एका नातेवाईकाचे पत्र आले होते. त्यावरून त्यांच्या कुटुंबातील एक पूर्वज भारतामध्ये ईस्ट इंडिया कंपनीत नोकरी करायचे हे कळाले. नागपुरात राहणारे के लेस्ली बायडेन यांनी हे पत्र लिहिले होते. आपले पणतू नागपुरात राहतात, असे त्यांनी कळविले होते. लेस्ली यांची पणती सोनिया बायडेन फ्रान्सिस या नागपुरात मनोचिकित्सक आहेत. नागपूर आणि भारतामध्ये अन्य ठिकाणी राहणाऱ्या बायडेन परिवारातील सदस्य जो बायडेन यांच्या विजयामुळे प्रचंड खुश असल्याचे त्या म्हणाल्या.

सोनिया म्हणाल्या, लेस्ली बायडेन नागपुरात राहायचे. ते भारत लॉज होस्टेल तसेेच भारत कॅफेमध्ये व्यवस्थापक होते. १९८३ मध्ये त्यांचे निधन झाले. ‘इलस्ट्रेटेड वीकली ऑफ इंडिया’चा तत्कालीन अंक वाचून लेस्ली यांना जो बायडेन सिनेटर झाल्याचे कळले होते. १५ एप्रिल १९८१ रोजी लेस्ली यांनी जो बायडेन यांना लिहिलेल्या पत्राचे उत्तर ३० मे १९८१ रोजी मिळाले होते. आनंद व्यक्त करून त्यांनी वंशावळीबद्दल उत्सुकतेने चौकशी केली केली होती. ही पत्रे या कुटुंबीयांसाठी आता मोलाचा ठेवा ठरली आहेत.

जानेवारी २०१८ मध्ये कुटुंबाच्या भेटी

सोनिया म्हणाल्या, नागपूर, मुंबई, न्यूझीलंड आणि अमेरिकेत राहणाऱ्या बायडेन परिवारातील सदस्य लेस्ली यांचे पणतू लेस्ली डेविड बायडेन यांच्या विवाहानिमित्त जानेवारी २०१८ मध्ये एकत्र आले होते. नागपुरात लेस्ली यांची सून एंजेलिना बायडेन यादेखील राहतात. २४ जुलै २०१३ रोजी मुंबईमधील एका समारंभात जो बायडेन यांनी या पत्राबद्दल उल्लेख करून वंशावळी विशेषज्ञांनी भारतामधील आपले पूर्वज शोधण्यासाठी मदत करावी, अशी विनंती केली होती.

टॅग्स :Joe Bidenज्यो बायडन