शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश
2
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
3
टॅरिफवर ट्रम्प यांचा आणखी एक यु-टर्न; आता 'या'वरील आयात शुल्क कमी करण्याची घोषणा
4
वाहतूक कोंडीने बेजार झालेल्या पुणेकरांना दिलासा मिळणार?; PMU च्या बैठकीत अजित पवारांचे महत्त्वाचे निर्देश
5
Akshaya Tritiya 2025: सोन्याची किंमत पाहून फुटतोय घाम? 'हा' आहे २४ कॅरेट सोनं स्वस्तात खरेदी करायचा जुगाड
6
भरत जाधवचं 'सही रे सही' नाटक कधी निरोप घेणार? केदार शिंदे म्हणाले, "ज्या दिवशी तो..."
7
पाकिस्तान दुष्ट राष्ट्र...! संयुक्त राष्ट्रांत भारताने पाकच्या संरक्षण मंत्र्यांची क्लिप ऐकविली
8
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा शरद पवार गटाला धक्का; २ माजी मंत्री पक्षात प्रवेश करणार
9
शाहरुख, सलमान की आमिर- कोणासोबत काम करायला जास्त आवडतं?; परेश रावल म्हणाले...
10
Badrinath Yatra: बद्रीनाथ मंदिर परिसरात फोटो काढणे, व्हिडीओ कॉल करण्यावर बंदी, 'हे' नियमही बदलले
11
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
12
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
13
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
14
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
15
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
16
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
17
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
18
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
19
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
20
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार

देशभक्तीच्या मंगलमय वातावरणात निघाली अमृत कलश यात्रा

By मंगेश व्यवहारे | Updated: October 20, 2023 14:24 IST

नागपूरातून अमृत कलश मुंबईला रवाना 

नागपूर : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त केंद्र आणि राज्य शासनाचा निर्देशानुसार ‘मेरी माटी, मेरा देश’ अभियानांतर्गत नागपूर महानगरपालिकेदवारे शहरातील माती राज्याची राजधानी मुंबई येथे पाठविण्यासाठी संविधान चौक ते मनपा मुख्यालयापर्यंत अमृत कलश यात्रा काढण्यात आली.  यावेळी ढोल ताशाच्या गजरात मनपा अतिरिक्त आयुक्त डॉ. सुनील लहाने यांनी मनपाच्या दोन स्वयंसेवकांकडे नागपूर शहराच्या मातीचे कलश सुपूर्द केले.

नागपूर महानगरपालिकेच्या दहाही झोनमधून संकलित मातीचे कलश सन्मानपूर्वक रथामधून संविधान चौक येथे आणण्यात आले. तेथून महानगरपालिका मुख्यालयात आण्यात आले. दहाही झोनमद्ये नागरिकांनी अर्पित केली माती आणि तांदळाचे मनपा मुख्यालयातील हिरवळीवर एक अमृत कलश तयार करण्यात आले.

नागपूर शहराचे अमृत कलश लवकरच मुंबईला रवाना होणार आहे.  याप्रसंगी मनपाचे अतिरिक्त आयुक्त डॉ. सुनील लहाने, मुख्य अभियंता राजीव गायकवाड, निगम सचिव प्रफुल्ल फरकासे, उपायुक्त निर्भय जैन, रवींद्र भेलावे, सुरेश बगळे, डॉ. गजेंद्र महल्ले, सदाशिव शेळके, महेश धामेचा, प्रकाश वराडे, हरीश राऊत, घनश्याम पंधरे, विजय हुमणे, गणेश राठोड, पुष्पगंधा भगत, साधना सयाम, अजय मानकर, अजय पझारे, डॉ. पीयूष आंबुलकर, श्रीकांत वैद्य आदी उपस्थित होते. 

डॉ. सुनील लहाने यांनी नागपूर शहराच्या मातीचे अमृत कलश प्रतिक तुरुतकाने, शुभम सुपारे यांना सुपूर्द केले. हे दोन्ही स्वयंसेवक हे अमृत कलश घेऊन प्रथम मुंबई आणि तेथून राजधानी दिल्ली येथे जाणार आहेत.  कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपायुक्त सुरेश बगळे यांनी केले. संचालन मनिष सोनी यांनी केले.

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिकाnagpurनागपूर