शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

अमरावतीच्या तरुणाचे नागपुरात अवयवदान; तिघांना जीवनदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2023 20:48 IST

रस्ता अपघातात गंभीर जखमी होऊन पुढे ‘ब्रेन डेड’ झालेल्या पतीच्या दु:खात असतानाही त्यांच्या पत्नी आणि नातेवाईकांनी पुढाकार घेतला. या मानवतावादी निर्णयामुळे अमरावतीच्या या तरुणाचे मंगळवारी नागपुरात अवयवदान झाले.

नागपूर : रस्ता अपघातात गंभीर जखमी होऊन पुढे ‘ब्रेन डेड’ झालेल्या पतीच्या दु:खात असतानाही त्यांच्या पत्नी आणि नातेवाईकांनी पुढाकार घेतला. या मानवतावादी निर्णयामुळे अमरावतीच्या या तरुणाचे मंगळवारी नागपुरात अवयवदान झाले. तिघांना जीवनदान तर दोघांना दृष्टी मिळाली.

    अमरावती जिल्हा, तिवसा तालुक्यातील रत्नागिरी नगर रहिवासी नितेश मोहन खेकडे (३८) त्या अवयवदात्याचे नाव. प्राप्त माहितीनुसार, २१ मे रोजी नितेश आपल्या घरी जात होते. गाडी रस्त्याच्या बाजूला उभी करीत असतानाच भरधाव वेगात असलेल्या ट्रकने जोरदार धडक दिली. डोक्याला आणि छातीला गंभीर दुखापत झाली.  तात्काळ जवळच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आणि नंतर न्यू इरा हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले. मात्र पाच दिवसांच्या उपचारानंतरही त्यांची प्रकृती खालावली आणि डॉक्टरांच्या पथकाने त्यांना ‘ब्रेन डेड’ म्हणजे मेंदू मृत घोषित केले. डॉक्टरांनी याची माहिती त्यांच्या कुटुंबियांना देत अवयवदानाचा सल्ला दिला. त्या दु:खातही त्यांच्या पत्नी भारती, भाऊ राजेश आणि बहीण वैष्णवी बोभाटे यांनी अवयवदानाला संमती दिली. 

हृदयासाठी रुग्णच मिळाला नाहीखेकडे यांच्या कुटुंबियांनी हृदय, यकृत, दोन्ही मूत्रपिंड आणि कॉर्नियाची जोडीचे दान करण्याला मंजुरी दिली. नागपूरच्या ‘झेडटीसीसी’ने नियमानुसार हृदयासाठी राज्यात व राज्याबाहेर सूचना दिल्या. परंतु रुग्णच मिळाला नाही. दात्याचे एक मूत्रपिंड न्यू इरा हॉस्पिटलच्या एका ४७ वर्षीय पुरुष रुग्णाला, दुसरे मूत्रपिंड केअर हॉस्पिटलच्या ३८ वर्षीय पुरुष रुग्णाला, यकृत ५१ वर्षीय महिलेला तर, कॉर्निआची जोडी महात्मे आय बँकला दान करण्यात आली. या वर्षातील हे १२वे अयवदान होते.

टॅग्स :Organ donationअवयव दान