शहरं
Join us  
Trending Stories
1
'महाराष्ट्र आमच्या पैशांवर जगतोय, तुम्हाला आपटून आपटून मारू?', भाजप खासदार निशिकांत दुबेंचा ठाकरेंवर हल्ला
2
पाकिस्तान सांगत राहिले, राफेल पाडले, राफेल पाडले...! अमेरिकेच्या F-१६ माजी पायलटने सांगितले काय घडले...
3
महागड्या गाड्यांचं कलेक्शन, कमाईतही एक नंबर; पाहा किती श्रीमंत आहे शुबमन गिल
4
"हो मी पाकिस्तानी सैन्याचा एजंट होतो", तहव्वूर राणाने चौकशीमध्ये केले अनेक धक्कादायक गौप्यस्फोट
5
ऐकावं ते नवलंच... अचानक लोकप्रिय ब्रँडच्या बिअर दुकानांमधून झाल्या गायब, राजधानीत नक्की काय झालं?
6
Bobby Darling : "माझ्या आईच्या मृत्यूला मी जबाबदार, मला माफ कर...", ढसाढसा रडली बॉबी डार्लिंग
7
Crizac IPO Allotment Status: ६० पट सबस्क्रिप्शन, शेअर्स अलॉट झालेत का, कसं कराल चेक? GMP प्रीमिअमवर
8
फुलेरात पुन्हा येण्याची तयारी सुरु करा! 'पंचायत ५'ची अधिकृत घोषणा, 'या' दिवशी रिलीज होणार
9
खळबळजनक! दिवसाढवळ्या एका व्यावसायिकाची गोळ्या घालून हत्या
10
ट्रम्प यांनी मस्क यांना झटका देण्यास केली सुरुवात; अमेरिकन सैन्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून चालवली 'गोळी'
11
किती वाईट दिसतंय ते? अंकिता लोखंडेचा लूक पाहून चाहते शॉक; नेटकऱ्यांनी केलं ट्रोल
12
हाफिज सईद पाकिस्तानात नाही? नेमका कुठे लपून बसलाय तोयबाचा म्होरक्या? 'या' व्यक्तव्यांमधून मिळाले मोठे संकेत
13
हृदयद्रावक! ११ महिन्यांच्या मुलीने गमावले आई-वडील, आजी; झाली अनाथ, डोळे पाणावणारा Video
14
चातुर्मासातील पहिले भौम प्रदोष व्रत: ‘असे’ करा पूजन, महादेवांची अखंड कृपा; शुभच होईल!
15
ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीचा ग्रॅज्युएट; तरीही करतोय फूड डिलिव्हरीचं काम, महिन्याला लाखोंची कमाई
16
५ जुलैला जपानवर कोणतेही संकट आलेच नाही? रिओ तात्सुकीची भविष्यवाणी फोल ठरली?
17
Chaturmas 2025 Rangoli: चातुर्मासात दारासमोर रोज दोन बोटं रांगोळी काढा आणि लक्ष्मीकृपा मिळवा!
18
सुपरहिट सिनेमांचा साक्षीदार 'फिल्मीस्तान स्टुडिओ' अखेर विकला; फिल्म इंडस्ट्री भावुक
19
गुरुवारी गुरुपौर्णिमा: ५ मूलांक लकी, विविध लाभच लाभ; यश-प्रगती-भरभराट, स्वामी कल्याण करतील!
20
भयंकर! दरोडेखोरांनी घरात घुसून पत्नी, मुलांसमोर केली इंजिनिअरची हत्या; पैसे, दागिने घेऊन पसार

अमरावती विभागाचा निकाल ८४.३५ टक्के

By admin | Updated: June 13, 2017 16:07 IST

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावीच्या परीक्षेचा आॅनलाईन निकाल मंगळवारी जाहीर झाला.

आॅनलाईन लोकमतअमरावती : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावीच्या परीक्षेचा आॅनलाईन निकाल मंगळवारी जाहीर झाला. यात अमरावती विभागाचा निकाल ८४.३५ टक्के लागला आहे. गतवर्षी अमरावती विभागाचा निकाल ८४.९९ टक्के लागला होता. यावेळी निकाल ०.६६ टक्क्यांनी माघारला आहे. ९ विभागीय मंडळांपैकी अमरावती विभागाने निकालांच्या टक्केवारीत सातवा क्रमांक पटकावला आहे. बुलडाणा जिल्ह्याने निकालात आघाडी घेतली असून यवतमाळ जिल्हा माघारला आहे. बुलडाण्याची टक्केवारी ८८.४९ टक्के, वाशिम ८७.३७, अमरावती ८५.१५, यवतमाळ ७८.०३ तर अकोला जिल्ह्याची टक्केवारी ८४.०२ आहे. अमरावती विभागातील २,५२४ शाळांमधून एकूण १ लाख ७४ हजार ८१० विद्यार्थी नोंदणीकृत होते. त्यापैकी १ लाख ७४ हजार ०४८ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यापैकी १ लाख ४६,८०२ विद्यार्थी उत्तीर्ण झालेत. उत्तीर्ण विद्यार्थ्यांमध्ये ७६,९५६ मुले, तर ६९,८४६ मुली आहेत. निकालात यंदाही मुलींचा वरचष्मा असून विभागातून ८८.०६ टक्के मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. मुलांची टक्के वारी ८१.२४ इतकी आहे. यंदा गैरमार्गाचा अवलंब केल्याची ११६ प्रकरणे अमरावती विभागात निदर्शनास आलीत. यात ११४ विद्यार्थी दोषी सिद्ध झाले असून २ प्रकरणे निर्दोष ठरविण्यात आले आहेत. अकोल्यातील ३५ प्रकरणांपैकी शून्य विद्यार्थी निर्दोष ठरविण्यात आले आहे. अमरावती २५ पैकी शून्य निर्दोष, बुलडाणा ३० पैकी एक निर्दोष, यवतमाळ १५ पैकी एक निर्दोष, वाशिम ११ पैकी शून्य विद्यार्थी निर्दोष ठरविण्यात आले आहेत. परीक्षेदरम्यान ५६ आक्षेपार्ह प्रकरणे निदर्शनास आले होती. त्यापैकी ४३ विद्यार्थी निर्दोष ठरले आहेत तर १३ प्रकरणांची सुनावणी प्रलंबित आहे. यावेळी चित्रकला ४,८९६, शास्त्रीय कला २११, लोककला ६, तर क्रीडा प्रकारातून ४७४ विद्यार्थ्यांनी गुणांची सवलत घेतली आहे. यंदा कॉपीमुक्त अभियान या उपक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करण्यात आली. जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक, पोलीस आयुक्त तसेच मंडळाचे सदस्य, अधिकारी व कर्मचाऱ्यांचे मोठे योगदान असल्याचे अमरावती शिक्षण मंडळाचे सचिव संजय यादगिरे यांनी ‘लोकमत’ शी बोलताना सांगितले.काही तांत्रिक अडचणींमुळे निकाल लांबणीवर पडला. बोर्डाच्या वेबसाईटवर जाहीर झालेला निकाल अधिकृत असून सोशल मीडियावरील अफवांवर विश्वास ठेवू नये. बुधवारपासून पुनर्मूल्यांकनास सुरूवात होईल. पुरवणी परीक्षा जुलै, आॅगस्टमध्ये घेतली जातील.- संजय गणोरकर,अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य माध्यमिक, उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ अमरावती.