आॅक्सिजन सिलिंडरचा स्फोट : नागपूर-अमरावती मार्गावरील वाहतूक ठप्पकोंढाळी : कोंढाळनजीकच्या रिंगणबोडी शिवारात धावत्या रुग्णवाहिकेला आग लागली. रुग्णवाहिकेतील आॅक्सिजन सिलिंडरमध्ये विस्फोट झाल्याने सदर घटना घडली. या आगीमुळे परिसरातील जंगल पेटले तर नागपूर-अमरावती महामार्गावरील वाहतूक खोळंबल्याने मार्गाच्या दुतर्फा जवळपास पाच किमीपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. ही घटना शुक्रवारी रात्री ९ वाजताच्या सुमारास घडली.नांदगाव पेठ, अमरावतीला जात असलेली १०८ टोल फ्री क्रमांकावरील शासकीय रुग्णवाहिका क्रमांक एमएच-१४/०४९५ या वाहनात केबलचे शॉर्ट सर्किट झाल्याने पेट घेतला. रुग्णवाहिकेने पेट घेतल्याचे ध्यानात येताच, चालक अतुल अनिरुद्ध ढेपे (३०, रा. नांदगाव पेठ) व डॉ. साहेबराव वनवे (४०, रा. अमरावती) हे रुग्णवाहिकेबाहेर पडल्याने ते बचावले. (वार्ताहर)काही क्षणातच रुग्वाहिकेमधील आॅक्सिजन सिलिंडरमध्ये विस्फोट झाला. त्यामुळे महामार्गालगतच्या जंगल परिसरात आग लागली. सिलिंडरच्या स्फोटामुळे मार्गातील दुतर्फा वाहतूक ठप्प झाली.घटनेची माहिती मिळताच कोंढाळी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. सदर रुग्णवाहिकेत दोन सिलिंडर होते. एका सिलिंडरचा स्फोट झाल्यानंतर दुसऱ्याचा स्फोट होईल या भीतीमुळे महामार्गातील वाहतूक पोलिसांनी बंद केली. दरम्यान, काही वेळातच दुसऱ्या सिलिंडरचा मोठा स्फोट झाला. यामुळे परिसरातील जंगलाने पेट घेतला. चार अग्निशमन वाहनांना पाचारण करून रुग्णवाहिका व जंगलातील आग विझविण्यात आली. ही रुग्णवाहिका नांदगांव पेठ येथून रुग्णाला घेऊन नागपूरला आली होती. काटोलचे उपविभागीय पोलीस अधिकारी ईश्वर कातकडे, कोंढाळीचे ठाणेदार पीतांबर जाधव, पोलीस उपनिरीक्षक जितेश कानपुरे, सोनाली गोरे आदींनी घटनास्थळी दाखल झाले होते.
रुग्णवाहिकेला आग
By admin | Updated: April 16, 2016 02:22 IST