शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
3
डोंगराळ भागाचा प्रत्येक कोपरा होता ठाऊक; पहलगाम हल्ल्यातील खरा सूत्रधार कोण? पाहा
4
क्राईम थ्रिलर! गर्लफ्रेंडला साजरा करायचा होता करवा चौथ; पतीने रचला पत्नीच्या हत्येचा कट
5
"असल्या सर्जिकल स्ट्राईक तर आम्ही गल्लीबोळात करतो’’, संजय राऊतांचा सरकारला टोला 
6
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
7
वडिलांपासून दूर राहिला, किटसाठी दूध विकलं; बर्थडे बॉय रोहित शर्माचा थक्क करणारा प्रवास!
8
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
9
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
10
२३ वर्षांची शिक्षिका ११ वर्षाच्या विद्यार्थ्याला घेऊन फरार; पोलिसांना मिळाला पळून जातानाच व्हिडीओ
11
घरबसल्या सोनं खरं आहे खोटं चेक करा, मिनिटांत ओळखू शकाल; 'या' आहेत ५ पद्धती
12
"मला वाचवा, हे लोक माझं लग्न लावतील"; किडनॅप झालेल्या बायकोचा मेसेज; नवऱ्याची शोधाशोध
13
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांशी तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
14
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
15
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
16
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
17
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
18
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
19
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
20
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?

आंबेडकर जयंती घरीच, संविधानाचे करणार वाचन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2020 19:32 IST

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त कुठलेही जाहीर कार्यक्रम करणार नाही, मिरवणुका काढणार नाही, इतकेच नव्हे तर आपापल्या घरीच बसून राष्ट्राचा प्राण असलेल्या संविधानाचे वाचन करणार, असा संकल्प विविध क्षेत्रातील बौद्ध- आंबेडकरी संघटनांनी केला आहे.

ठळक मुद्देबौद्ध-आंबेडकरी संघटनांचा संकल्पडिजिटल जयंतीवर भर

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी गर्दी न करणे हीच आज खरी गरज आहे. ही गरज ओळखून गर्दी टाळण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त कुठलेही जाहीर कार्यक्रम करणार नाही, मिरवणुका काढणार नाही, इतकेच नव्हे तर आपापल्या घरीच बसून राष्ट्राचा प्राण असलेल्या संविधानाचे वाचन करणार, असा संकल्प विविध क्षेत्रातील बौद्ध- आंबेडकरी संघटनांनी केला असून नागरिकांनाही घराबाहेर पडू नका. आपापल्या घरी राहूनच भीमजयंती साजरी करा, असे आवाहनही केले आहे.संविधान परिवारआपण सर्वजण संविधानावर प्रेम करणारे, संविधानाला प्राण मानणारे आहोत. सध्या देशावर कोरोनाचे संकट उभे ठाकले आहे, तेव्हा याची जाण ठेवून आपण सर्व सामाजिक कार्यकर्ते, बुद्धविहार कमिटी, पंचशील झेंडा कमिटी, जयंती मंडळ, कर्मचारी संघटना, विद्यार्थी संघटना, इतर सर्वांनीच आपापल्या घरात राहूनच भीमजयंती साजरी करावी, असे आवाहन संविधान परिवारचे प्रा. राहुल मून, नरेश गायकवाड, अ‍ॅड. सुरेश घाटे, सुरेश तेलंग, जितेंद्र जिभे. चंद्रमणी उके, सुधाकर टवळे, सेवक मून, अजय गुरभेले, दयाराम गावंडे, सुनील इलमकर, आशालता मून, माला वासनिक, नलिनी श्रीरामे, जयश्री मून, अनिता मेश्राम, प्रभाताई वांद्रे, कांचन जांभुळकर, सुजाता गायकवाड, प्रा. प्रियांका मून आदींनी केले आहे.रिपब्लिकन सेनाकोरोनाच्या या लढाईत आपण सर्व शासनासोबत आहोत, तेव्हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आपापल्या घरीच कुटुंबासह साजरी करा, कुणीही बाहेर पडू नका, गर्दी करू नका, असे आवाहन रिपब्लिकन सेनेचे प्रदेशाध्यक्ष सागर डबरासे यांनी केले आहे.रिपब्लिकन विद्यार्थी फेडरेशनकोरोनाच्या पार्श्वभूमीवर कुणईही घराबाहेर पडू नका, शासनाच्या निर्देशांचे पालन करा आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आपापल्या घरीच साजरी करा, असे आवाहन रिपब्लिकन विद्यार्थी फेडरेशनचे अध्यक्ष अशोक कोल्हटकर यांनी केले आहे.माजी मिलिंदीयन-नागसेनवन विद्यार्थी मित्रमंडळडॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती सर्वांनी आपापल्या घरीच साजरी करावी, असे आवाहन माजी मिलिंदीयन-नागसेनवन विद्यार्थी मित्रमंडळाचे डॉ. तारेश शेंडे, अ‍ॅड. व्ही.पी. बोरकर, करुणा भगत, उद्धव वासनिक, पी.टी. खोब्रागडे, बी.बी. बेंदले, मधुकर मेश्राम, अ‍ॅड. गजभिये, वसंत रामटेके, भीमराव गोंडाणे, एम.एम. वाकोडे यांनी केले आहे.

 

टॅग्स :Dr Babasaheb Ambedkar Jayantiडॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती