शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
3
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
4
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
5
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
6
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल
7
विरार-डहाणू रोडदरम्यान सात स्टेशन; चौपदरीकरणामुळे गर्दी टाळण्यास मदत
8
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
9
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
10
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
11
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
12
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
13
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
14
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
15
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
16
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
17
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
18
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
19
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया

अंबरिश मिश्र यांनी उलगडला हिंदी चित्रपट गीतांचा स्वरप्रवास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2020 01:10 IST

राजाराम वाचनालय आणि विजया नानिवडेकर व मनीषा खरे यांनी बुधवारी सायंकाळी आयोजित केलेले साहित्यिक अंबरिश मिश्र यांचे व्याख्यान हिंदी चित्रपट गीतांच्या स्वरप्रवासाने मोहरले. हिंदी चित्रपटाच्या सुवर्णकाळाचा सांगितिक स्वरप्रवास उलगडत मिश्र यांनी संगीतरसिकांना खिळवून ठेवले.

ठळक मुद्देआठवणीतील गीतांनी व्याख्यान मोहरले

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राजाराम वाचनालय आणि विजया नानिवडेकर व मनीषा खरे यांनी बुधवारी सायंकाळी आयोजित केलेले साहित्यिक अंबरिश मिश्र यांचे व्याख्यान हिंदी चित्रपट गीतांच्या स्वरप्रवासाने मोहरले. हिंदी चित्रपटाच्या सुवर्णकाळाचा सांगितिक स्वरप्रवास उलगडत मिश्र यांनी संगीतरसिकांना खिळवून ठेवले.प्रेस क्लबमध्ये ग्रंथप्रेमी मुकुंदराव नानिवडेकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त हा उपक्रम पार पडला. हिंदी चित्रपटातील गीतांबद्दल ते म्हणाले, अफाट असलेले हे गीतांचे साम्राज्य म्हणजे जणू स्वतंत्र गणराज्यच आहे. या गणराज्यात रसिक हे नागरिक तर रसिक व गाणी ही युती आहे. या साम्राज्यात जीएसटी नाही, सीएए नाही किंवा कसलाही टॅक्स नाही. केवळ निखळ आनंद आहे. स्वातंत्र्यपूर्व काळापासूनचा हिंदी चित्रपटगीतांचा प्रवास त्यांनी उलगडला. १९६०-७० नंतरच्या दशकातील अनेक प्रसंगांचे साक्षीदार असलेल्या मिश्र यांंनी संगीतक्षेत्रातील अनेक प्रसंग आणि गमतीजमतीही श्रोत्यांना ऐकविल्या. ते म्हणाले, संगीतकार नौशाद हे लोकसंगीताचे उत्तम जाणकार होते. पाश्चात्त्य संगीताचा उपयोग त्यांनी आपल्या संगीतामधून केला. सुहानी रात ढल गयी, कोई सागर दिल को बहलाता नही यासारख्या अनेक गीतांमधून ते आठवणीत राहिले. नौशादांना मुंबईत जाऊन गाणी शिकायची होती, तर अनिल बिश्वास यांना क्रांतिकारी होऊन इंग्रज अधिकाऱ्याचा खून करायचा होता. मात्र पुढे बिश्वास संगीतात रमले. यशवंत देवांच्या अरुण दाते यांनी गायलेल्या गीतांवर तसेच अनिल खळे यांच्या संगीतावर बिश्वास यांचा प्रभाव होता. त्यांची गीते ऐकल्यावर संवेदनशील मनाला जाग आल्यासारखे वाटते, ही त्यांच्या स्वरांची शक्ती होती. नौशाद, अनिल बिश्वास, सी. रामचंद्रन यांनी हिंदी संगीताला आत्मसन्मान दिला. चितळकरांच्या ‘शोला जो भडके’ यासारख्या गाण्यांनी संगीताला नवा बाज दिला.संगीतकारांचे तेव्हा एकमेकांशी मैत्रीचे संबंध होते. एकमेकांच्या गीतांना चाली सुचविण्यापासून त्यांची सलगी असायची. तलत महमूद आणि नौशाद यांची घट्ट मैत्री होती. मुखर्जी आणि अशोककुमार यांचेही फार सख्य होते. बर्मन यांनी नंतरच्या काळात मोठी झेप घेतली.ओ.पी. नय्यर वेळेचे फार पक्के होते. एकदा मोहम्मद रफी वेळेवर पोहचले नाही म्हणून पुढची तीन वर्षे त्यांनी त्यांना गाणीच दिली नव्हती, अशी आठवण मिश्र यांनी सांगितली. नौशाद यांनी गझल चित्रपटात आणली आणि रूढ केली. गुलाम हैदर साहेबांनी लता मंगेशकरांना शब्दांचे वजन शिकविले. नय्यर यांनी आशादीदींच्या गळ्याचे सामर्थ्य ओळखले होते. मोहम्मद रफींना नौशाद यांनी शिकविले. अनेक संगीतकारांनी गायकांना घडविले.गीतकार शैलेंद्र सिंग, शकील बदायुनी, आझमी यांच्यासह अनेक नावाजलेल्यांचा उदय १९५० नंतर झाला. साहिर लुधियानी यांच्या आयुष्याचा प्रवास लाहोर ते दिल्ली व पुढे मुंबई असा झाला. या सर्वांनी संगीताला उच्चस्थानावर पोहचविले. म्हणूनच हिंदी चित्रपट गीतांचा गोडवा अवीट आणि अमीट आहे.संगीतकारांचा ब्लॉक अन् लतादीदींची चालबरेचदा संगीतकारांना ब्लॉक आलेला असतो. अशा वेळी गायकही स्वत:च्या कल्पकतेतून चाल सुचवितात आणि गीत अजरामर कसे होते, याचा किस्सा अंबरिश मिश्र यांनी ऐकविला. एकदा नौशाद आणि मदनमोहन यांना एका गीताला चाल लावायची होती. बराच प्रयत्न करूनही मनासारखी चाल लागेना. तेव्हा मनाचा हिय्या करून लता मंगेशकरांनी गीताचा कागद मागितला. काहीशा त्रोटकपणे नौशादांनी तो त्यांना दिला. सुमारे १५ मिनिटांनी लतादीदींनी नंद रागातील चाल सुचविली. ते गीत होते ‘तू जहां जहां जहां चलेगा’! नौशादांनी दिवसभर नोटेशन घातले आणि पुढे ते गीत अजरामर झाले.

टॅग्स :musicसंगीतliteratureसाहित्यnagpurनागपूर