शहरं
Join us  
Trending Stories
1
ब्रह्मोस एरोस्पेसच्या CEO ची नियुक्ती रद्द! 'कॅट'चा ऐतिहासिक निकाल; डॉ. जयतीर्थ जोशींना पदावरून हटवण्याचे आदेश
2
मनसे-उद्धवसेना युती ही आषाढीच्या घरी महाशिवरात्र; भाजपाने आकडेवारी देत ठाकरे बंधूंना डिवचले
3
मृत्यूशय्येवर होत्या, तरीही कालच दाखल केला उमेदवारी अर्ज! खालिदा झियांच्या मृत्यूने बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टीचे मनसुबे धुळीस मिळाले
4
ATM कमी झाले, बँकेच्या शाखा वाढल्या; बचत खात्यांमध्ये मोठी वाढ, जमा रक्कम ३.३ लाख कोटींच्या पार
5
Video : मुंबईतील बस अपघाताचा व्हिडीओ आला समोर; भांडुपमध्ये रस्त्यावर उभ्या असलेल्या लोकांना बसने चिरडले
6
पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या समर्थकाला 'बांगलादेशी' सोडून घेऊन गेले, आसाम पोलिसांवर हल्ला; १० जणांना अटक
7
मनसे सोडल्यावर प्रकाश महाजन पहिल्यांदाच राज ठाकरेंवर थेट बोलले; म्हणाले, “विठ्ठलानेच...”
8
"मला तो सीन करायचा नव्हता पण, रणवीरने...", 'धुरंधर'मधल्या 'त्या' कामुक सीनबाबत अभिनेत्याचा मोठा खुलासा
9
९०% लोकांना माहीतच नाही iPhoneची 'ही' जादू! स्क्रीनला हात न लावता सेकंदात करता येते काम
10
Stock Market Today: मंथली एक्सपायरीवर निराशाजनक सुरुवात; Sensex १२० अंकांनी घसरला, Nifty मध्ये ४० अंकांची घसरण
11
बांगलादेशच्या उच्चायुक्तांनी दिल्ली सोडली! युनूस सरकारकडून तातडीने ढाका गाठण्याचे आदेश; नेमके कारण काय?
12
पोर्टफोलिओमध्ये करा 'हे' ५ बदल! संरक्षण आणि आयटी शेअर्समध्ये मोठी संधी; पाहा नवीन टार्गेट प्राईस
13
'ती' गेल्याचं ऐकलं अन प्रियकरानेही प्राण सोडले! हॉस्पिटलमधून पळाला अन् काही तासांतच…
14
Silver Price: २०२६ मध्ये चांदीची चमक होणार का कमी? एका झटक्यात ₹२४,४७४ ची घसरण, काय आहेत हे संकेत?
15
मोठी बातमी! ९१ ड्रोन... युक्रेनचा पुतीन यांना मारण्याचा प्रयत्न; निवासस्थानाजवळ घातकी ड्रोन पाडले अन्...
16
ब्रह्मपुत्रेच्या काठी हिंदूंच्या रक्ताचा पूर! २०० हून अधिक हल्ले, बांगलादेशातील 'या' जिल्ह्यात हिंदूंचे अस्तित्व धोक्यात
17
इराणवर सर्वात मोठा हल्ला होईल, तो थांबवता येणार नाही; डोनाल्ड ट्रम्प यांचे मोठे विधान
18
भारतातील १० सर्वात मोठ्या कंपन्यांच्या बाजार भांडवलात मोठा चढ-उतार, SBI च्या गुंतवणूकदारांना सर्वाधिक नुकसान
19
बांगलादेशच्या माजी पंतप्रधान बेगम खालिदा झिया यांचे ८० व्या वर्षी निधन; मुलगा १७ वर्षांनी परतताच...
20
हिंगोलीकरांची पहाट भीतीदायक! पिंपळदरी, नांदापूर परिसरात धरणी माता हादरली; पहाटे ५:५६ची ती वेळ...
Daily Top 2Weekly Top 5

याहीवेळी ‘फिल गुड’

By admin | Updated: June 14, 2014 03:02 IST

भाजपाचा बालेकिल्ला असलेल्या दक्षिण-पश्चिम नागपुरात यावेळी ‘फिल गुड’ अशी स्थिती आहे.

जितेंद्र ढवळे नागपूर भाजपाचा बालेकिल्ला असलेल्या दक्षिण-पश्चिम नागपुरात यावेळी ‘फिल गुड’ अशी स्थिती आहे. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आ.देवेंद्र फडणवीस येथे मैदानात उतरतील. राज्यात प्रचाराची धुरा असतानाही दक्षिण-पश्चिमध्ये फडणवीस यांनी लोकसभेत नितीन गडकरी यांना ६२ हजार ७२३ मतांची लीड दिली. गडकरी यांना १ लाख ६७२५ मते मिळाली तर काँग्रेसचे विलास मुत्तेमवार यांना केवळ ४४ हजार मतांवर थांबावे लागले. काँग्रसचे येथे पानिपत झाले. फडणवीस यांचा दावा असल्याने येथे भाजपमध्ये कोणाचाही दावा असणार नाही. तशी शिस्त या मतदार संघातील भाजप कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यात आहे. काँग्रेसमध्ये यावेळी दक्षिण- पश्चिममध्ये कोण लढणार, हे अद्याप स्पष्ट नाही. गेल्यावेळी दक्षिण-पश्चिममध्ये नशीब अजमाविणारे काँग्रेसचे शहराध्यक्ष विकास ठाकरे यांनी यावेळी पश्चिममध्ये मोर्चा वळविला आहे. गेल्यावेळी ठाकरे यांना येथे ६१, ४८३ मते मिळाली होती. लोकसभा प्रचारात ठाकरे यांनी या मतदार संघात काँग्रेसच्या वतीने लीड घेतला होता. नगरसेवक प्रफुल्ल गुडधे यांनी येथे काँग्रेसच्या वतीने दावा केला आहे. तशी इच्छाही त्यांनी शहर आणि प्रदेश काँग्रेसकडे व्यक्त केली आहे. गुडधे यांचे दक्षिण-पश्चिमशी कौटुंबिक नाते आहे ! इकडे नगरसेविका अ‍ॅड.रेखा बारहाते यांचाही काँग्रेसच्या वतीने येथे दावा राहील. या मतदारसंघात मोठ्या प्रमाणात दलिस्त वस्त्यांचा समावेश आहे. गेल्यावेळी रिडालोसच्या वतीने जयदीप कवाडे यांनी येथे निवडणूक लढविली होती. त्यांना १ हजार ४३८ मते मिळाली होती. भाजपने मात्र येथे लोकसभेत महायुतीतील घटक पक्ष रिपाइं (आठवले) ची मदत कॅश केली. गतवेळी भारिपचे राजू लोखंडे यांनी १० हजार ५३३ मते मिळवीत तिसरा क्रमांक गाठला होता. आम आदमी पार्टीने अनपेक्षितपणे या मतदारसंघात मुसंडी मारली. आम आदमी भाजपची मते घेणार असा अंदाज होता. त्यामुळे या पक्षाला काँग्रेसनेही गांभीर्याने घेतले नाही. मात्र प्रत्यक्षात काँग्रेसलाच त्याचा फटका बसला. या मतदार संघात मनसेने तगडा उमेदवार देण्याची तयारी चालविली आहे. यात मनसेचे प्रदेश उपाध्यक्ष हेमंत गडकरी यांचा दावा आहे. श्रेष्ठींच्या आदेशाची त्यांना प्रतीक्षा आहे. मतदार संघातील स्थानिक प्रश्न, समस्या याकडे मतदारांचे लक्ष वेधण्यासाठी मनसेची यंत्रणा प्रयत्नशील आहे.