शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना रुग्णालयांमध्ये ऑक्सिजनच्या काळाबाजाराचा आरोप; हायकोर्टात दाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2020 12:55 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : गंभीर रुग्णांची संख्या सतत वाढत असल्यामुळे कोरोना रुग्णालयांमध्ये ऑक्सिजनचा काळाबाजार केला जात आहे, असा ...

ठळक मुद्देजीवनावश्यक वस्तूंमध्ये समावेश करण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : गंभीर रुग्णांची संख्या सतत वाढत असल्यामुळे कोरोना रुग्णालयांमध्ये ऑक्सिजनचा काळाबाजार केला जात आहे, असा आरोप विविध सामाजिक संस्थांशी जुळलेल्या सामाजिक कार्यकर्त्यांनी केला आहे. तसेच, ही बाब लक्षात घेता ऑक्सिजनचा जीवनावश्यक वस्तूंमध्ये समावेश करण्याची मागणी केली आहे. त्यांनी यासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात अर्ज दाखल केला आहे.या सामाजिक कार्यकर्त्यांमध्ये जोसेफ जॉर्ज, वीरेंद्र शाहू, वासुदेव मिश्रा, अनसूया काळे, विनोद छाबरानी आदींचा समावेश आहे. त्यांनी कोरोनाशी संबंधित विविध समस्यांकडे न्यायालयाचे लक्ष वेधले आहे. शहरातील काही रुग्णालयांमध्ये व्हेंटिलेटर व ऑक्सिजनचे वेगवेगळे शुल्क आकारले जात आहे. तसेच, रुग्णालयात भरती असलेल्या रुग्णांकडून पीपीई किटचे पैसे वसूल केले जात आहेत. रुग्णांची संख्या वाढल्यामुळे रुग्णालयांतील खाटा कमी पडत आहेत. त्यामुळे अनेक रुग्णांना भरती होण्यासाठी खाटा मिळत नाहीत. परिणामी त्यांच्यावर वेळेवर उपचार होत नाही. त्यातून अनेकांचा मृत्यू होत आहे. तसेच, अनेक रुग्णांना घरात क्वारंटाईन केले जात असल्यामुळे कुटुंबीयांना व संपर्कातील नातेवाईकांना कोरोनाची लागण होत आहे, असे अर्जात नमूद करण्यात आले आहे.

अर्जदारांनी कोरोना रुग्णांवर योग्य उपचार केला जात नसल्याचा आरोपही केला आहे. काही रुग्णालयांमध्ये कोरोना रुग्णांना वेळेवर औषधे दिली जात नाहीत. त्यांची नियमित तपासणी केली जात नाही. परिणामी, वॉर्डामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लावणे आवश्यक आहे. स्वतंत्र खोली भाड्याने घेऊ शकत नाहीत अशा रुग्णांना सामान्य वॉर्डात भरती केले जाते. त्यांच्या खाटा जवळजवळ असतात. दोन खाटांंच्या मधे काहीच लावलेले नसते. परिणामी, वातावरण चांगले राहत नाही. मधात पडदे लावून ही समस्या सोडवली जाऊ शकते. खासगी रुग्णवाहिकांसाठी ५ ते १५ हजार रुपयांपर्यंत भाडे घेतले जाते. नागरिकांना सरकारी रुग्णवाहिका वेळेवर उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे सरकारने रुग्णवाहिकांसाठी भाडे निश्चित करणे गरजेचे आहे, असेही अर्जदारांनी म्हटले आहे. न्यायालयात अर्जदारांतर्फे अ‍ॅड. एम. अनिलकुमार कामकाज पाहणार आहेत.मृतदेह जिवंत रुग्णांजवळ ठेवले जातातकोरोना रुग्णाचा मृत्यू झाल्यानंतर त्याचा मृतदेह तात्काळ हटवला जात नाही. मृतदेह जिवंत रुग्णांजवळ तासन्तास पडून राहतो. त्यामुळे नकारात्मक भावना निर्माण होते, या गंभीर बाबीकडे अर्जदारांनी न्यायालयाचे लक्ष वेधले आहे. तसेच, मयत कोरोना रुग्णांवर नातेवाईकांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार करण्यात यावेत, अशी विनंती केली आहे.

 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस