शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

हरित पट्टा रद्द केल्याचा आरोप, चौकशीकरिता समिती स्थापन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2020 11:45 IST

Nagpur News राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणच्या पुणे खंडपीठाने मौदा तालुक्यातील चिव्हारा येथील राष्ट्रीय महामार्गालगतचा हरित पट्टा अवैधपणे रद्द करण्यात आल्याच्या आरोपाची चौकशी करण्यासाठी समिती स्थापन केली आहे.

ठळक मुद्देहरित न्यायाधिकरणचा आदेश गोसेखुर्द प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनाचे प्रकरण

लोकमत न्यूज नेटवर्क  नागपूर : राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणच्या पुणे खंडपीठाने मौदा तालुक्यातील चिव्हारा येथील राष्ट्रीय महामार्गालगतचा हरित पट्टा अवैधपणे रद्द करण्यात आल्याच्या आरोपाची चौकशी करण्यासाठी समिती स्थापन केली आहे. या समितीमध्ये नागपूर जिल्हाधिकारी आणि भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण व महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ यांच्या प्रतिनिधीचा समावेश करण्यात आला आहे. या प्रकरणातील वास्तविक परिस्थितीची माहिती व कृती अहवाल सादर करण्याचा आदेश सदर समितीला देण्यात आला आहे.

या आदेशाच्या अंमलबजावणीची जबाबदारी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळावर सोपविण्यात आली आहे.प्रकरणावर खंडपीठाचे न्यायमूर्तीद्वय शेवकुमार सिंग व डॉ. सत्यवानसिंग गार्बयाल यांच्यासमक्ष सुनावणी झाली. यासंदर्भात टेकेपार येथील रहिवासी मनोज गोल्हर व ऋषी लांजेवार यांनी अर्ज दाखल केला आहे. संबंधित हरित पट्टा कायम ठेवण्यात यावा, हरित पट्ट्यामध्ये करण्यात आलेली बांधकामे पाडण्यात यावी आणि हरित पट्ट्यामध्ये मंजूर करण्यात आलेल्या ले-आऊटवर स्थगिती देण्यात यावी असे अर्जदारांचे म्हणणे आहे. न्यायाधिकरणने जिल्हाधिकारी व इतर प्रतिवादींना नोटीस बजावून यावर १० नोव्हेंबरपर्यंत उत्तर सादर करण्याचे निर्देशही दिले आहेत.असे आहे प्रकरण१९९४-९५ मध्ये गोसेखुर्द राष्ट्रीय सिंचन प्रकल्पाकरिता टेकेपार गाव संपादित करण्यात आले. या गावकऱ्यांच्या पुनर्वसनाकरिता चिव्हारा येथील मुंबई-कोलकाता राष्ट्रीय महामार्गालगतची १९.९० हेक्टर जमीन संपादित करण्यात आली. नियमानुसार राष्ट्रीय महामार्गाच्या मध्यापासून दोन्ही बाजूने ७५ मीटरचा हरित पट्टा आरक्षित ठेवणे आवश्यक आहे. यासंदर्भात राष्ट्रीय महामार्ग नागपूर उप-विभागाचे सहायक अभियंत्यांनी २५ नोव्हेंबर २००५ रोजी गोसेखुर्द पुनर्वसनचे उप-विभागीय अधिकाऱ्यांना पत्र लिहिले होते. असे असताना संबंधित हरित पट्टा रद्द करून टेकेपार गावकऱ्यांच्या पुनर्वसनाकरिता द्वितीय ले-आऊटला मंजुरी देण्यात आली असा अर्जदारांचा आरोप आहे. 

 

टॅग्स :DamधरणGosekhurd Projectगोसेखुर्द प्रकल्प