शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
2
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
3
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
4
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
7
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
8
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
9
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
10
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
11
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
12
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
13
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
14
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
15
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
16
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
17
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
18
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
19
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
20
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...

अखिल भारतीय योग संमेलन १७ पासून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2017 00:40 IST

योगमूर्ती जनार्दनस्वामी महाराज यांच्या शतकोत्तर रजत जयंती निमित्त जनार्दनस्वामी योगाभ्यासी मंडळातर्फे अखिल भारतीय योगसंमेलनाचे आयोजन १७ ते १९ नोव्हेंबर या कालावधीत करण्यात आले आहे.

ठळक मुद्देराम खांडवे यांची माहिती : पाच हजार योगसाधक सहभागी होण्याची अपेक्षा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : योगमूर्ती जनार्दनस्वामी महाराज यांच्या शतकोत्तर रजत जयंती निमित्त जनार्दनस्वामी योगाभ्यासी मंडळातर्फे अखिल भारतीय योगसंमेलनाचे आयोजन १७ ते १९ नोव्हेंबर या कालावधीत करण्यात आले आहे. या संमेलनात आतापर्यंत २५०० योगसाधकांची नोंदणी झाली असून ५ हजारापेक्षा जास्त योगसाधक सहभागी होण्याची शक्यता आहे, अशी माहिती जनार्दनस्वामी योगाभ्यासी मंडळाचे कार्यवाह व योगतज्ज्ञ राम खांडवे यांनी येथे दिली.रामनगर संघ मैदान येथे आयोजित या योगसंमेलनाची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रपरिषदेत ते बोलत होते. या प्रसंगी जनार्दनस्वामी योगाभ्यासी मंडळाचे अध्यक्ष सुनील सिर्सिकर उपस्थित होते. राम खांडवे म्हणाले, योगमूर्ती जनार्दनस्वामी महाराज यांच्या शतकोत्तर जयंती निमित्त १९९२ मध्ये योग संमेलन आयोजित करण्यात आले होते. त्यावेळी १५०० वर योगसाधक सहभागी झाले होते. तेव्हांपासून नागपुरात योग चळवळीला सुरुवात झाली. आजही ५०० योग शिक्षक नि:शुल्क प्रशिक्षण देत आहे. म्हणूनच, इतर ठिकाणी योगाचे वर्ग चालतात नागपुरात मात्र योग चळवळ चालते. संमेलन होणाºया रामनगर मैदानाला ‘योगमूर्ती नगर’ असे नाव देण्यात आले आहे. योगसाधक एकाचवेळी योगसाधना करू शकतील या प्रकारे मंडपाची उभारणी करण्यात आली आहे. याचे व्यासपीठ ८० बाय ४० फुटाचे असणार आहे. योगसंमेलनाचे उद्घाटन शुक्रवारी १७ नोव्हेंबर रोजी सकाळी १०.३० वाजता केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक, जहाजबांधणी व जलसंपदा मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते होईल. यावेळी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित राहतील. या योगसंमेलनात विविध रोगांच्या प्रसिद्ध डॉक्टरांची चमू रोगांची शास्त्रीय कारणे सांगतील तर यावर उपयुक्त योगोपचार सांगितले जातील. या शिवाय, प्रसिद्ध प्रवचनकार अशित आंबेकर, न्यूरो सायकियाट्रीस्ट डॉ. संजय फडके यांचे मार्गदर्शन होईल. रोज सायंकाळी ६ ते ८ वाजताच्या दरम्यान प्रसिद्ध कीर्तनकार चारुदत्त आफळे यांचे कीर्तन, विवेक घळसासी व जितेंद्रनाथ महाराज यांची प्रवचने आयोजित केली आहेत, अशी माहितीही त्यांनी दिली.पत्रपरिषदेत मिलिंद वझलवार, अतुल मुजुमदार, दिनेश बापट, संजय लष्करे, संजय अरोरा, प्रशांत राजूरकर, अनिल नाजपांडे, राहुल कानिटकर, यांच्यासह आयोजन समितीचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते.विधिवत मंडप पूजनरामनगर येथील संघ मैदान येथे आयोजित या संमेलनासाठी सभा मंडपाचे विधिवत पूजन आमदार डॉ.परिणय फुके व नगरसेविका डॉ.परिणिता फुके यांच्या हस्ते मंगळवारी पार पडले. यावेळी नगरसेवक अमर बागडे, जनार्दन स्वामी योगाभ्यासी मंडळाचे रामभाऊ खांडवे, मंडळाचे अध्यक्ष सुनील सिर्सीकर, मिलिंद वझलवार प्रामुख्याने उपस्थित होते. या मंडप पूजनप्रसंगी प्रशांत राजूरकर, अनिल नाजपांडे, नंदकिशोर जोशी, राहुल कानिटकर, संदीप रेचे, सुशील कदम, स्वप्निल भोसकर, भारती कुसरे, सीमा मुजुमदार, वासंती शर्मा, स्वाती राजूरकर मोठ्या संख्येने उपस्थित होते.