शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
2
“भावाला न्याय मिळत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही”; संतोष देशमुख यांच्या बहिणीचा निर्धार
3
"अनेकांची झोप उडवेल आजचा कार्यक्रम, जेथे मेसेज जायला हवा होता, तेथे पोहोचला"; नेमकं काय म्हणाले पीएम मोदी
4
सौरभची हत्या करणाऱ्या मुस्कान-साहिलने हात जोडले; जेलमध्ये ढसाढसा रडले अन् म्हणाले...
5
आई, वडील आयटी प्रोफेशनल; काळजावर दगड ठेवत अवघ्या तीन वर्षांच्या मुलीला दिला जैन धर्माचा संथारा, कहाणी ऐकून व्हाल भावूक...
6
Rold Rates 2 May : सोन्याच्या किंमतीत जोरदार घसरण, ७८ हजारांपर्यंत येऊ शकतो १० ग्रॅम सोन्याचा दर?
7
अधिकाधिक हिंदू तरुणींवर बलात्कार करण्याचं होतं लक्ष्य, भोपाळ लव्ह जिहाद प्रकरणातील आरोपीचा धक्कादायक दावा 
8
वादग्रस्त आयएएस प्रशिक्षणार्थी पूजा खेडकर पुणे पोलिसांत हजर; मनाने आलेली नाही, सामाजिक कार्यकर्त्यांचा आरोप 
9
Waves Summit 2025: "भारतात पुरेसे सिनेसमागृहच नाहीत..." आमिर खानने व्यक्त केली खंत
10
केवळ १००० रुपयांनी गुंतवणूक करून तुमच्या मुलांना बनवू शकता कोट्यधीश; कोणती आहे ही स्कीम?
11
पाकिस्तानने अटारी, वाघा बॉर्डरचे गेट उघडले; धास्ती एवढी की पाकिस्तानींनाही घेत नव्हते...
12
प्रेक्षकांचा सूरज चव्हाणला 'गोलीगत धोका', 'झापुक झुपूक'ने पहिल्या आठवड्यात केली फक्त इतकी कमाई
13
श्रीराम दर्शनाची ओढ लागली, ३०० वर्षे जुनी परंपरा मोडली; हनुमानगढीचे महंत मंदिराबाहेर पडले!
14
हवाई दलाचं जबरदस्त शक्तिप्रदर्शन, हायवेवर उतरवली मिराज, राफेलसह ही लढाऊ विमानं
15
सिद्धार्थ-मितालीच्या घरी आला छोटा पाहुणा, फोटो शेअर करत दिली गुड न्यूज
16
WhatsApp वेबवर व्हॉइस आणि व्हिडीओ कॉलिंग फीचर लाँच; आता तुम्ही थेट करू शकता कॉल
17
बजाज चेतकला एप्रिल फूल बनविले; टीव्हीएस पहिल्यांदाच नंबर १, विक्रीत ओला कुठे...
18
पाकिस्तानी हवाई क्षेत्र बंद; एअर इंडियाला 5000 कोटी रुपयांचा फटका बसण्याचा अंदाज...
19
दारूच्या व्यसनाने आई आणि चुलतीचा खून; बीड जिल्हा दोन हत्येच्या घटनांनी हादरला
20
पंकजा मुंडेंना कॉल अन् पाठवला अश्लील मेसेज, पुण्यातील तरुणाला पोलिसांनी केली अटक

नागपुरात 17 ते 19 नोव्हेंबरपर्यंत अखिल भारतीय योग संमेलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2017 11:34 IST

नागपुरात योगमूर्ती जनार्दनस्वामी महाराज यांच्या शतकोत्तर रजत जयंतीनिमित्त जनार्दनस्वामी योगाभ्यासी मंडळातर्फे अखिल भारतीय योग संमेलनाचे आयोजन 17 ते 19 नोव्हेंबर या कालावधीत करण्यात आले आहे.

ठळक मुद्देआरोग्य मार्गदर्शन, कीर्तन, प्रवचनांचे आयोजन5 हजार योगसाधक सहभागी होण्याची अपेक्षा

नागपूर : योगमूर्ती जनार्दनस्वामी महाराज यांच्या शतकोत्तर रजत जयंतीनिमित्त जनार्दनस्वामी योगाभ्यासी मंडळातर्फे अखिल भारतीय योगसंमेलनाचे आयोजन 17 ते 19 नोव्हेंबर या कालावधीत करण्यात आले आहे. या संमेलनात आतापर्यंत 2500 योगसाधकांची नोंदणी झाली असून 5 हजारापेक्षा जास्त योगसाधक सहभागी होण्याची शक्यता आहे, अशी माहिती जनार्दनस्वामी योगाभ्यासी मंडळाचे कार्यवाह व योगतज्ज्ञ राम खांडवे यांनी येथे दिली.

रामनगर संघ मैदान येथे आयोजित या योगसंमेलनाची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रपरिषदेत ते बोलत होते. या प्रसंगी जनार्दनस्वामी योगाभ्यासी मंडळाचे अध्यक्ष सुनील सिर्सिकर उपस्थित होते. राम खांडवे म्हणाले, योगमूर्ती जनार्दनस्वामी महाराज यांच्या शतकोत्तर जयंतीनिमित्त 1992 मध्ये योग संमेलन आयोजित करण्यात आले होते. त्यावेळी 1500 हून अधिक योगसाधक सहभागी झाले होते. तेव्हापासून नागपुरात योग चळवळीला सुरुवात झाली.

आजही 500 योग शिक्षक नि:शुल्क प्रशिक्षण देत आहे. म्हणूनच, इतर ठिकाणी योगाचे वर्ग चालतात नागपुरात मात्र योग चळवळ चालते. संमेलन होणा-या रामनगर मैदानाला ‘योगमूर्ती नगर’ असे नाव देण्यात आले आहे. योगसाधक एकाचवेळी योगसाधना करू शकतील या प्रकारे मंडपाची उभारणी करण्यात आली आहे. याचे व्यासपीठ 80 बाय 40 फुटाचे असणार आहे. योगसंमेलनाचे उद्घाटन शुक्रवारी 17 नोव्हेंबर रोजी सकाळी 10.30 वाजता केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक, जहाजबांधणी व जलसंपदा मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते होईल. यावेळी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित राहतील.

या योगसंमेलनात विविध रोगांच्या प्रसिद्ध डॉक्टरांची चमू रोगांची शास्त्रीय कारणे सांगतील तर यावर उपयुक्त योगोपचार सांगितले जातील. या शिवाय, प्रसिद्ध प्रवचनकार अशित आंबेकर, न्यूरो सायकियाट्रीस्ट डॉ. संजय फडके यांचे मार्गदर्शन होईल. रोज सायंकाळी 6 ते 8 वाजताच्या दरम्यान प्रसिद्ध कीर्तनकार चारुदत्त आफळे यांचे कीर्तन, विवेक घळसासी व जितेंद्रनाथ महाराज यांची प्रवचने आयोजित केली आहेत, अशी माहितीही त्यांनी दिली.

टॅग्स :Yogaयोग