शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही इंग्रजी आहोत का? इथे लंडनमधून राहायला आलोय का?" बावनकुळेंनी ठाकरे बंधूंना सुनावलं
2
"भजन करायला थोडीच बसलोय, मठ पुरेसे आहेत...!"; हा श्लोक म्हणत CM योगी भरविधानसभेत कडाडले
3
शिवसेना-मनसे युती, संजय राऊतांना मानाचे स्थान, पण बाळा नांदगावकर कुठेच दिसेना; गेले कुठे?
4
ऐन महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत राज्य मंत्रिमंडळाची बैठक; चार मोठे निर्णय घेतले
5
टीम इंडियाचा ICC क्रमवारीत धुमधडाका! एक-दोन नव्हे, तब्बल ५ स्टार क्रिकेटर रँकिंगमध्ये अव्वल
6
अतिशय गुप्तपणे भारताने बंगालच्या खाडीत केला मोठा धमाका; कित्येक किमी पसरला आवाज, चीनला धडकी
7
"भगवा झेंडा पाहून TMC चा लाठीचार्ज, गुंडांना पोलिसांच्या मागे लपवणं..."; ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
8
Viral Video: भगवान विष्णूची कंबोडियातील मूर्ती लष्कराने पाडली, व्हायरल होत असलेला व्हिडीओचे सत्य काय?
9
"आमचं हिंदुत्व अस्सल, फक्त मतांसाठी भगवी शाल घालणारे आम्ही नाहीत"; मुख्यमंत्र्यांचे राज ठाकरेंना सडेतोड उत्तर
10
भाजपाला धक्का, महादेव जानकरांची काँग्रेससोबत आघाडी, एकत्र निवडणूक लढवणार  
11
Eknath Shinde: आपली पोरं सांभाळू शकत नाहीत, मुंबई काय सांभाळणार? एकनाथ शिंदेंची ठाकरे बंधूंवर टीका
12
'धुरंधर'च्या यशावर रणवीर सिंह गप्प का? सिनेमातील 'डोंगा'नेच दिली प्रतिक्रिया; म्हणाला...
13
Taurus Yearly Horoscope 2026: वृषभ राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल, प्रतिभा आणि संयमाची कसोटी; 'या' वर्षात कुटुंबाची साथ ठरेल यशाची गुरुकिल्ली!
14
"पराभव समोर दिसताच भाजप पैसा आणि जातीचे राजकारण सुरू करते" आदित्य ठाकरेंची बोचरी टीका!
15
विराट सेंच्युरी! किंग कोहलीनं मोडला मास्टर ब्लास्टर सचिनचा रेकॉर्ड; वेगाने गाठला १६००० धावांचा पल्ला
16
नितेश राणे, प्रवीण दरेकर आणि प्रसाद लाड यांना कोर्टाचा दणका, बजावलं अजामिनपात्र वॉरंट
17
जपानमध्ये शंभरी पार करणार्‍यांची संख्या लक्षावधी, महिलांचे प्रमाण अधिक; दीर्घायुष्याचे गुपित काय?
18
युतीची घोषणा मात्र जागांचा सस्पेन्स; उद्धवसेना-मनसेत जागावाटपावर 'असा' ठरलाय फॉर्म्युला?
19
सोनं थांबेना, चांदी आवरेना! सोन्याच्या दरात ७०% तर चांदीत १५० टक्क्यांची वाढ; पाहा कुठे पोहोचतील किमती?
20
राष्ट्रवादीचे नेते राहुल कलाटे भाजपमध्ये;पक्षातील कार्यकर्त्यांचा विरोध डावलून दिला प्रवेश
Daily Top 2Weekly Top 5

चौघांना २६ पर्यंत पीसीआर

By admin | Updated: June 23, 2014 01:17 IST

नंदनवन भागातील तिहेरी खूनप्रकरणी अटक करण्यात आलेल्या चार आरोपींना रविवारी नंदनवन पोलिसांनी कडेकोट पोलीस बंदोबस्तात अवकाशकालीन प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी जी. आर. पाटील यांच्या

न्यायालय : नंदनवन तिहेरी खूनप्रकरण नागपूर : नंदनवन भागातील तिहेरी खूनप्रकरणी अटक करण्यात आलेल्या चार आरोपींना रविवारी नंदनवन पोलिसांनी कडेकोट पोलीस बंदोबस्तात अवकाशकालीन प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी जी. आर. पाटील यांच्या न्यायालयात हजर करून त्यांचा २६ जूनपर्यंत पोलीस कोठडी रिमांड प्राप्त केला. दिलीप विठ्ठलराव कोसूरकर (२५) रा. जुना बगडगंज, रॉबिन राहुल बोरकर (२१) रा. गरोबा मैदान, गणेश ऊर्फ गोल्डी जन्मजय कुटे (२२) रा. व्यंकटेश कॉलनी आणि दीपक ऊर्फ मुन्ना बालकदास गिले (२५) रा. गंगाबाई घाट स्विपर कॉलनी, अशी आरोपींची नावे आहेत. रशीदखान जसीमखान (२५) रा. हिवरीनगर, अब्दुल बेग कादीर बेग (२१) रा. वसंतराव नाईक झोपडपट्टी आणि रोहित युवराज नारनवरे (१५) रा. पडोळे ले-आऊट हिवरीनगर , अशी मृताची नावे आहेत. या प्रकरणाची थोडक्यात हकीकत अशी की, मंजु काशीकर खुनातून निर्दोष सुटलेल्या गज्जू वंजारी याच्या लग्नाचा स्वागत समारंभ २० जून रोजी सक्करदरा तलावाजवळील हॉटेल बॉलिवूड सेंटर पॉर्इंट येथे होता. या समारंभात हिवरीनगर भागातील कुख्यात गुन्हेगार राहुल ऊर्फ चपट्या मेश्राम आणि कुख्यात कोसूरकर बंधू हे आपापल्या टोळक्यांसह आले होते. दिलीप कोसूरकर हा गुन्हेगारीपासून अलिप्त राहू इच्छित असल्याने राहुल चपट्या हा नेहमी हिणवून मोबाईलवरून त्याला शिवीगाळ करायचा. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यात वैमनस्य निर्माण झाले होते. विवाह स्वागत समारंभात या दोन्ही टोळ्या आमोरासमोर येताच कोसूरकर टोळीने राहुल चेपट्यावर तलवार,चाकू, सुरी आदी शस्त्रे उगारली होती. त्यामुळे चेपट्याच्या टोळीने शस्त्रे काढली होती. परंतु कासूरकर टोळी वरचढ झाल्याने चेपट्यासह टोळीतील सदस्य आपापल्या वाहनांनी पसार झाले होते. रशीदखान, अब्दुल, रोहित आणि प्रदीप भारत घोडे रा. जुना बगडगंज हे चौघे एकाच फ्रिडम मोटारसायकवर बसून पळून जात असताना सशस्त्र कोसूरकर टोळीने स्कार्पिओने त्यांचा पाठलाग केला. २० जूनच्या रात्री ११.३० वाजताच्या सुमारास हसनबागेतील मकदूम अशफाक चौक ते श्रीकृष्णनगर दरम्यान त्यांनी मोटरसायकलला जोरदार धडक मारून दोघांना घटनास्थळीच चिरडून ठार केले. तर दोघांना जखमी केले. त्यापैकी रोहितचा मेडिकल इस्पितळात उपचार घेताना मृत्यू झाला. प्रदीप घोडे याच्या तक्रारीवरून नंदनवन पोलिसांनी भादंविच्या ३०२, ३०७, १२० (ब), १४१, १४३, १४४, १४८, १४९, ५०६ (ब), शस्त्र कायद्याच्या ४/२५ आणि मुंबई पोलीस कायद्याच्या १३५ कलमान्वये गुन्हा दाखल करून चौघांना अटक केली. आरोपींपैकी स्कार्पिओतील दोन जण एका ट्रकवर धडकल्याने जखमी झाले आहेत. आज तपास अधिकारी पोलीस निरीक्षक नंदकुमार बिडवाई यांनी चारही आरोपींना न्यायालयात हजर करून २८ जूनपर्यंत पोलीस कोठडी रिमांडची मागणी केली. बचाव पक्षाने पोलीस कोठडीस विरोध केला. न्यायालयाने दोन्ही बाजू ऐकून आरोपींना २६ जूनपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला. न्यायालयात आरोपींच्या वतीने अ‍ॅड. प्रफुल्ल मोहगावकर, अ‍ॅड. पराग उके यांनी काम पाहिले. (प्रतिनिधिी)