शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

नागपूरची अख्खी शहर काँग्रेस दिल्ली दरबारात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2018 10:56 IST

नागपुरातील अख्खी काँग्रेस बुधवारी दिल्लीत दाखल झाली. माजी मंत्री सतीश चतुर्वेदी यांना पक्षातून काढण्यात आल्याची कारवाई केल्याबाबत नेत्यांचे आभार मानण्यासाठी शहर अध्यक्ष विकास ठाकरे समर्थकांसह दिल्लीत दाखल झाले.

ठळक मुद्देमुत्तेमवार-ठाकरे गटासह चतुर्वेदी समर्थकही दाखल ज्येष्ठ नेत्यांच्या भेटी घेऊन मांडली बाजू

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागपुरातील अख्खी काँग्रेस बुधवारी दिल्लीत दाखल झाली. माजी मंत्री सतीश चतुर्वेदी यांना पक्षातून काढण्यात आल्याची कारवाई केल्याबाबत नेत्यांचे आभार मानण्यासाठी शहर अध्यक्ष विकास ठाकरे समर्थकांसह दिल्लीत दाखल झाले. तर माजी खासदार गेव्ह आवारी व विरोधी पक्षनेते तानाजी वनवे हे चतुर्वेदी यांच्यावरील कारवाई मागे घेण्याच्या मागणीसाठी समर्थकांना घेऊन दिल्लीत पोहचले. दोन्ही गटांनी दिवसभर काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांच्या भेटी घेतल्या व आपली बाजू मांडली. नागपुरातील काँग्रेस दिल्लीत कुस्ती करीत असल्याने भाजपाला येथे आयते मैदान मोकळे झाल्याचे चित्र आहे.चतुर्वेदी यांच्यावरील कारवाईनंतर मुत्तेमवार-ठाकरे गटात उत्साह संचारला आहे. कारवाईसाठी नेत्यांचे आभार मानण्याकरिता ठाकरे यांच्या नेतृत्वात समर्थकांचे शिष्टमंडळ मंगळवारी सकाळी विमानाने दिल्लीत पोहचले. काँग्रेस नेते अहमद पटेल, कमलनाथ, ए.के. अ‍ॅन्थोनी, मोतीलाल व्होरा, मुकुल वासनिक, अशोक चव्हाण यांची भेट घेतली. पक्षविरोधी कारवाया करणाऱ्यांचा लेखाजोखा सादर करीत गेल्या चार वर्षात शहर काँग्रेसने केलेल्या कार्यक्रमांचा आढावा सादर केला.दुसरीकडे, चतुर्वेदी यांच्यावरील कारवाईनंतर समर्थकांमध्ये नाराजी वाढली आहे. नुकतेच चतुर्वेदी यांनी होळी मिलन घेत समर्थकांसह शक्तिप्रदर्शन केले. कारवाईनंतरही समर्थकांनी चतुर्वेदी यांच्या बंगल्यावर हजेरी लावत आपण अशा कारवाईपुढे नमते घेणार नाही, असे संकेत दिले होते. यानंतर चतुर्वेदी हे दिल्लीत दाखल झाले. आपल्यावरील कारवाई द्वेषपूर्ण व चुकीची असल्याचा मुद्दा समोर करीत ती रद्द करण्यासाठी त्यांनी दिल्लीत फिल्डिंग लावली. माजी खासदार गेव्ह आवारी यांच्या नेतृत्वात चतुर्वेदी समर्थकांचे शिष्टमंडळही बुधवारी रेल्वेने दिल्लीत दाखल झाले. त्यांनीही विविध नेत्यांच्या भेटी घेत चतुर्वेदींवरील कारवाई मागे घेण्याची मागणी केली. सोबतच शहर काँग्रेसची संघटनात्मक निवडणूक घेण्याचा आग्रह धरला. ठाकरे यांनी ३६ जणांचे शिष्टमंडळ आले असल्याचे सांगत सर्वांची नावे प्रसार माध्यमांकडे जाहीर केली. तर, वनवे यांनी आपल्यासोबत ५५ जण आले असल्याचे सांगितले. मात्र, सर्व नावे जाहीर केली नाहीत. दोन्ही शिष्टमंडळे बुधवारीही दिल्लीत ठाण मांडून राहणार आहेत. दोन्ही गटांची बाजू ऐकून घेतल्यानंतर ज्येष्ठ नेते कुणाची बाजू घेतात, चतुर्वेदींवरील कारवाई मागे घेतात का की फक्त म्हणणे ऐकून घेत ‘चलने दो’ची भूमिका घेतात हे येत्या काळात स्पष्ट होईल. तसेच यावरून कोणत्या गटाचे काँग्रेसमध्ये ‘अच्छे दिन’ आलेत हे देखील स्पष्ट होईल.

टॅग्स :congressकाँग्रेस