शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

कॉटन मार्केटमध्ये भाजीपाला नेण्याचे सर्व मार्ग बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2020 21:39 IST

सर्व अडतिये आणि व्यापाऱ्यांना व्यवसाय करण्याची परवानगी द्यावी आणि शेतकऱ्यांचा माल मार्केटच्या आत नेण्याच्या परवानगीसह मार्केट पूर्ववत सुरू करण्याची मागणी महात्मा फुले अडतिया असोसिएशनच्या पदाधिकाºयांनी मनपाचे अधिकारी महेश मोरोणे यांच्याकडे केली. बुधवारी मार्केटमध्ये भाज्यांची विक्री बंद होती.

ठळक मुद्देमार्केटमध्ये भाज्यांची विक्री बंदच : पूर्वीप्रमाणेच सुरू करण्याची अडतियांची मागणी

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : सर्व अडतिये आणि व्यापाऱ्यांना व्यवसाय करण्याची परवानगी द्यावी आणि शेतकऱ्यांचा माल मार्केटच्या आत नेण्याच्या परवानगीसह मार्केट पूर्ववत सुरू करण्याची मागणी महात्मा फुले अडतिया असोसिएशनच्या पदाधिकाºयांनी मनपाचे अधिकारी महेश मोरोणे यांच्याकडे केली. बुधवारी मार्केटमध्ये भाज्यांची विक्री बंद होती.असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांची बुधवारी मोरोणे यांच्या कार्यालयात बैठक झाली. अडतियांची मागणी आणि बाजार बंद करण्याच्या प्रश्नावर चर्चा झाली. असोसिएशनचे सचिव राम महाजन म्हणाले, कॉटन मार्केटमध्ये सध्या व्यवसाय करणारे ८२ अडतिये आहेत. उर्वरित अडतिये कळमन्यात स्थलांतरित झाले आहेत. मनपाने व्यवसायासाठी यादी तयार केली तेव्हा कळमन्यातील अडतिये आणि कॉटन मार्केटलगतचे आलू-कांद्याच्या चिल्लर व्यापाऱ्यांना समाविष्ट केले. मनपाने २४० जणांची यादी केली आणि ४० जणांना एका दिवशी व्यवसाय करण्याची परवानगी दिली. त्यामुळे मंगळवारी व्यवसाय करणाऱ्याचा नंबर दुसऱ्या आठवड्यात मंगळवारी लागणार होता. पूर्वीच बाजार ५० दिवस बंद राहिल्याने अडतिया आणि व्यापाऱ्यां ना आर्थिक फटका बसला आहे. मनपाच्या या नियमामुळे येथील व्यवसाय पूर्णपणे बंद होणार आहे. याचा निषेध म्हणून मार्केट बंद केल्याचे महाजन यांनी स्पष्ट केले.भाज्याच्या गाड्या आत नेण्यास मनाईमार्केटच्या आत भाज्याच्या गाड्या नेण्याचे सर्व मार्ग बुधवारी टिनांनी बंद केले आहेत. त्यामुळे बाजाराबाहेर गाड्या उभ्या करून भाज्यांचे प्रत्येक पोते आत नेणे शक्य नाही. अडतिया, व्यापाऱ्यां नी व्यवसाय आणि शेतकऱ्यांनी भाज्यांची विक्री करू नये, असे धोरण मनपाने अवलंबविले आहे. या पद्धतीने व्यवसाय होणार नाही. गर्दी होऊ नये, याकरिता असोसिएशन सज्ज आहे. त्याच प्रमाणात मनपाच्या कर्मचाऱ्यां नाही दक्ष राहावे. शहरात रस्त्याच्या कडेला भाज्यांची विक्री करून शेतकऱ्यांना नुकसान सोसावे लागत आहे. मनपाचे हेच धोरण राहिले तर शेतकरी नागपुरात भाज्या आणणार नाहीत. त्यामुळे नागरिकांना तापत्या उन्हाळ्यात जास्त भावात भाज्या खरेदी कराव्या लागतील. त्यामुळे नागरिकांकडून ओरड होणार आहे. पूर्वीप्रमाणे मार्केट सुरू ठेवण्यास शहराला भाज्यांचा सुरळीत पुरवठा होईल आणि याकरिता मनपा अधिकाऱ्यांनी पुढाकार घ्यावा, असे महाजन यांनी सांगितले.