शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर व अजनी रेल्वेस्थानकावर ‘अलर्ट’ जारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2018 12:54 IST

रेल्वेगाड्यांमध्ये घातपात घडवून आणण्यासाठी दहशतवाद्यांना प्रशिक्षण देण्यात येत असल्याचा प्रकार उघडकीस आल्यामुळे नवी दिल्लीतील रेल्वे मुख्यालयाने सर्व रेल्वेस्थानकांवर अलर्ट जारी केला आहे.

ठळक मुद्देसंवेदनशील रेल्वेगाड्यांवर नजरमुख्यालयाकडून ‘आरपीएफ’ला सूचना

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : रेल्वेगाड्यांमध्ये घातपात घडवून आणण्यासाठी दहशतवाद्यांना प्रशिक्षण देण्यात येत असल्याचा प्रकार उघडकीस आल्यामुळे नवी दिल्लीतील रेल्वे मुख्यालयाने सर्व रेल्वेस्थानकांवर अलर्ट जारी केला आहे. त्यानुसार नागपूर, अजनी स्थानकावर सुरक्षा व्यवस्था वाढविण्यात आली असून दिल्लीकडून येणाऱ्या आणि इतर संवेदनशील रेल्वेगाड्यांची कसून तपासणी करण्यात येत आहे.रेल्वेगाड्यांमध्ये घातपात घडवून आणण्यासाठी दहशतवाद्यांना अल कायदाकडून प्रशिक्षण देण्यात येत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. त्यामुळे रेल्वेच्या दिल्ली मुख्यालयाकडून सर्व रेल्वेस्थानकांवर अलर्ट जारी करण्यात आला आहे. सर्व रेल्वे कर्मचाऱ्यांना दक्ष राहण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. कोणतीही संशयास्पद हालचाल दिसल्यास त्वरित मुख्यालयाशी संपर्क साधण्याच्या सूचना अलर्टमध्ये देण्यात आल्या आहेत. नागपूर आणि अजनी स्थानकावर सुरक्षा व्यवस्था वाढविण्यात आली आहे. नागपूर रेल्वेस्थानकावर दररोज १५० च्या वर प्रवासी गाड्या धावतात. यात प्रवाशांची संख्या ४० ते ४५ हजारावर आहे. रेल्वेस्थानकाच्या आत प्रवेश करण्यासाठी अनेक खुष्कीचे मार्ग असून सुरक्षा भिंतही नाही. यात बॅग स्कॅनरही दीड महिन्यापासून बंद असल्यामुळे सुरक्षा यंत्रणेची जबाबदारी आणखीनच वाढली आहे. या सर्व बाबींकडे पाहून आरपीएफचे वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्त ज्योती कुमार सतिजा यांनी सुरक्षा व्यवस्थेत वाढ केली आहे. राजधानी एक्स्प्रेसची कसून तपासणी करण्यात येत असून श्वान पथकाद्वारे प्लॅटफॉर्मवर नजर ठेवण्यात येत आहे.सुरक्षेत वाढ‘रेल्वे सुरक्षा दल नेहमीच सतर्क राहते. परंतु मुख्यालयाकडून पत्र मिळाल्यामुळे रेल्वेस्थानकावर अलर्ट जारी करण्यात आला आहे. नागपूर-अजनी स्थानकावर सुरक्षा वाढविण्यात आली आहे. संवेदनशील तसेच दिल्लीकडून येणाऱ्या गाड्यांची तपासणी केली जात आहे. याशिवाय श्वानपथकाद्वारे रेल्वेगाड्यांमध्ये तपासणी करण्यात येत आहे.’-ज्योती कुमार सतिजा, वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्त,आरपीएफ, नागपूर

टॅग्स :Nagpur Railway Stationरेल्वे स्टेशन नागपूर