शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात  लॉकडाऊनमध्ये वाढली दारू तस्करी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2020 21:22 IST

लॉकडाऊन वाढण्याची अफवा पसरवून शहरातील दारूविक्रेते कर्मचाऱ्यांच्या मदतीने दारूची तस्करी करीत आहेत. तीन ते चार पट किमतीने दारूची विक्री सुरू आहे. या परिस्थितीत बनावट दारूचाही सुळसुळाट वाढला आहे.

ठळक मुद्देबनावट दारूच्या किमतीही वाढल्या : उत्पादन शुल्क विभागाचे दुर्लक्ष

लोकमत  न्यूज  नेटवर्क नागपूर : लॉकडाऊन वाढण्याची अफवा पसरवून शहरातील दारूविक्रेते कर्मचाऱ्यांच्या मदतीने दारूची तस्करी करीत आहेत. तीन ते चार पट किमतीने दारूची विक्री सुरू आहे. या परिस्थितीत बनावट दारूचाही सुळसुळाट वाढला आहे. व्यापारी बनावट दारू दुप्पट, तिप्पट किमतीत विकत आहेत. या बनावट दारूचे दुष्परिणाम समोर आल्यावर प्रशासन अडचणीत सापडणार आहे.शहर पोलीस लॉकडाऊनच्या बंदोबस्तात आहेत. अशात उत्पादन शुल्क विभागाची भूमिका महत्वाची आहे. विभागाचे अधिकारी झोपडपट्टी अथवा दुचाकी वाहनातून होणाऱ्या दारूच्या तस्करीवर कारवाई करीत आहेत. मोठ्या दारू व्यावसायिकांपर्यंत त्यांचे हात पोहचत नाहीत. दारूच्या अवैध तस्करीला मोठे व्यापारी प्रोत्साहन देत आहेत. दोन महिन्यापूर्वी कळमना पोलिसांनी नकली दारूचा कारखाना चालविणाºयाला उत्तर नागपुरातील एका व्यापाºयाला पकडले होते. त्याची जिल्ह्यात २५ दुकाने आहेत. अशीच अवस्था गल्ली मोहल्ल्यात सत्कार करीत फिरत असलेल्या शहर पोलिसातील काही अधिकाऱ्यांची आहे. सुरुवातीला त्यांनी छोट्यामोठ्या कारवाई करून वाहवा लुटली. झोपडपट्टीतील सट्टा, जुगार अड्डा पकडून अधिकारी शांत झाले. यासंदर्भात उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक रावसाहेब कोरे यांच्याशी संपर्क केल्यावर ते म्हणाले की, यासंदर्भात अधीक्षक अधिकृत माहिती देऊ शकतील. विभागाचे अधीक्षक अभिषेक सोनोने यांच्याशी सातत्याने संपर्क केला असता, कुठलाही प्रतिसाद मिळाला नाही. सांगण्यात येत आहे की, पोलिसांकडून सातत्याने होत असलेल्या कारवाईची चर्चा मुंबईत होत आहे. त्यामुळे उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी चिंतेत आहेत.स्टॉक संपलाय..लागू द्या शेपाचशे३ मे पर्यंत लॉकडाऊन आहे. दारूची दुकाने १८ मार्चपासून बंद आहेत. दारू पिणाऱ्यांचा स्टॉकसुद्धा संपला आहे. सुरुवातीला लोकांनी दुप्पट किमतीला दारूची खरेदी केली. ‘लागू द्या..शे पाचशे’ म्हणून कितीही पैशात घ्यायला अनेकजण तयार आहेत. त्यामुळेच सध्या दारूची किंमत तीन ते चार पटीने वाढली आहे. दारूविक्रेत्यांकडून लॉकडाऊन पुन्हा वाढेल, दारूची दुकाने सुरू व्हायला वेळ लागेल, असे सांगण्यात येत आहे. त्यामुळे पिणारेही मागेल तेवढे पैसे देत आहेत. अशा परिस्थितीत बनावट दारूची विक्रीही वाढली आहे. व्यापारी मध्यप्रदेशातील स्वस्त दारू ब्रॅण्डेड बॉटलमध्ये भरून विकत आहेत. तर काहींनी नकली दारू बनविण्याचे युनिट सुरू केले आहे. ही दारू जास्त प्रमाणात सेवन केल्याने जीवघेणी ठरू शकते.

टॅग्स :liquor banदारूबंदीSmugglingतस्करी