शहरं
Join us  
Trending Stories
1
नोकरी शोधणाऱ्यांसाठी खुशखबर ! 'या' सरकारी संस्थांमध्ये १०० टक्के पदभरतीस मान्यता
2
Video: मान गए माही... MS Dhoni ने क्रिकेट संघटनेच्या कर्मचाऱ्यांसोबत साजरा केला वाढदिवस
3
"चालक नसल्याने नवीन बससेवा सुरु करता येणार नाही"; परिवहन विभागाच्या पत्रावर राजू शेट्टींचा संताप
4
CCTV: धावत्या स्कूल व्हॅनच्या डिक्कीतून पडले विद्यार्थी; चालकाला पत्ताच नाही, रिक्षावाल्यामुळे वाचले
5
भारतीयांचा जगात डंका ! ICCच्या CEO पदी संजोग गुप्ता यांची निवड, ठरले केवळ दुसरे भारतीय
6
OYO हॉटेलमध्ये एका तासासाठी खोली कशासाठी दिली जाते? सरकारने माहिती घेण्याची मुनगंटीवारांची मागणी
7
"डार्लिंग, काम झालं..."; माय-लेकींचं अफेअर, बॉयफ्रेंडसाठी वडिलांचा काढला काटा, झाला पर्दाफाश
8
पुतिन यांनी काही तासांपूर्वीच मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली; आता सापडला मृतदेह
9
Video: "लाज वाटू द्या, गिधाडांनो"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावले, रोहिणी खडसेंचा संताप
10
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
11
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
12
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
13
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
14
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
15
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
16
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
17
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
18
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"
19
“ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदींना दोन ओळी मराठी बोलता येत नाही”; शिंदेसेनेची टीका
20
ब्रायन लाराचा ४०० धावांचा विक्रम थोडक्यात बचावला, फलंदाज ३६७ धावांवर नाबाद असताना घडलं असं काही...  

चिंताजनक! जगातील ६५ टक्के पुरुषांना नपुंसकतेचा धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2023 08:00 IST

Nagpur News प्रजननासंबंधीची समस्या ही जागतिक समस्या झाली आहे. जगातील ६५ टक्के पुरुष नपुंसकतेच्या धोक्यात आहेत. १५ टक्के पुरुष हे नपुंसकतेने ग्रस्त आहेत.

ठळक मुद्देवंध्यत्व व नपुंसकत्व टाळणारे ‘जीन एडिटिंग’ दृष्टिपथात

आनंद डेकाटे

नागपूर : प्रजननासंबंधीची समस्या ही जागतिक समस्या झाली आहे. जगातील ६५ टक्के पुरुष नपुंसकतेच्या धोक्यात आहेत. १५ टक्के पुरुष हे नपुंसकतेने ग्रस्त आहेत. या १५ टक्के लोकांपैकी बाळ होण्याची इच्छा असलेले केवळ ८ ते १० टक्के लोकच यशस्वी होतात. तर उर्वरित ९० टक्के लोक अपयशी ठरतात. पुढील १५ ते २० वर्षांत प्रजननाचा दर झपाट्याने कमी होईल, अशी धक्कादायक बाब त्रिवेंद्रम, केरळ येथील राजीव गांधी बायोटेक्नॉलॉजी सेंटर फॉर थारक्वॉडचे वरिष्ठ वैज्ञानिक डॉ. प्रदीप कुमार यांनी निदर्शनास आणून दिली.

इंडियन सायन्स काँग्रेसमध्ये सहभागी होण्यासाठी ते नागपुरात आले असता ‘लोकमत’शी त्यांनी विशेष संवाद साधला. डॉ. प्रदीप कुमार यांनी सांगितले की, शुक्राणूंबद्दलच्याही समस्या वेगवेगळ्या आहेत. काही पुरुषांमध्ये शुक्राणू नाहीत. काहींमध्ये आहेत पण ॲक्टिव्ह नाहीत. काहींचे शुक्राणू सक्रिय आहेत पण महिलांच्या बीजाणूंसोबत संयोग करू शकत नाही. काही संयोग करतात पण प्रजननक्षम राहिलेले नाहीत. जीवनशैली, व्यसनाधीनता, ड्रग्स ॲडिक्शन, उशिरा लग्न, कपडे घट्ट घालणे, बराच काळ बैठे काम करणे आणि पर्यावरणाचा परिणाम या कारणांमुळे शुक्राणूंची गुणवत्ता घसरली आहे.

डॉ. प्रदीप कुमार यांनी सांगितले की, यावर अभ्यास सुरू आहे. जनुकीय गोष्टींवर औषधांचा परिणाम होईल का? हा संशाेधनाचा एक भाग आहे. प्रजननाशी संबंधित २५ हजारांवर जनुके असतात. काही जनुके प्रोटीन तयार करतात. त्यात काही त्रुटी आहेत का? सामान्य व अप्रजनन शुक्राणूचाही अभ्यास केला जात आहे. मोलिक्युलर समस्या आहे का? ही समस्या औषधाने दूर होईल का? याचा अभ्यास किंवा जीन एडिटिंगद्वारे जनुकीय समस्या दूर करण्याचा प्रयत्न केला जात आहे. हा अभ्यास बराच पुढे गेला असून २०२४ मध्ये उंदीर व माकडांवर याची यशस्वीपणे चाचणी पार पडेल. इतकेच नव्हे तर आयसीएमआरच्या मान्यतेनंतर प्रत्यक्ष मनुष्यावर याचा प्रयोग सुरू होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

जागतिक आरोग्य संघटनेनेही ही समस्या गंभीरतेने घेतली

- काही वर्षांपूर्वीपर्यंत आपल्या देशात नपुंसकत्वाची समस्या इतकी गंभीर नव्हती. परंतु आपल्या देशातही ती वाढली आहे. जागतिक आरोग्य संघटनेनेसुद्धा ही समस्या अतिशय गंभीरतेने घेतली आहे.

टॅग्स :scienceविज्ञान