नागपूर : पश्चिम नागपूर नागरिक संघाच्यावतीने रामनगर येथील अध्यात्म मंदिर (श्रीराम मंदिर) येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रीराम जन्मोत्सवानिमित्त तयार करण्यात आलेल्या विशेष पालखीचे विधिवत पूजन केले आणि जन्मोत्सव शोभायात्रेचा शुभारंभ झाला. पश्चिम नागपूर नागरिक संघातर्फे दरवर्षी भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात येत असून पश्चिम नागपूर परिसरात श्रीरामाच्या जयघोषात तसेच रामायणातील विविध चित्ररथ तयार करून शोभायात्रा काढण्यात आली. यंदा शोभायात्रेचे ४२ वे वर्ष होते. शोभायात्रेत ४८ आकर्षक देखावे होते. रामनगर येथील मंदिरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रभू श्रीरामचंद्राचे दर्शन घेऊन पालखीचे पूजन केले. यावेळी पालकमंत्री, चंद्रशेखर बावनकुळे, आमदार सुधाकर देशमुख, प्रकाश गजभिये, माजी खासदार बनवारीलाल पुरोहित, दत्ता मेघे, अध्यक्ष प्रशांत पवार, अजय डबीर, अॅड. आनंद परचुरे, डॉ. पिनाक दंदे, प्रवीण महाजन, रवी वाघमारे, अॅड. राहुल पुराणिक, जयप्रकाश गुप्ता, संजय बंगाले, गिरीश देशमुख, गोपाल बेहेरे आदी उपस्थित होते. रामनगर येथील मंदिरापासून शोभायात्रेचा शुभारंभ होऊन लक्ष्मीभुवन चौक, कॅफे हाऊस, धरमपेठ झेंडा चौक, लक्ष्मीभुवन, शंकरनगर, बजाजनगर, लक्ष्मीनगर, अभ्यंकरनगर चौक, बजाजनगर व्हीएनआयटी गेट, गांधीनगर चौक मार्गे रामनगर चौक, राममंदिर येथे सांगता झाली. प्रारंभी पश्चिम नागपूर नागरिक संघातर्फे संघाचे अध्यक्ष जयंत आपटे, उपाध्यक्ष अशोक पाटलेकर, रवी वाघमारे, सचिव राजीव काळेले, शेखर केदार, प्रवीण महाजन, मदन चौबे व किशोर कोलवाडकर यांनी प्रमुख पाहुण्यांचे स्वागत केले. (प्रतिनिधी)पावसाच्या सरींनी स्वागतयंदा शोभायात्रा निघण्यापूर्वी सायंकाळी ५ वाजता जोरदार वारा आणि पावसाच्या सरींनी प्रभू श्रीरामाचे स्वागत केले. पावसामुळे तब्बल १० मिनिटे कार्यकर्त्यांची तारांबळ उडाली. पण सायंकाळी ५.५० वाजता आकाश निरभ्र झाल्याने कार्यकर्त्यांमध्ये पुन्हा उत्साह संचारला. सायंकाळी ६ वाजता मुख्यमंत्र्यांनी मंदिरात पालखीचे विधिवत पूजन केले. मुख्यमंत्र्यांनी पिवळ्या रंगाची पुणेरी टिळक पगडी परिधान केली होती. श्रीरामाच्या जयघोषात मुख्यमंत्र्यांनी पालखी खांद्यावर घेऊन रथापर्यंत आणली. शोभायात्रेच्या मार्गावर फुलांचा वर्षाव करण्यात आला.विश्वस्तांनी परिधान केली लाल पुणेरी पगडीपश्चिम नागपूर नागरिक संघ, अध्यात्म मंदिर (श्रीराम मंदिर), रामनगरच्या २६ विश्वस्तांनी लाल रंगाची पुणेरी टिळक पगडी परिधाम केली होती. उपस्थितांमध्ये वेगळेपणा दिसून येत होता. याशिवाय महिला आणि लहानांनी लाल आणि पिवळे फेटे घातले होते. श्रीराम जन्मोत्सव शोभायात्रा समितीच्या पदाधिकाऱ्यांमध्ये उत्साहपश्चिम नागपूर नागरिक संघाच्या श्रीराम जन्मोत्सव शोभायात्रा समितीचे कार्याध्यक्ष पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे आहेत. अध्यक्षपदी प्रशांत पवार, स्वागताध्यक्ष अॅड. आनंद परचुरे, आमंत्रक डॉ. पिनाक दंदे, संयोजक अजय डबीर, निमंत्रक सुधाकर देशमुख, सहसंयोजक रवी वाघमारे, समन्वयक मुकुंद सरमुकदम, सहसंयोजक अॅड. राहुल पुराणिक असून सर्वांमध्ये प्रचंड उत्साह होता.आमदार प्रकाश गजभिये यांच्यातर्फे पाणी व ताक वितरण भक्तांचे स्वागत करण्यासाठी बाजीप्रभू चौकाच्या बाजूला आमदार प्रकाश गजभिये यांनी मोठा मंडप उभारला होता. या मंडपातून ध्वनिक्षेपकाद्वारे भक्तांना मार्गदर्शन करण्यात येत होते. याशिवाय भक्तांना पाणी आणि ताक वितरित करण्यात आले. लक्ष्मीभुवन मार्गावर एका हॉटेलसमोर हलवा आणि पाण्याचे वाटप करण्यात आले. या ठिकाणी भक्तांच्या रांगा दिसून आल्या. तसेच चौकात प्रत्येक दुकानासमोर पाण्याचे पाऊच देण्यात येत होते. पालखी खांद्यावर घेऊन रथापर्यंत नेल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी श्री संकटमोचन पश्चिमेश्वर हनुमान मंदिरात पूजा केली. तोपर्यंत शोभायात्रेला प्रारंभ झाला होता. श्रीराम अध्यात्म मंदिरात डॉ. श्वेता खोलकुटे यांनी आरती म्हटली. यावेळी कुलगुरू डॉ. विनायक देशपांडे, माजी कुलगुरू डॉ. विलास सपकाळ, डॉ. प्रशांत राठी, नगरसेवक परिणय फुके, निकोचे बसंतलाल शॉ, भाजपाचे नेते जयप्रकाश गुप्ता आणि इतर मान्यवर उपस्थित होते. पश्चिम नागपूर नागरिक संघ, रामनगरचे पदाधिकारीपश्चिम नागपूर नागरिक संघ, रामनगर पदाधिकाऱ्यांमध्ये अध्यक्षपदी जयंत आपटे, उपाध्यक्ष अशोक पात्रीकर, रवी वाघमारे, सचिव राजीव काळेले, सहसचिव शेखर केदार, अजय डबीर, कोषाध्यक्ष प्रवीण महाजन, सहकोषाध्यक्ष मदन चौबे, किशोर कोलवाडकर आणि विश्वस्त मंडळात बाबासाहेब देशपांडे, श्रीधर पात्रीकर, चंद्रशेखर घुशे, दीपक खिरवडकर, अशोक बागलकोटे, प्रकाश कुळकर्णी, अनिरुद्ध पालकर, राजेंद्र पाठक, अॅड. राहुल पुराणिक, सुरेश उन्हाळे, दिलीप धोटे, विनोद जोशी, प्रभाकर हस्तक, अॅड. सचिन नारळे, मिलिंद वझलवार, मृणाल पुराणिक यांचा समावेश आहे.
रामनामाचा गजर !
By admin | Updated: March 29, 2015 02:38 IST