शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात अक्षयतृतीयेच्या पर्वावर बाजारात तेजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2018 00:24 IST

साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या अक्षयतृतीयेच्या पर्वावर शहरातील बाजारात जोरदार तेजी पाहायला मिळाली. इतवारी, महाल, शंकरनगर, गोकुळपेठ, सदर, खामला या भागात नागपूरकरांची दिवसभर खरेदी सुरू होती.

ठळक मुद्देविक्रेत्यांच्या आकर्षक आॅफर : इतवारी, महाल, शंकरनगर, गोकुळपेठ, सदर, खामल्यात दिवसभर खरेदी

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या अक्षयतृतीयेच्या पर्वावर शहरातील बाजारात जोरदार तेजी पाहायला मिळाली. इतवारी, महाल, शंकरनगर, गोकुळपेठ, सदर, खामला या भागात नागपूरकरांची दिवसभर खरेदी सुरू होती. या मुहूर्तावर अनेक लग्नही होत असतात. त्यानिमित्ताने दागिने, कपड्यांचीही जोरदार खरेदी झाली. व्यापाऱ्यात अचानक तेजी आल्याने विक्रेत्यांचेही चेहरे खुलले. उद्या प्रत्यक्ष अक्षयतृतीयेच्या दिवशी खरेदीचा हा आलेख आणखी उंचावण्याची शक्यता या विक्रेत्यांनी व्यक्त केली आहे. इतवारी सराफा बाजार, महाल, शंकरनगर, गोकुळपेठस्थित मोठ्या ज्वेलरी शोरुममध्ये अक्षयतृतीयेसाठी दागिन्यांची विशेष रेंज आणि कलेक्शन ठेवण्यात आले आहे. सोबतच या दुकानांमध्ये आकर्षक आॅफर आणि बनवाई शुल्कातही सूट दिली जात आहे. याचा लाभ घेण्यासाठी आज दिवसभर या दुकानांमध्ये भीड होती. इतवारी भांडेओळीमध्ये ठोक भांडेबाजारासह संपूर्ण शहरात भांड्यांची खूप विक्री झाली. कपड्यांमध्ये साडी, शेरवानी, सूट खरेदीसाठीही बर्डी मेनरोड, इतवारी, सदर, खामला, गोकुळपेठ या भागातील गारमेंट्स शोरूममध्ये ग्राहकांची गर्दी होती. अक्षयतृतीयेच्या मुहूर्तावर लग्न शुभ समजले जाते. म्हणून घोडी, बग्गी, बॅण्ड, कॅटरिंग, सभागृह सज्ज ठेवण्यात आले होते.वाहनांची बम्पर विक्रीअक्षयतृतीयेच्या निमित्ताने वाहनांची बम्पर विक्री झाली. हा मुहूर्त लक्षात घेऊन शहरातील दुचाकी, चारचाकी विक्रेत्यांनी जोरादार तयारी केली होती. आधीच बुकिंग झालेल्या वाहनांची डिलिव्हरी उद्या अक्षयतृतीयेच्या शुभमुहूर्तावर केली जाईल. आॅटोमोबाईल कंपन्या आणि त्यांच्या डीलर्सनी यासाठी विशेष आॅफर्स आणि सूट जाहीर केली. मोबाईल मार्केटमध्येही अक्षयतृतीयेचा परिणाम स्पष्ट दिसत होता.

टॅग्स :Akshaya Tritiyaअक्षय तृतीयाnagpurनागपूर