शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
4
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
5
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
6
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
7
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
8
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
9
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
10
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
11
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
12
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
13
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
14
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
15
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
16
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
17
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
18
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
19
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
20
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
Daily Top 2Weekly Top 5

अकोल्याचे सचिन बुरघाटे यांना ‘मैत्री गौरव पुरस्कार’

By admin | Updated: December 14, 2014 00:42 IST

१० बाय १० च्या लहानशा खोलीत ज्ञानार्जनाचा यज्ञ प्रज्वलित करून त्याच्या प्रकाशाने शेकडो विद्यार्थ्यांचे जीवन प्रकाशमान करणाऱ्या अकोल्यातील सचिन बुरघाटे यांना नागपुरातील मैत्री परिवार संस्थेतर्फे

नागपूर : १० बाय १० च्या लहानशा खोलीत ज्ञानार्जनाचा यज्ञ प्रज्वलित करून त्याच्या प्रकाशाने शेकडो विद्यार्थ्यांचे जीवन प्रकाशमान करणाऱ्या अकोल्यातील सचिन बुरघाटे यांना नागपुरातील मैत्री परिवार संस्थेतर्फे दिला जाणारा मानाचा ‘मैत्री गौरव पुरस्कार’ जाहीर झाला आहे. अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यातील लाडेगाव हे सचिन बुरघाटे यांचे मूळ गाव. तुटपुुंज्या मिळकतीतून सचिन यांनी शिक्षणाचा गाडा कसातरी पुढे रेटला. अकोटातील शिक्षण आटोपून ते पुण्याला गेले. तेथे एमबीए केले. दरम्यान, काही दिवस एका बँकेत नोकरीही केली. परंतु घरच्या गरिबीमुळे शिक्षण न घेऊ शकणाऱ्या गावाकडच्या मुलांचे चेहरे सतत डोळ्यापुढे हलत राहायचे. अखेर एक दिवस निर्णय घेतला अन् नोकरी सोडून थेट अकोला गाठले. येथे लहानशा खोलीत १३ मुलांना सोबत घेऊन इंग्रजीचे शिकवणी वर्ग सुरू केले. आज हे रोपटे वटवृक्षात रूपांतरित झाले आहे. अ‍ॅस्पायर द इन्स्टिट्यूट आॅफ ह्युमन डेव्हलपमेंट ही बुरघाटे यांची संस्था आज लँग्वेज शिकविणारी महाराष्ट्रातील सर्वात मोठी संस्था म्हणून नावारूपास आली आहे. स्वत: सचिन बुरघाटे हे आंतरराष्ट्रीय कीर्तीचे इंग्लिश ट्रेनर म्हणून ओळखले जातात़ दर दिवाळीला ते अनाथ मुलांना सोबत घेऊन हा सण साजरा करतात. अशा या आदर्श शिक्षकाकडून इतरांनाही सामाजिक बांधिलकीची प्रेरणा मिळावी यासाठी मैत्री परिवाराने बुरघाटे यांना या पुरस्काराकरिता निवडले आहे. अरविंद इनामदार यांच्यापासून सुरू झालेल्या या पुरस्काराच्या क्रमात डॉ. अभय बंग-राणी बंग, डॉ. कोल्हे दाम्पत्य, दिग्दर्शक राजदत्त, अभिजित फाळके, सिंधूताई सपकाळ, देवाजी तोफा यांनाही या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. असा हा मानाचा पुरस्कार सचिन बुरघाटे यांना जाहीर झाला असून, सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन केले जात आहे. (प्रतिनिधी)