शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

विमान कंपन्यांनी रद्द झालेल्या विमानाचा परतावा द्यावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2020 00:42 IST

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विमान कंपन्यांनी प्रवाशांनी केलेल्या बुकिंगचे पैसे परत करण्यास नकार दिल्यामुळे अनेक प्रवासी ग्राहकांचे पैसे विमान कंपन्यांकडे अडकले आहेत. प्रवासी ग्राहकांना विमान कंपन्या दाद देत नाहीत, अशा अनेक तक्रारी ग्राहक पंचायत महाराष्ट्राकडे येत आहेत.

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विमान कंपन्यांनी प्रवाशांनी केलेल्या बुकिंगचे पैसे परत करण्यास नकार दिल्यामुळे अनेक प्रवासी ग्राहकांचे पैसे विमान कंपन्यांकडे अडकले आहेत. प्रवासी ग्राहकांना विमान कंपन्या दाद देत नाहीत, अशा अनेक तक्रारी ग्राहक पंचायत महाराष्ट्राकडे येत आहेत.आयुष्याची पुंजी एकत्र करून परदेशवारी करण्याचे स्वप्न बाळगणाऱ्या अनेक प्रवासी ग्राहकांचे स्वप्न भंग पावले असून, यात विमान कंपन्यांच्या पैसे परत न करण्याच्या आडमुठ्या धोरणामुळे अनेक प्रवासी ग्राहकांची आर्थिक कोंडी झाली आहे. विमान कंपन्यांनी प्रवासी ग्राहकांना एक वर्षाची मुदत देऊन नंतर प्रवास करण्याची मुभा दिली आहे. सगळ्यांनाच हे शक्य असेल असे नाही. अशी सवलत देतानादेखील विमान कंपन्यांनी प्रवाशांच्या हिताला अधिक महत्त्व देणे गरजेचे आहे. प्रवाशांच्या दृष्टीने आकर्षक अशा स्वरूपाचे पॅकेज आणि ज्या ग्राहकांना ही सवलत घ्यायची नसेल त्यांना परतावा देणे आवश्यक आहे.ग्राहकाने स्वत:हून विमानाचे तिकीट रद्द केले तर विमान कंपन्या कॅन्सलेशनच्या नियमानुसार पैसे घेऊन बाकीची रक्कम परत करतात. परंतु जर विमान कॅन्सल झाले किंवा लेट झाले तर त्याचे पूर्ण पैसे विमान कंपन्या देत असतात. या पार्श्वभूमीवर जागतिक महामारीच्या काळात सर्वसामान्य प्रवासी ग्राहकांचा माणुसकीच्या भावनेतून आदर करून प्रवासी ग्राहकांना त्यांच्या बुकिंगचे पैसे परत करावेत, अशा प्रकारची भूमिका ग्राहक पंचायत महाराष्ट्रने मांडली आहे.यासंदर्भात संयुक्त राष्ट्रसंघानेदेखील जगातील सर्व देशांना याबाबत सूचना दिल्या आहेत. देशातील विमान कंपन्यांनी प्रवाशांना बुकिंग केलेले पैसे विनाअट परत करण्याबाबत भारत सरकारने सूचना द्याव्यात, अशी मागणी ग्राहक पंचायत महाराष्ट्र, विदर्भचे अध्यक्ष श्यामकांत पात्रीकर यांनी प्रधानमंत्री, हवाई वाहतूक मंत्री, राज्याचे मुख्यमंत्री तसेच पर्यटनमंत्री यांनी निवेदनाद्वारे केली आहे.

टॅग्स :Dr. Babasaheb Ambedkar International Airportडॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ नागपूरpassengerप्रवासीticketतिकिट