शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

विमानाची ‘टच-डाऊन’ प्रॅक्टिस रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2019 00:28 IST

बुधवारी इंडिगो एअरलाईन्सच्या नागपूर-हैदराबाद ६ई७१०४ विमानाला दीड तास उशीर झाला. कंपनीच्या या विमानाचा चालक दल पूर्वी ‘टच-डाऊन’ प्रॅक्टिस करणारा असल्याचे सूत्रांनी सांगितले.

ठळक मुद्देनागपुरात  इंडिगोच्या उड्डाणांना दीड ते तीन तास उशीर

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : बुधवारी इंडिगो एअरलाईन्सच्या नागपूर-हैदराबाद ६ई७१०४ विमानाला दीड तास उशीर झाला. कंपनीच्या या विमानाचा चालक दल पूर्वी ‘टच-डाऊन’ प्रॅक्टिस करणारा असल्याचे सूत्रांनी सांगितले.विमानाला नागपुरात पोहोचण्यास उशीर झाल्यामुळे नागपूर-हैदराबाद विमानाच्या उड्डाणाला उशीर झाला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार विमान नागपुरात येण्यास आणि हैदराबाद येथे उड्डाणादरम्यान वैमानिकांची टच-डाऊनची पॅ्रक्टिस पूर्वी निश्चित होती. पण उशीर झाल्यामुळे अभ्यास रद्द करण्यात आला. टच-डाऊन प्रॅक्टिसमध्ये वैमानिक विमान चालविताना धावपट्टीजवळ आणतात, पण लॅण्डिंगऐवजी पुन्हा आकाशात नेतात. हा अभ्यास निश्चित वेळेत सुरू असतो. बुधवारी सायंकाळी ७.४५ वाजता दीड तास उशीराने प्रवाशांच्या बोर्डिंगसह विमानाने हैदराबादकडे उड्डाण भरले. या विमानासह इंडिगोच्या नागपूर-चेन्नई विमानाला तीन तास उशीर झाला. सायंकाळी ५.२५ ऐवजी रात्री ८.१८ वाजता रवाना झाले. तर बेंगळुरू-नागपूर विमान तीन तास उशीरा आले. या संदर्भात इंडिगोच्या अधिकाऱ्यांनी ठोस कारण सांगितले नाही.एअर इंडियाची दोन विमाने लेटडॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर इंडिगोच्या विमानांना उशीर झाल्यामुळे बुधवारी एअर इंडियाच्या दोन विमानांनी उशीरा उड्डाण भरले. एआय ६२७ मुंबई-नागपूर विमान १.१५ मिनिटे उशीरासह रात्री ८.३५ वाजता पोहोचले. याशिवाय एआय६२९ मुंबई-नागपूर विमान ४५ मिनिटे उशीरा आले.

टॅग्स :IndigoइंडिगोDr. Babasaheb Ambedkar International Airportडॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ नागपूर