शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
3
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
4
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
5
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
6
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
7
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
8
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
9
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
10
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
11
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
12
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
13
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
14
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
15
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
16
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
17
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
18
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
19
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
20
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
Daily Top 2Weekly Top 5

एअर इंडियाचे मुंबई-नागपूर विमान ‘लेट’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2018 00:20 IST

एअर इंडियाच्या मुंबई-नागपूर विमानाला शुक्रवारी रात्री येण्यास उशीर झाल्यामुळे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ आणि संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या कुलगुरुंसह १५० प्रवासी मुंबई विमानतळावर अडकून पडले. विमानाला विलंब झाल्यामुळे प्रवाशांनी विमानतळावर एकच गोंधळ घातला.

ठळक मुद्देप्रवाशांचा गोंधळ : नागपूर-अमरावती विद्यापीठाच्या कुलगुरुंसह १५० प्रवासी अडकले

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : एअर इंडियाच्या मुंबई-नागपूर विमानाला शुक्रवारी रात्री येण्यास उशीर झाल्यामुळे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ आणि संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या कुलगुरुंसह १५० प्रवासी मुंबई विमानतळावर अडकून पडले. विमानाला विलंब झाल्यामुळे प्रवाशांनी विमानतळावर एकच गोंधळ घातला.वृत्त लिहिपर्यंत एअर इंडियाच्या अधिकाऱ्यांनी प्रवाशांना विमान कधी येईल हे सांगितले नाही. परंतु विमानतळावरच रात्र काढावी लागू शकते याचे संकेत प्रवाशांना दिले. अधिकाऱ्यांकडून स्पष्ट उत्तर न मिळाल्यामुळे प्रवाशांनी विमानतळावर एकच गोंधळ घातला. मुंबईत राज्यभरातील सर्व विद्यापीठांच्या कुलगुरुंची बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीत सहभागी होण्यासाठी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. सिद्धार्थविनायक काणे, संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. मुरलीधर चांदेकर, व गोंडवाना विद्यापीठ गडचिरोलीचे कुलगुरु डॉ. नामदेव कल्याणकर गेले होते. डॉ. कल्याणकर सायंकाळी ५.३० वाजता दुसºया कंपनीच्या विमानाने मुंबईवरून नागपुरात आले. परंतु डॉ. काणे व डॉ. चांदेकर यांनी एअर इंडियाच्या रात्री ७ वाजताच्या विमानाने नागपूरला येण्याचे ठरविले होते. डॉ. काणे यांनी सांगितले की, त्यांना आधी विमानाला ४५ मिनिट उशीर होणार असल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर विमानाला बराच वेळ झाला. दरम्यान विमान रात्री ९.३० वाजता येणार असल्याचे सांगण्यात आले. परंतु तरीही विमान आले नाही. प्रवाशांनी गोंधळ घातल्यानंतर त्यांना रात्रीचे जेवण विमानतळावर देण्यात आले. सोबतच विमानतळावर रात्र काढावी लागू शकते असा संकेत प्रवाशांना देण्यात आला. अधिकाऱ्यांना विचारणा केली असता त्यांनी रात्री ११ वाजता विमान येणार असल्याचे सांगितले. वृत्त लिहिपर्यंत विमान आलेले नव्हते.