शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
2
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
3
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
4
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
5
संघर्षाचा शेवट गोड! तिसऱ्या मजल्यावरून ३९ व्या मजल्यावर; बीडीडीवासीयांचा आनंद गगनात मावेना
6
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
7
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
8
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
9
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
10
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
11
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
12
अतिक्रमित जमिनींचा मिळणार मालकी हक्क, ३० लाख कुटुंबांना लाभ; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती
13
रशियात ८.८ तीव्रतेचा भूकंप; जपान, अमेरिकेत त्सुनामीसारख्या लाटांचे थैमान; जगात भीतीचे ‘हादरे’
14
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
15
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
16
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
17
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
18
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
19
मोटो जी ८६ पॉवर 5G भारतात लॉन्च, जाणून घ्या खिसियत आणि किंमत!
20
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल

गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ

By योगेश पांडे | Updated: June 14, 2025 10:01 IST

Ahmedabad Air India Plane Crash: एअर इंडियाच्या अहमदाबाद-लंडन विमानाच्या क्रॅशनंतर नेमका हा अपघात का झाला, याबाबत विविध कयास वर्तविण्यात येत आहेत. मात्र, विमानांमध्ये अचानकपणे तांत्रिक बिघाड होणे हा प्रकार भारतात नवीन नाही.

- योगेश पांडे नागपूर - एअर इंडियाच्या अहमदाबाद-लंडन विमानाच्या क्रॅशनंतर नेमका हा अपघात का झाला, याबाबत विविध कयास वर्तविण्यात येत आहेत. मात्र, विमानांमध्ये अचानकपणे तांत्रिक बिघाड होणे हा प्रकार भारतात नवीन नाही. तंत्रज्ञान व एआयच्या माध्यमातून असे बिघाड कमी करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. २०२२ पासून देशात ‘एअर इंडिया’च्या विमानांतील ‘फॉल्ट्स’ वाढल्याचे दिसून आले आहे.  

विमान बिघाडासंदर्भात ‘लोकमत’ला प्राप्त झालेल्या अधिकृत आकडेवारीनुसार २०२२ ते २०२४ या कालावधित  देशभरात विविध कंपन्यांच्या विमानांमध्ये १ हजार ४२६ ‘फॉल्ट्स’ समोर आले. यात ‘एअर इंडिया’ व ‘एअर इंडिया एक्स्प्रेस’ या कंपन्यांच्या विमानांत ३१३ फॉल्ट्स आढळले. यात ‘एअर इंडिया’तील २२० व ‘एअर इंडिया एक्स्प्रेस’मधील ९३ फॉल्ट्सचा समावेश होता. 

कंपनीनिहाय फॉल्ट्सकंपनी    २०२२    २०२३    २०२४इंडिगो    ४७१    ११५    १३०स्पाइसजेट    १५०    १४३    ३४एअर इंडिया    ६४    ६२    ९४ए. इं. एक्स्प्रेस    २३    २३    ४७विस्तारा    ३    १४    ००एअर एशिया    ८    १६    ००अकासा    १    ०    ७अलायन्स एअर    ३    ६     ११ 

दुरुस्ती प्रक्रियेत नियमावलीचे पालन विमानातील उपकरणांमध्ये अनेकदा बिघाड होतो. सुरक्षित  सेवेसाठी कंपन्यांनी दुरुस्तीची कारवाई करणे आवश्यक आहे. ही दुरुस्ती विमान देखभाल नियमावलीच्या प्रक्रिया व नियमावलीनुसारच होणे अपेक्षित असते.  समाधानकारक दुरुस्तीशिवाय विमान परत सेवेत आणता येत नाही. उड्डाण अहवाल पुस्तकात याची नोंद करण्यात येते. २०२२ ते २०२४ या काळात बहुतांश  कंपन्यांंच्या विमानांमधील बिघाड कमी झाला.  ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सची संख्या मात्र वाढल्याची गंभीर बाब समोर आली आहे.

इंडिगोमध्ये सर्वाधिक फॉल्ट्स; पण नियंत्रणात यश२०२२ ते २०२४ या कालावधीत ‘इंडिगो’ कंपनीच्या विमानांमध्ये सर्वाधिक ७१७ फॉल्ट्स आले. मात्र, विमानांच्या एकूण उड्डाणांच्या तुलनेत कालांतराने यात नियंत्रण आणण्यात कंपनीला यश आले. २०२२ मध्ये ४७२ वेळा तांत्रिक बिघाड समोर आला होता. २०२३ मध्ये ११५ व २०२४ मध्ये १३० वेळा बिघाड दिसून आला. 

टॅग्स :Air Indiaएअर इंडियाPlane Crashविमान दुर्घटना