- योगेश पांडेनागपूर - अहमदाबाद येथील एअर इंडियाच्या विमानाच्या अपघातानंतर देशातील नागरी विमान वाहतूक क्षेत्राबाबत विविध सवाल उपस्थित करण्यात येत आहेत. हवाई प्रवाशांच्या सुरक्षेबाबत ‘डीजीसीए’सह (डायरेक्टोरेट जनरल ऑफ सिव्हिल एव्हिएशन) विविध संस्था कार्यरत असतात. मात्र, या संस्थांमधील सरासरी ३५ टक्क्यांहून अधिक जागा रिक्त आहेत. डीजीसीएमध्ये तर हा आकडा ४८ टक्क्यांपर्यंत आहे. त्यामुळे विद्यमान अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कामाचा मोठा ताण आहे. या ताणामुळे हवाई प्रवाशांची सुरक्षा धोक्यात येण्याची शक्यता नाकारता येत नाही. आश्चर्याची बाब म्हणजे मागील अनेक वर्षांपासून या रिक्त जागा कायमस्वरूपी भरण्याबाबत अनास्था दिसून येत असल्याचेच आकडेवारीतून समोर येत आहे.
नागरी विमान वाहतूक महासंचालनालय (डीजीसीए) ही नागरी विमान वाहतूक क्षेत्रातील नियामक संस्था आहे. ‘डीजीसीए’चे काम प्रामुख्याने सुरक्षिततेच्या मुद्द्यांशी संबंधित आहे.
‘डीजीसीए’कडून भारतातील हवाई वाहतूक सेवांचे नियमन करण्याची आणि नागरी हवाई नियम, हवाई सुरक्षा आणि विमान वाहतुकीच्या योग्यतेच्या मानकांची अंमलबजावणी करण्याची प्रामुख्याने जबाबदारी असते. ‘डीजीसीए’कडून आंतरराष्ट्रीय नागरी विमान वाहतूक संघटनेशी सर्व नियामक कार्यांचे समन्वय करण्यात येते. ‘डीजीसीए’मध्ये १ हजार ६९२ मंजूर पदे होती. परंतु, यातील ८७८ जागांवरच अधिकारी कार्यरत आहेत.
आकडेवारी काय सांगते?‘डीजीसीए’वर्ष मंजूर पदे रिक्त पदे२०२४ १,६९२ ८११२०२५ (मार्चपर्यंत) १,६९२ ८१४‘ब्युरो ऑफ सिव्हिल एव्हिएशन सिक्युरिटी’२०२४ ५९८ १८७२०२५ ( मार्चपर्यंत) ५९८ २२४एएआय२०२४ २४,८८२ ८,८०४२०२५ ( मार्चपर्यंत) २५,७३० ९,५०२