शहरं
Join us  
Trending Stories
1
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
2
Big Breaking : ट्रम्प यांनी रशियाचा राग भारतावर काढला! २५% कर लादला; दंडही जाहीर केला
3
देशमुख-मुंडे हत्या: "...पण, महाराष्ट्र सरकार त्यांना न्याय देत नाहीये"; सुप्रिया सुळेंची अमित शाहांकडे मोठी मागणी
4
IND vs ENG : "त्यांनी जे केलं ते समजण्यापलिकडचं" पिच क्युरेटरसोबतच्या वादावर काय म्हणाला गिल?
5
कुत्रा चावल्याने बकरीचा मृत्यू झाला, पण नंतर एक आख्ख कुटुंब रुग्णालयात दाखल झालं
6
शिक्षिकेचे सैतानी कृत्य! खराब हस्ताक्षरामुळे विद्यार्थ्याला दिले मेणबत्तीचे चटके, मालाड येथील घटना
7
सर्वसामान्यांच्या 'लालपरी'ला येणार अच्छे दिन, एसटी महामंडळाचे वर्षाला १२ कोटी रुपये वाचणार!
8
ठाणे: १८ वर्षाच्या तरुणाने खड्ड्यामुळे गमावला जीव; जीमला निघाला पण रस्त्यातच झाला अपघात
9
बाप्पा पावला! कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी ४४ अतिरिक्त विशेष ट्रेन्सची घोषणा, पाहा वेळापत्रक
10
"२६ लोकांची हत्या झाली, राजीनामा पंडित नेहरू देणार की डोनाल्ड ट्रम्प?", संजय राऊतांचे सरकारवर टीकास्त्र
11
IND vs PAK, WCL 2025 Semi Final : भारतीय खेळाडूंनी पाक विरुद्ध सेमी फायनल खेळण्यासही दिला नकार
12
पृथ्वीला स्कॅन करणार, भूकंप-त्सुनामी होण्यापूर्वीच सांगणार; ISRO चे NISAR सॅटेलाईट लॉन्च
13
सांगलीतून अजून काही प्रवेश होतील का? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "जो प्रवेश अपेक्षित..."
14
Maharashtra Politics : सांगलीत जयंत पाटलांना धक्का! अण्णासाहेब डांगे यांनी सोडली साथ; भाजपामध्ये केला प्रवेश
15
ताई चांगलं शिकवतात, ओरडत नाही, त्यांची बदली करु नका; तिसरीच्या विद्यार्थ्याचे शरद पवारांना पत्र
16
ट्रम्प सत्य सांगतील, म्हणून PM मोदी त्यांचे नाव घेत नाहीत; राहुल गांधींची बोचरी टीका
17
Jasprit Bumrah Miss Oval Test : जे आधी ठरलंय तसेच होणार! मग बुमराहची जागा कोण घेणार?
18
प्रा. ममता पाठक यांना जन्मठेपेची शिक्षा, पतीच्या खूनाचा आरोप; तो व्हिडिओ झालेला व्हायरल
19
दहशतवाद्यांनी कुंकूच पुसलं मग ऑपरेशनचं नाव 'सिंदूर' कशासाठी? जया बच्चन यांचा परखड सवाल
20
मालकिणीच्या हाताला झटका देऊन कुत्र्याची समोरून येणाऱ्या महिलेवर झडप, धडकी भरवणारा व्हिडीओ!

Air Fest 2022 : नागपूरच्या आकाशात वायुदलाच्या चित्तथरारक कसरती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2022 14:23 IST

डोळ्याचं पारणं फेडणारा नागपूरचा थरारक 'एयर फेस्ट'; स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त आयोजन

सुरभी शिरपूरकर

नागपूर :नागपूरच्या आकाशात वायुदलाच्या चित्त थरारक कसरती नागपूरकरांना अनुभवायला मिळाल्या. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या शोमध्ये सूर्यकिरण एरोबॅटीक आणि सारंग हेलिकॉप्टरच्या नमुने केलेल्या हवाई कसरतीने नागपूरकरांच्या डोळ्यांचे जणू पारणेच फेडले. तीन दिवस एयर फेसचा सराव आणि अखेर तो दिवस आला, ज्याची वाट नागपूरकरांना होती

वायुसेना नगरातील मेंटेनन्स कमांडच्या परेड मैदानावर निमंत्रितांना हवाई थरार अनुभवायला मिळाला. यामध्ये सूर्यकिरण एरोबॅटीक टीम सारंग हेलिकॉप्टर ऍग्रो आकाशगंगा एअर वॉरियस ड्रिल टीम एनसीसी ग्लाइडर्स आदींचा समावेश होता. आकाशगंगा या पथकाच्या दहा योद्धांनी ८ हजार फूट उंचावर या चित्त थरारक आणि श्वास रोखून धरणाऱ्या हवाई कसरती आणि प्रत्यक्ष त्याचे  सादरीकरण केले. यामध्ये सूर्य किरण एरोबॅटिक टीम, सारंग हेलिकॉप्टर एअर डिस्प्ले टीम, आकाशगंगा टीम आणि एअर वॉरियर ड्रिल टीम यांचा समावेश होता.

इतर उपक्रमांमध्ये पॅरा हँड ग्लाइडिंग, वाहतूक आणि लढाऊ विमानांद्वारे फ्लायपास्ट, आयएएफ उपकरणांचे प्रदर्शन, एरो-मॉडेलिंग आणि एअर फोर्स बँड सादरीकरण पाहायला मिळाले. 

आकाशगंगा टिमने तिरंगा ध्वज उंच नेला. आणि शेवटी संघातील तीन सदस्य तिरंगा घेऊन उतरले. हा उपस्थितांसाठी अभिमानाचा क्षण होता. डॉर्नियर विमानातून आठ हजार फूट उंचीवर स्कायडायव्हिंग करण्यात आले. या चित्तथरारक प्रात्यक्षिकाने नागपूरकर थक्क झाले. अॅवेरो हे मध्यम आकाराचे वाहतूक विमान जमिनीपासून ५०० फूट उंचीवर उडत होते.

‘संपूर्ण जगात चार ते पाच देशांमध्ये सूर्यकिरणसारख्या एरोबॅटिक डिस्प्ले टीम आहेत. त्यातील सूर्यकिरण ही सर्वोत्तम अशा स्वरूपाची असून ती देशाचा सन्मान वाढवित आहे’, अशी माहिती सूर्यकिरणच्या चमूतील फ्लाइट लेफ्टनंट आणि टीम कॉमेंटेटर रिद्धिमा गुरुंग यांनी दिली.

एअरोमॉडेलिंग शो, वायुसेनेच्या बॅण्डचे सादरीकरण विशेष आकर्षण होते. यंदाच्या शोमध्ये सुखोईचा समावेश नव्हता. त्यामुळे भारतीय वायुसेनेचा कणा असलेल्या अत्याधुनिक अशा या लढाऊ विमानाच्या हवाई कसरतींना नागपूरकर मुकले. मात्र, चित्त थरारक आणि श्वास रोखून धरणाऱ्या कसरतींची परभणी नागपूरकरांना नक्कीच मिळाले यात काही शंका नाही.

टॅग्स :airforceहवाईदलnagpurनागपूर