शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
2
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
3
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
4
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
5
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
6
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
7
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
8
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
9
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
10
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
11
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
12
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
13
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
14
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
15
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
16
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
17
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
18
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
19
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
20
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!

Air Fest 2022 : शानदार...जबरदस्त...जिंदाबाद ! ‘एअर फेस्ट’ने जिंकली नागपुरकरांची मने

By योगेश पांडे | Updated: November 19, 2022 14:37 IST

मंत्रमुग्ध करणारा नागपूरचा थरारक 'एयर फेस्ट' : ‘सूर्यकिरण’च्या कवायतींचा थरार

नागपूर : ‘सूर्यकिरण’...नावातच तेज, वेग आणि चपळता... हवेत ‘एअरोबॅटिक’ कसरती दाखवत असताना विमानांनी अवकाशात चक्क विमानाचेच ‘फॉर्मेशन’ तयार केले अन् हजारो नागपुरकरांच्या अंगावर रोमांच उभे झाले. केवळ ‘सूर्यकिरण’च नव्हे तर  ‘आकाशगंगा’ चमूतील ‘पॅराट्रूपर्स’ने साकारलेला तिरंगा, ‘सारंग टीम’च्या वैमानिकांच्या ‘हेलिकॉप्टर्स’च्या माध्यमातील चित्तथरारक कवायती आणि ‘एनसीसी’च्या ‘कॅडेट्स’ने ‘एअरोमॉडेलिंग’मधून दाखविलेली हवेतील युद्धाचे प्रात्यक्षिक. प्रत्येक क्षण हा नागपुरकरांसाठी एक वेगळा अनुभव देणारा होता. सर्वच उपस्थितांच्या तोंडून भारतीय वायुदलासाठी शब्द निघाले, ‘शानदार...जबरदस्त...जिंदाबाद’!

मेंटेनन्स कमांड’तर्फे १९ नोव्हेंबर रोजी ‘एअर शो’चे आयोजन करण्यात आले.  यावेळी एअर फोर्स बॅन्डनेदेखील विविध ‘थीम सॉन्ग’ सादर केले. तर दुसरीकडे रायफलधारी जवानांच्या ‘ड्रील’ने ‘एअर शो’मध्ये रंगत आणली. कदमताल करता करता क्षणात जवान एकमेकांच्या ‘रायफली’ बदलत होते.

‘पॅराट्रूपर्स’च्या धैर्याला सलाम

सर्वात अगोदर  ‘अ‍ॅव्ह्रो’ विमान ‘पास’ झाले. काहीच वेळात आकाशात काही ठिपके दिसायला लागले. 'आकाशगंगा’ ही स्काय डायव्हिंग करणारी भारतीय वायुसेनेची चमू आहे. यामध्ये चौदा सदस्यांचा समावेश आहे. कोणाच्याही ध्यानीमनी नसताना सुमारे ८ हजार फूट उंचीवरुन या चमूतील ‘पॅराट्रूपर्स’ने जमिनीकडे झेप घेतली. सर्वांच्या डोक्याच्या वर ‘पॅरेशूट्स’चे ठिपके दिसायला लागले व त्यानंतर एकानंतर एक सर्व ‘पॅराट्रूपर्स’ अलगदपणे जमिनीवर आले. तीनच्या जोडीने आलेल्या चमूने तर अवकाशात तिरंगा सादर केला व अवघ्या काही फुटांवर ते एकमेकांपासून वेगळे झाले. सर्वांनी या धाडसी कौशल्याची वाहवा केली.

'सारंग’ चमूच्या साहसिक कवायती

भारतीय हवाई दलाच्या हवाई कसरती करणाºया सारंग हेलिकॉप्टर पथकाने तर ‘एअर शो’मध्ये आणखी थरार आणला. ‘सारंग’च्या दोन चमूमध्ये प्रत्येकी चार ‘ध्रुव’ हेलिकॉप्टर्सचा यात समावेश होता. विशिष्ट प्रकारे डिझाइन केलेल्या पंख्यांमुळे ध्रुव हेलिकॉप्टरमधून विविध प्रकारच्या कसरती करणे शक्य होते तसेच लष्करी वापरासाठी ते अत्यंत उपयुक्त ठरते. एकमेकांच्या समोर येत ‘क्रॉस’ करणे, अलगदपणे हेलिकॉप्टरची दिशा बदलत त्याला लंबरेषेत वर घेऊन जाणे, हवेत ‘हार्ट शेप फॉर्मेशन’ करणे इत्यादी कसरती या चमूने केल्या. सुमारे २० मिनीट या कसरती सुरू होत्या

टॅग्स :airforceहवाईदलnagpurनागपूर